बेलापुर ऐनतपुर भागातील धोकादायक विजवाहक तारा, पोल, डी पी तातडीने दुरुस्त करण्याच्या विज निरीक्षकाच्या सुचना
बेलापुर (प्रतिनिधी )-महावितरणच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते मँडम यांनी सागर भांड मयत झालेल्या घटनास्थळाला भेट देवुन पहाणी केली व पंचनामा केला तसेच पुढील विज पुरवठा तातडीने सुरु करण्याच्या सुचना दिल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या भागातील विज पुरवठा सुरळीत केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कै. सागर भांड याचा मृत्यू विज वाहक तार तुटल्यामुळे झाला असुन या घटनेचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी करुन कै. सागर भांड यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी तसेच त्या भागातील विज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जि प सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना जाब विचारला .त्या वेळी आज वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी येवुन पंचनामा करुन विज पुरवठा सुरळीत होईल असे अश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता शिरीष वाणी यांनी दिले होते त्यानंतर दुपारी महावितरणच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते मँडम यांनी घटनास्थळाला भेट देवुन पंचनामा केला तसेच दुर्घटना घडू नये या करीता आवश्यक ते पोल, विज वाहक तारा, विद्युत वाहीनी तातडीने दुरुस्त करा अशा सुचना दिल्या. या वेळी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की नागरिक,शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी विजेच्या समस्ये मुळे त्रस्त असून सर्व भागातील मेन्टेनन्सची कामे त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे.अशा घटना पुन्हा घडू नये या करीता महावितरणने आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच महावितरण च्या कामात सुधारणा न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा खंडागळे यांनी दिला.या वेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी के केदारी सहाय्यक अभियंता शिरीष वाणी
जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसभापती अभिषेक खंडागळे, देविदास देसाई,उपसरपंच मुस्ताक शेख,एकनाथ नागले,पुरुषोत्तम भराटे, रविंद्र कुताळ,भाऊसाहेब तेलोरे,दादासाहेब कुताळ,दिपक गायकवाड, सुरेश अमोलिक,किशोर बंगाळ,बाळासाहेब सोनवणे,मनोज गाढे,भास्कर वारे, महावितरण कर्मचारी मधुकर औचिते, अनिल दौंड स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.