Latest Post

बेलापूरःकृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतक-यांशी निगडीत आहे.या संस्थेच्या माध्यमातून शेतक-यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तसेच अनेक विकास कामे करावयाची आहेत.यासाठी सत्तेचे पाठबळ लागते.त्यासाठीच महसूल मंञी श्री.राधाकृष्ण विखे,मी आणि करण ससाणे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही  कायम जनतेत असतो म्हणूनच आम्हाला सत्ता मिळते हे केवळ निवडणूकांच्या वेळी अवतरणारांनी ध्यानात ठेवावे असे  प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.                                       कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्रीरामपूर सहकार विकास पॕनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे आयोजित मेळव्यात श्री.मुरकुटे बोलत होते.जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे,भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे,साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर,माजी सभापती नानासाहेब पवार,डीपी.डी.सी चे सदस्य बाबासाहेब दिघे,जि.प.सदस्य शरद नवले,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ,भास्कर खंडागळे, रवी खटोड ,सुधीर नवले,अभिषेक खंडागळे, राम पोळ, आदी उपस्थित होते.                              श्री.मुरकुटे म्हणाले की,श्रीरामपूरची बाजार समितीला उर्जितावस्था मिळवून द्यायची आहे.मुख्य बाजार समितीसह बेलापूर व टाकळीभान येथील उपबाजार समिती येथे  जनावरांचे बाजार,कांदा मार्केट सुरु करणे यासह अनेक विकास कामे करावयाची आहेत.तालुक्यात खंडकरी व आकारी पडीत शेतक-यांचे प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक गावांची गावठाण हद्द संपली आहे.गावठाण हद्द वाढीसाठी शेती महामंडळाची जागा मिळवायची आहे.हे सर्व प्रश्न महसूल मंञ्यांशी निगडीत आहेत.महसूल मंञ्यांनी या प्रश्नी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.शेतक-यांचे प्रश्न सोडविणेसाठीच आम्ही युती केली आहे.सत्तेसाठी आम्ही झुकत नाही तर आम्ही नादी लागणारांना घुडगे टेकावयास लावतो.  जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्हाला सत्ता मिळते हे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करणारांनी ध्यानात घ्यावे असे श्री.मुरकुटे  म्हणाले.                                                           स्वागत व प्रास्ताविक साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांनी केले.देवीदास देसाई यांनी सूञ संचलन केले तर सरपंच महेन्द्र साळवी यांनी आभार मानले.कार्यक्रमास भरत साळुंके,जालिंदर कु-हे,प्रकाश नाईक,शेषराव पवार,भगवान सोनवणे,भाऊसाहेब कुताळ,किशोर नवले,शिवाजी वाबळे,ज्ञानदेव वाबळे,पंडीतराव बोंबले,भास्कर बंगाळ,दत्ता कु-हे ,विलास मेहेञे,प्रकाश नवले,सुधाकर खंडागळे,बाळासाहेब वाबळे,अनिल नाईक,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,रमेश अमोलिक, प्रभात कु-हे,पुरुषोत्तम भराटे,वैभव कु-हे,प्रसाद खरात,सुरेश कु-हे,रामचंद्र राशिनकर,विलास कु-हे ,प्रकाश कु-हे, असिफ बागवान,हाजी ईस्माइलभाई शेख,मोहसीन सय्यद,जीना शेख, जाकीर शेख,आयजुभाई शेख,सुरेश अमोलिक सचिन अमोलिक,रावसाहेब अमोलिक,किशोर बोरुडे,अन्तोन आमोलिक,दिलिप अमोलिक ,प्रशांत लढ्ढा,शांतिलाल हिरण,प्रदीप शेलार,सुभाष शेलार,वैभव कु-हे,अमोल गाढे,महेश कु-हे,सचिन वाघ,विशाल आंबेकर आदिंसह ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रसिद्ध पार्श्वगायीका अनुराधाताई पौडवाल यांना शनि महाराज जयंती निमित्त बेलापुर व शनि शिंगणापूर येथे भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले असुन या निमंत्रणाचा त्यांनी स्विकार केला असल्याची माहीती बेलापुर येथील शनि मंदिराचे पुजारी दिपक वैष्णव यांनी दिली आहे.शनि महाराजांची जयंती १९ मे रोजी येत असुन त्या निमित्ताने आपण अहमदनगर जिल्ह्यात येवुन शनि शिंगणापूर तसेच पुरातन  बेलापुर येथील शनि मंदिरास भेट द्यावी अशी विनंती शनि शिंगणापूरचे पोलीस पाटील अँड .सयाराम बानकर व बेलापुर शनि मंदिराचै पुजारी दीपक वैष्णव यांनी मुंबई येथील अनुराधाताई पौडवाल यांच्या घरी जावुन शनि मंदिरास भेट देण्याचे निमंत्रण दिले शनि शिंगणापूर येथील शनि महात्म्य सर्वांना माहीत आहे त्याच बरोबर श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे शनी महाराजाची एकमेव मूर्ती असुनअतिशय जागृत असे हे देवस्थान आहे त्यामुळे मूर्ती रुपात असणाऱ्या बेलापुर येथील शनि मंदिरासह आपण भेट द्यावी अशी विनंती मदिंराचे पुजारी दिपक वैष्णव व रामभाऊ जगताप यांनी केली या वेळी बोलताना अनुराधाताई पौडवाल म्हणाल्या की शनि महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा योग खऱ्या अर्थाने आज आलेला आहे शनि महाराजाचे दोन्ही भक्त पुजारी शनि महाराजांच्या भेटीचे निमंत्रण घेवुन आलेले आहे बहुधा शनि देवानेच त्यांना माझ्याकडे पाठविले असावे त्यामुळे शनि जयंतीला मी शनि महाराजांचे दर्शन घेण्याकरीता शिगंणापूर तसेच बेलापुर येथे येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - जगभरातील मुस्लिमांचा सर्वात मोठा सण असलेली रमजान ईद काल शहर व तालुक्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या  निमित्ताने ईदगाह मैदान व जामा मशीद तसेच शहरातील अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली.सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद व अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सुद्धा शुभेच्छांचा पाऊस पडला.

याप्रसंगी ईदगामध्ये दुवा करताना शहर काळजी मौलाना अकबर अली यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी आपल्या देशाला उद्देशून गौरोद्गार काढले होते.मुझे जमीन ए हिंद से मोहब्बत की महक आती है असे हजरत पैगंबर यांनी सांगितले होते.परंतु आज या देशाला कुणाची तरी नजर लागली आहे. देशाचे वातावरण बिघडले आहे.त्यासाठी आज आपण सर्वजण मिळून दुआ करू या. या देशांमध्ये सुख,शांती, समृद्धी नांदू दे.सर्वांच्या समस्या दूर होऊ दे आणि एकोपा आणि भाईचारा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

जामा मशीद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस  अविनाश आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,उपनगराध्यक्ष करण ससाणे,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक कानडे,सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले,संजय छल्लारे, लकी सेठी,दीपक कदम, जयंत चौधरी, भाउसाहेब मुळे, विजय खाजेकर,

तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, डिवायएसपी संदीप मिटके,

मुख्याधिकारी गणेश शिंदे,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,नाना पाटील,महेंद्र त्रिभुवन, किशोर त्रिभुवन,संदीप मोकळ,अरुण मोकळ, तलाठी घोरपडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आगामी नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक पाहता या वर्षी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये शुभेच्छा फलकांची स्पर्धा दिसून आली. 

नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या. पोलीस खात्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जामा मशीद मध्ये आलेल्या मान्यवरांचे स्वागत डॉक्टर राज शेख,नगरसेवक मुख्तार शाह, रज्जाक पठाण, तनवीर रजा,जावेद शेख यांनी केले. महिनाभर रमजान निमित्ताने रमजान, कुरआन व इस्लाम धर्माबद्दल मौलिक माहिती विविध वर्तमानपत्रे व सोशल मीडिया मधून प्रसारित केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मशीद ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. मौलाना मोहम्मद ईमदादअली यांनी धार्मिक प्रवचन दिले तर मुफ्ती अतहर हसन यांनी नमाजची ईमामत केली.जामा मशिदीचे विश्वस्त शकूर भाई शेख यांची कमतरता यावेळी जाणवली.

ईदगामध्ये मुफ्ती रिजवानुल हसन शेख यांनी धार्मिक प्रवचन दिले. नमाजची इमामत मौलाना सय्यद अकबर अली काझी यांनी केली.याप्रसंगी लखनऊ येथील मदरसा नदवातुल उलेमाचे मुफ्ती अब्दुल्लाह मखदुम हुसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मुझफ्फर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.


चौकट

पोलीस विभागातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईद मुबारक म्हणत स्वागत करण्यात आले.पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गवळी व त्यांचे सर्व सहकारी यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प दिले.

नगरपालिकेतर्फे यावेळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह भोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नमाज नंतर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर येथील ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी ईदची नमाज अदा केली मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान तसेच  मस्जिद मध्ये ईद उल फित्रची नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी केली              येथील उक्कलगाव चौफुलीवर असलेल्या ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी सर्व मुस्लीम बांधवांना महीनाभर केलेले उपवास तसेच अल्लातालाकडे केलेली याचना मंजुर होवुन गावात तालुक्यात जिल्ह्यात तसेच राज्यात देशात शांतता नांदुन सुख समृद्धी व भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या या वेळी मा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचा चेअरमन रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके  आरपीआयच्या वतीने रमेश अमोलीक पत्रकारांच्या वतीने देविदास देसाई  पोलीसांच्या वतीने ऐपीआय बोरसे प्रदेश तेली महासंघाच्या वतीने एकनाथ उर्फ लहानु नागले भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या तसेच हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या तसेच परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासनाच्या वतीने योग्य  सहकार्य केल्याबद्दल ऐपीआय बोरसे यांचा सत्कार सर्फराज सय्यद जाकीर शेख जब्बार अत्तार शफीक बागवान  यांनी सत्कार केला या वेळी जाफरभाई आतार मोहसीन सय्यद अब्रार सय्यद हाजी ईस्माईल शेख यांनी हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या

रमजान ईद मुबारक २०२३ 

ईद मुबारक दिन २२-०४-२०२३ 

"  इस्लाम समजून घेताना  "

।।।   ईद - उल  -फितत्र ;- आनंद - बक्षिसे मिळण्याचा दिवस,.....!!!

लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.

बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.

९२७१६४००१४ 

इस्लाम   अरबी शब्दाचा अर्थ " शांती --अमान '" 

 शांतीच्या मार्गावर चालणारा , अर्थात अमन पसंत.

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सौ. सुषमा स्वराज‌जी . या युनोच्या संमेलनांमधे  सहभागासाठी गेल्या होत्या . जगातील नेत्यांसमोर भाषण करताना , इस्लाम चा  हिंदी भाषेमधील अर्थ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या  परखड ओघवत्या  शैलीत सुनावले की "  इस्लाम शब्द का  अर्थ शांती होता है  ; " " " शांती 'होता है "  शांती " ,  और अंग्रेजीमे  अर्थ. "पीस..पिसफुल"  है ., आपको शायद तो पता है  ; और मालुम  होना भी चाहिए ‌ ;;  याद भी होना चाहिऐ  "   जबरदस्त भाषणाची सुरुवात करून पुन्हा पुढे संपूर्ण भाषण ओघवतं झाले.असो...!!!

इस्लाम मुळात जगात आलाच  अराजक परिस्थितीत निर्माण झालेली , नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती , बाप जन्मालेल्या जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होता , नाद गाणं नंगानाच हैदोस घातला जात होता, प्रत्येक माणसांकडे रणडया  या प्रतिष्ठेचं चिन्हं समजलं जातं होते , प्रत्येक घराघरात दारू तर प्रतिष्ठेची बाब झाली होती . सावत्र आईशी ही लग्न करण्याला चुकीचे समज नव्हते.. नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती. पत्नी फक्त हौसेचे साधन म्हणून वापरली जात होती. महिलांना तर कवडीमोल किंमतीत उपलब्ध होत होती. एवढ्या मोठ्या भयानक परिस्थिती एक उगवता सूर्य चंद्र त्या अरबी भुमीत सच्चा न्यायीक व्यक्ति अल्लाह ने प्रेषित म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या रुपाने रानटी वाळवंटात प्रेमाचा संदेश देण्यासाठी पैंगंबर म्हणून पाठवलेत. त्याचबरोबर अल्लाहने आपला संदेश घेऊन  ईशदुत हजरत जिब्राईल (जिब्राल्टर) अलै. यांच्या द्वारा वेळोवेळी मानव-कल्याणासाठी संदेश घेऊन २३ वर्ष घेऊन आलेत ,त्याच २३ वर्षाच्या अभुतपूर्व क्रांती ने आज १४४४ वर्ष जगाला दिशा देण्याचे काम केले. त्याच  दिशेने बघुया..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांना अभुतपूर्व क्रांती घडवून आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील व भिती ही दाखवावी लागेल, आळशी वाळवंटातील लोकांसाठी काही उत्साही वातावरण निर्माण करणे गरजेचे होते. पुढे बघू या.

इस्लाम लोकांना  अल्लाह (ईश्वराचे ) भय बाळगण्याचे तसेच  संपूर्ण समर्पण करण्याचा आदेश देतो .एकाच अल्लाह ( ईश्वरा) ची आराधना करावी. अर्थात एकेश्वरवादाची शिकवण देतो . या जगात आणु - रेणु - चंद्र - सुर्य - तारे - पृथ्वी - हे ब्राह्मंड ( गॅलॅक्सि , Univers) चे प्रत्येक क्षण - क्षण,कणं न कणं निर्माण करून तो आप- आपल्या काटेकोर वेळा पाळुन चालवणारा फक्त एकटाच अल्लाह ( ईश्वर) आहे. माणवजातीला जन्माला घालणारा ही तोच अल्लाह आहेत व परलोक घेऊन जाणारा ही तोच अल्लाह आहेत. मनुष्य फक्त एक नाटकातील पात्रे आहेत... म्हणुनच " अल्लाहु अकबर "  या तीनही लोकांत, सृष्टीला चालवणारा फक्त एकटाच अल्लाह (ईश्वर)आहे.म्हणुन एकाच अल्लाह( ईश्वरा)ची आराधना करावी म्हणजे एकेश्वरवादाची शिकवण. असो.

त्यासाठीच , हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना मानव कल्याण - जन सुधारणा  मार्गदर्शन करण्यासाठी प्रेषित- पैंगंबर -संदेश वाहक  म्हणून अंतिम प्रेषित म्हणून घोषित केले..

  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना एका खेड्यूतांनी प्रश्न विचारला, " पैंगंबर मुहम्मद स्व सल्लम ," " दिईन ( धर्म) म्हणजे काय ??

लगेच उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले, " अद् - दिईन - नु - नसीह‌..!  , अद् -दिईन -नु -नसीह!! , अद्-दिईन- नु- नसीह !!! 

अर्थात:- !  लोक- कल्याण -हाच- दिईन ( धर्म‌) आहे !

             !! लोक -कल्याण- हाच -दिईन (धर्म‌ )आहे !!

            !!! लोक- कल्याण -हाच- दिईन (धर्म‌ )आहे !! 

अल्लाहच्या लोक- कल्याणकारी योजना राबविण्यात आल्यात . 

ईस्लामचे  संस्कार मूल्यं:-  "  आपल्यासमोर कोणी लहान- मोठ्ठां , पुरुष -महिला - दिसताच, त्यांना आदराने :- "अस्सलामुआलैकुम- व- रहमतुल्लाह -व - बरकातहु " असा नमस्कार घालतात , अर्थात " तुमच्यावर आल्लाहाची शांती असो - कृपादृष्टी-दया- बरकत असो ". या वाणीत  जिव्हाळा - विश्वास - प्रेम भावना व अल्लाह चे आशिर्वाद सुध्दा   !! 

  = उत्तरादाखल समोरील बांधव  त्याला  , " वालेकुम-स्सलाम - व- रहमतुल्लाह -व- बरकातहु ".  अर्थ ही तसाच मार्मिक ;- " माझ्याप्रमाणे तुझ्यावरही  अल्लाहची शांती - कृपादृष्टी - बरकात असो." म्हणजेच डब्बल आशिर्वादच . 

 उत्तराने समोरच्या  मनाला   प्रेम ,वात्सल्य ,  मनाला आपुलकीने 

  चांगले चिंतित आहेत. आपुलकीच्या उत्तराने किती हायसे वाटत असणार ,. कितीही मोठा- मनुष्य-.गरीब - भिकारी- मालक  , एक गुन्हेगार  असो.  सात जन्माचा दुश्मन असला ,तरी ,  किंवा बादशहा ला एक गुलाम , किंवा ‌कैदेत असणाऱ्या गुन्हेगाराला बाहेरून येणाऱ्या बादशहा -राजा सुध्दा  अशाच प्रकारे  अदरानेच " सलाम " करणार  -व -  पुन्हा समोरच्या कडून उत्तर  ही  याच भावनेने  येणार - देणार..!!

किती आदरयुक्त -प्रेमाची भावना इस्लामने जगाला दिली आहे ..

म्हणूनच , प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल. , सांगितले आहे की , " कोणी उच्च- निच नाही  , कोणी श्रेष्ठ नाही , कोणी मालक नाही , कोणी काळा व  गोरा नाही ,  सर्व समान एकाच अल्लाह ने  निर्माण केले आहे.    समता बंधुताची शिकवणी दिली .

  तुमचा मित्र , नातेवाईक  कोणी खूप दिवसांनी आला तर त्याचे स्वागत एकमेकास आलिंगन - गळे भेटून देतात यामुळें एकमेकांच्या हृदयात - मनामध्ये  तुम्ही मिसळले जाऊन , एक प्रकारे विरोध नाहीसा होतो.   कट्टर दुश्मन असेल ; तरी  समोर जेव्हा समेट घडवून आणला जातो  ,तर  ,त्यावेळेस एकमेकांची गळाभेट घेऊनच  दुश्मनी संपवतात .

प्रेषीत मुहम्मद स्व . सल्लमांनी  सांगितले  ," तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अबोल राहता कामा नये नाहीतर तुम्ही मुसलमानच नाही ".

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी. सांगितले ," तुम्ही एकमेकांत समेट घडवून आणा व अल्लाहला   समेट घडवून  आणणारे जास्त प्रिय आहे."

 प्रेषीत मुहम्मद स्व. सल्लम म्हणतात ,"  सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरेआहेत म्हणून त्याने निर्माण केलेल्या मानवाशी प्रेम करतो , सर्व मानवजातीस सामाजिक न्याय देतो .

 पवित्र कुरआन म्हणतो की, " आम्ही तुम्हाला सर्वांना एकाच स्री व  एकाच पुरुषा पासून निर्माण केले आहे , ; मग तुमचे विविध राष्ट्र -देश - विविध ( कबील्यांत) भावक्यात व  विविध वंशात विभागले गेले ; जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे  ; परंतु अल्लाह जवळ श्रेष्ठ तोच असणारं आहे जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा आहे " (  पारा नं. २६ ,सुराह नं ४९ सुराह हुजूरात आ.नं.१३ वी )

         ‌‌दिव्य कुरआन म्हणतो की ," ज्याने अनुरेणू इतके सत्कर्म केले असेल त्याचे फळ त्याला   तितकेच मिळेल ;   व ;  ज्याने  जितके दुष्कर्म ,कुकर्म ,वाईट कर्म त्याचे फळ त्याला  त्याचप्रमाणे भेटतील".  

अल्लाह ने पैगंबर मार्फत दुष्कर्म करणाऱ्यांना दोजख ( नरका) ची भिंती दाखवून  त्याच कुकर्म करणाऱ्या कडून सदाचार करून घेतले. जे अरब लोक जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होते तेच अरब लोक मुलींचे उत्साहाने कन्यादान करण्यात सबाब समजू लागले. महिलांना मान सन्मान मिळू लागला. 

गरीब -गरजू - अनाथ मुलांना - पीडीतांसाठी जकातीचे पैशे वाटून खुशाली आली कालांतराने गरीबांच्या अर्थव्यवस्थे मोठी होऊन गरीब लोक जकात देण्याची पात्रता निर्माण झाली..

अल्लाह चे भय व कठोर कायदे आणुन अराजकता माजलेल्या वाळवंटात प्रेमाचा संदेश व सुव्यवस्था अबाधित झाली. 

श्रीमंत लोकांना गरीबीची जाणीव होण्यासाठी रमजान मुबारक रोजा ठेवणं अनिवार्य करण्यात आले . यामुळे प्रत्येक श्रीमंत लोकांना गरीबीची, भुकेले कसे जगत असणार याची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या जकातीच्या पैशातुन गरीबांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली गेली 

आपण  २९  दिवस  उन्हाळ्यात अल्लाहच्या मर्जी संपादन करण्यासाठी रोजे  ठेवून अल्लाहाचे आराधना- उपासना- ईबादत- नामस्मरण केले .  खुप तहान लागलेली असतानाही अल्लाहच्या मर्जी साठी भुकेची तमा न बाळगता १३-१४ तास  सहन केले,  तसेच घरातील  चार- पाच वर्षाच्या  लहान  बाळगोपालांनीही भर उन्हाळ्यात रोजे ठेवुन , तरावीह नमाज , दिवसभराचे पाच वेळी नमाज आदा केलीत ,  अजूनही कामधंदे -व्यवहार  सुरळीत झाले नसले ,  तरी , आपले अर्थीक गणिते संभाळून  प्रपंचाची अर्थव्यवस्था  व्यवस्थित करून . जकात- सदकाह - फितत्राह आजुबाजूच्या गरजू-पीडित-बेसहारा ,अनाथ ,विधवा तसेच योग्य व्यक्तीला  दानधर्म देऊन ,  सामाजिक बांधिलकी जपली. तसेच कळत- नकळत काही चूक तर झाली नाही ना हे क्षनोक्षनी याची काळजी घेऊन ,‌ २९ रोजे  सहन करुन   पुर्ण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले . अल्लाहाशी  निरोगी आयुष्यासाठी , मुक्ततेची  क्षनोक्षनी दुआ केली. 

,जगातील  सर्व प्राणी - मानवांना  निरोगी आयुष्यासाठी रोजा ठेवून  , स्वतः उपाशी राहून  , दुसऱ्या समाजातील बांधवांना जे  बेघर आहेत ,उपाशीपोटी आहेत ,आशां गरजूंना  अन्न-पाणी , औषधे, झोपण्यासाठी निवारा व  पायी चालणाऱ्यां वाटसरूंना  चप्पल , मानसिक आधार दिला .मदत  केली‌,

     ‌तसेच  भारतीय बांधव आहोत . आपण सर्व बंधुभाऊ -भाई- भाई आहोत ,  पहाटे पासून.ते संध्याकाळ पर्यंत जेवढे काही करता आले तेवढी समाज सेवा अल्लाह (ईश्वर)  सेवा  तन-मन-धना ने   करून  आपण कोणत्याही लोभाची, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता येवढं सगळे केलं . 

हे सर्व लोक कल्याण -हाच-दिईन धर्म‌ मध्ये च येते म्हणून ..

       प्रेषित मुहम्मद स्व यांना विचारला गेलेला प्रश्न ,"  दिईन धर्म‌ म्हणजे काय ? " 

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी ,उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की " अद् -दिईन-  नु -नसीह " 

अर्थात :- " लोक कल्याण हाच (धर्म  ) दिईन  नु नसीह  "!! .

हे सर्व समजून उमजून घेऊन अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांची मर्जी संपादन करण्यासाठी सहन केलत , खरोखरच सहनशीलता दाखवली याचं फळ , बक्षिसे अल्लाह ( ईश्वर) जरुर आपण केलेल्या सहनशीलतेप्रमाणेच निश्चितच मिळणार आहे, अल्लाहचा  बक्षीस-ईनाम प्राप्तीचा  दिवस आहे . निश्चितच  आपल्याला अल्लाहा बक्षीस  देणारच आहे  ,    कोणाला  किती हे आल्लाहा च ठरवणारे आहेत .जसे आपली आईवडील आपल्या मुलांची परीक्षा घेतल्यानंतर बक्षिसे देतात ,

 प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात कि, " अल्लाहा आपल्याला ७०  आई पेक्षा ही जास्त प्रेम करतो ,'"

एक आई  लेकराला जेवढे प्रेम करीत असते ,ते अल्लाहा( ईश्वर) आहेत ,विचार न केलेला बरं." आल्लाहा जीवसृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू वर आई सारखेच प्रेम करतात ,

 अल्लाह( ईश्वर) चा आजचा ईदु-ल - फितर चा  इनाम-बक्षीस- पारितोषिक वितरणाचा दिवस आहे . पारितोषिके तर मिळणारच आहे...

    आपला बंधुभाव -एकात्मता -स्नेह वृद्धिंगत व्होवो हीच अल्लाहा रबबुल आलमीन जवळ दुआ मांगतो....आमीन .... 🌹🌹🌹

(ईद - उल - फितत्र ) रमजान ईद मुबारक हो ... शुभेच्छा. 🌹🌹🌹

लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख 

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

    9271640014.

🌹🌹 @ डॉ @ स@ ली@ म@ शे@ ख@

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री जुने बालाजी मंदिर बेलापुर चे अध्यक्ष श्री हरिप्रसाद जी व्यास यांचे सुपुत्र तसेच राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार पूजनीय स्वामीजी श्री गोविन्द देवगिरिजी महाराज व भागवताचार्य पंडीत महेशजी व्यास यांचे पुतणे डाॅ श्री मुकुंद हरिप्रसाद व्यास यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुर च्या अध्यक्ष (डीन )पदी नियुक्ति झाली असुन त्यांच्या नियुक्तीने बेलापुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे                      मागील वर्षी डाँक्टर मुकुंद व्यास यांनी  प्रोफेसर म्हणून त्यांना पदभार स्विकारला होता आता त्यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुरच्या अध्यक्षपदी (डीन )निवड करण्यात आलेली आहे  त्यांची इतक्या मोठ्या संस्थेवर नियुक्ति मुळे बेलापुरच्या वैभवाता आणखी भर पडली आहे या नियुक्ति बद्दल जि.प सदस्य  शरदराव नवले,जनता आघाडीचे अध्यक्ष रविंन्द्र खटोड, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक, सरपंच महेंद्र साळवे उपसरपंच श्री अभिषेक खंडागळे  बेलापुर कार्यकारी सोसायटीचे चेअरमन  सुधीर नवले,भा जा पा चे प्रफुल्ल डावरे माहेश्वरी समाज चे हरिप्रसाद जी खटोड ,जैन समाजाचे श्री शांतिलाल गांधी,छन्याति समाजाचे श्री रमेशजी दायमा,गोसेवक श्री नंदलाल डागा पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा आदिंनी अभिनंदन केले आहे।।

रमजान मुबारक - २०२३ - रोज़ा २९ शुक्रवार दि. २१-०४ -२०२३ 

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख, 
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

प्रेषित मुहम्मद स्व.सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ;  दिन-दिईन- (धर्म) म्हणजे काय ??.

यावर प्रेषित स्व.सल्लम यांनी  तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की, अद दिईन नु नसीह ! , अद दिईन नु नसीह !! ,  अद दिईन नु नसीह !!!,

   अर्थात:- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) ,  

                 !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ), !!

                   !!  लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) !! आहे...

 !    आज जुम्मातुल विदाह - व लैलतुल जा-य-जा ची अवलोकनाची रात्रं...!!

विदाह - या शब्दाचा अर्थ होतो अंतिम, पुन्हा परत न येण्यासाठी,आपण कालच्या लेखात उल्लेख केला होता अंतिम विदाह - म्हणजेच अखेरच्या पुन्हा परत न येण्याच्या  प्रवासाला तसेच प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या हज्जतुल- विदाह,लग्नाच्या दिवशी मुलीला विदाह करतात त्याला ही विदाह म्हणून संबोधतात,असो.

रमजान महीन्यातील शेवटच्या जुम्माला -जुम्मातुल विदाह म्हणतात,याचं महत्त्व फार आहे, प्रत्येक जुम्माला एक क्षण महत्वपूर्ण असतो,त्यावेळी प्रत्येक दुआ याचना कबुल (पुर्ण) होतात, रमजान विदाह तर अजुनही महत्वाचे असणार त्या मंगलमय क्षणांची संधी साधण्यात मोठेपणा असून आदली रात्र लैलतुल कद्रची हजारों महीन्यांची एकच  कद्र च्या रात्रींचाही फायदा उचलला पाहिजे.

आज जुम्माची येणारी रात्र " लैलतुल जा-य-जा "-  अर्थात  उर्दू शब्द आहे, आपल्या प्रत्येक कामाचं जायजा घेणं ; मराठीत  " अवलोकन "होतो. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्यक्तींच्या महत्वपूर्ण   गुणात एक खास गुण बघायला मिळातो,तो स्वतःच - स्वतः चे  अवलोकन करणं,  काय चुकलं ?  काय साध्य करायचे ? काय बाकी आहेत‌ ?,  छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये चुकीचं झालेत का ?  , मग काय बरोबर केले पाहिजेत ?, याचं अवलोकन करणं.चुका झाल्याशिवाय सुधारणा होत नसते. मग माणुस चुकीतूनच पुढे  शिकत असतो. चुकांची गोळाबेरीज करून पुन्हा पुढे जायचं आहेत; सुधारणा करायची आहे ती आजच्या लैलतुल जा-य-जा  व  लैलतुल कद्र च्याच  रात्रीमध्ये , अल्लाह जवळ क्षमा - दया - याचना करून पुन्हा -पुन्हा  चुकीचे होणार नाहीत हे स्पष्ट शब्दात अल्लाह जवळ सांगणे,

 उदाहरणार्थ:- आपल्या खास जवळच्या मित्राला सर्व खासगी गोष्टी  सांगतो, त्या खाजगी गोष्टी मित्र सोडून कोणालाही सांगत नाहीत अशा आयुष्यातील प्रत्येक लहानाहुन -ही -लहान खाजगी गोष्टी ही अल्लाह जवळ एका मित्रांसारखंच सांगणे, तो अल्लाह आहे व्यक्तिगत म्हणणं पुर्ण (कबुल) करतात, म्हणुनच त्यांना अल्लाह म्हणतात.

 पापं - गुन्हे - चुका अल्लाहला सांगुन रिते होवून जाणे.‌ पुढे चांगले संस्कार मुल्यं शिकण्याची, जोपासण्याची तय्यारी करणे व  आयुष्यातील पुढील पडावासाठी - प्रवासासाठी तयारी सुरू केली पाहिजे  तर  मनुष्य या जगात पण प्रगती करतो व अंतिम प्रवासाचीही म्हणजे मृत्यूनंतरची यशस्वी होण्यासाठीही तय्यारी करतो " अर्थात  दुनिया भी और आखिरत भी बनानी होती है ! "   दोन्ही ठिकाणीचा फायदाच फायदा ..आज लैलतुल जा-य-जा ला फायदा उचलला गेला पाहिजे, भरपूर तिलावत करुन अल्लाह रब्बुल आलमीन ला राजी करून देशाच्या शांततेसाठीही दुआ याचना करून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी दुआ याचना करणे.

                 तसेच हे फक्त रमजान स्पेशल पुरतेच न थांबता बारा ही महिने सबाब -पुण्यं कमवायला हवेत, सेवा कार्य सतत करणं याच   गोष्टींना- " सदका - ए-जारीया " म्हणतात,लोक कल्याणकारी कामे केल्याने सुद्धा सबाबच भेटतं. 

                  प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ,दिन- दिईन- (धर्म) म्हणजे काय ?,

   प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांनी उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य  तोंडातून उच्चारले ," अद  दिईन नु नसीह !,"अद दिईन नु  नसीह !!, "अद दिईन नु नसीह !!!

      अर्थात :- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) !!

                   !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌‌ ) !!,

                    !! लोक कल्याण हाच दिईन ( धर्म )!!!उदाहरणार्थ :- (१) स्वतः साठी जी दुआ याचना मागतो, त्यामधे दुसऱ्या लोकांसाठी निरोगी आयुष्यासाठीही दुवा मागणे, आजारी रुग्णांसाठी ते निरोगी व्हावे म्हणून अल्लाह जवळ दुआ मागणे, इतर गरजेचे वेळी दुआ याचना करणे ,(२) मुलांसाठी  चांगले संस्कार मुल्यं शिक्षण द्यावीत, (३) दुसऱ्यांना चांगले उपयोगी सल्ले द्यावीत ; चुकीचे सल्ला देऊ नयेत,चुकीच्या गोष्टी पासून लोकांना सावधान करावेत,(४) दुसऱ्यासबघून चेहऱ्यावर हास्य यावेत,त्यांचे हासून स्वागत करावे ,(५) कुठल्याही अडचणींसमयी मदतीस धावून जावेत,आपल्या कुवतीप्रमाणे होईल तेवढी मदत करावी, (६) समोरच्याला वेळप्रसंगी काम यावे ,खास वेळे काढून वेळ द्यावा, (७ ) चांगल्या प्रकारे शिक्षण द्यावीत, मुलांना संस्कार -संस्कृती- रितीरिवाज -परंपरा- मुल्य शिक्षण द्यावीत, (८ ) आणिबाणीच्या परिस्थिती त्यांना धीर द्यावा, (९ ) वाईट सवयी लागल्या असतील तर त्यांना वारंवार चांगले संस्कार देऊन ,त्या  वाईट सवयींपासून परावृत (अलिप्त) व्हायला मदत करावी. मोटीवहेशनल शिबीर राबवावित, (१०) प्रत्येकाशी अदबीने व शांत धीम्या आदरयुक्त भावनेतून बोलावे ,हितगुज करावेत, (११)   भांडणे करूच नये,वाद विवाद टाळावेत, किंवा नजर अंदाज करावेत , (१२) प्रत्येकांचा आदर सन्मान करावा, (१३) शेजारी, मित्र ,आप्त परिवाराच्या सुख दुःखात सहभागी होऊन मदत करावी, (१४) ज्या परंपरा रितीरिवाज त्रासदायक आहेत त्यांना हद्दपार करावेत, (१५) शक्यतो मित्रांमध्ये,परीवारात, समाजातील लोकांमध्ये मेलमिलाफ,समेट करावं.घडवावे, (१६) कोणी आपल्या चांगल्या विचारांपासून भटकत असेल तर त्याला चांगल्याप्रकारे समुपदेशन  देऊन सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे.(१७) रस्त्याने चालत असताना रस्त्यावरील लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या वस्तू बाजुला कराव्यात. (१८) उन्हाळ्याच्या दिवसांत पाणपोई सुरू करावीत, (१९) शाळा,मदरसा, कॉलेज, शिक्षण संस्था उभाराव्यात ,(२०) धर्मदाय दावाखाने चालू करावीत, (२१) झाडं लावावीत व निसर्गाचं संवर्धन करावेत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तुची देखभाल करावीत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारची हानी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

          .इ.अनेक गोष्टी या मानवी कल्याणासाठी अल्लाह जवळ " सबाब - ए- जारीया ' मध्ये येतात  . तुम्ही केलेल्या गोष्टी जो पर्यंत या जगात त्यांच्यांमुळे लोकांना फायदा होतो ,तो पर्यंत तुम्हाला सबाब भेटत राहील. यालाच सबाब - ए ,- जारीया म्हणतात. (कायम भेटणारे पुण्यं) अर्थात  तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर ही त्याचं पुण्यं (सबाब) भेटेल. 

अशा पुष्कळशा समाजोपयोगी गोष्टी आहेत ते बारांही महीने केल्याने तुम्हाला सबाबच भेटेल, तिचं एखादी चांगली गोष्ट तुम्हाला  तुमच्या कयामतच्या अंतिम दिवशी तुम्हाला जन्नतुल फिरदौस स्वर्गात जाण्यासाठी जरूर कामी येईल, तर शक्य असेल तेव्हा प्रत्येक समाजातील लोकांची मदत होईल तेवढी करावी...

    विशेष गोष्ट म्हणजे :- अंतिमतः  आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार मानतो, जेवढं आभार मानले तेवढे थोडेच राहतील,महिनाभर ," इस्लाम समजून घेताना" लेख मालिका रोज काळजीपुर्वक वाचुन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवलीत.यासाठी सर्वांचे खुप खुप मनापासून धन्यवाद मानतो. त्यात प्रामुख्याने 

(१) दैनिक राष्ट्र सह्याद्री चे संपादक मा.श्री.करण नवले साहेब,आणि दैनिक राष्ट्र सह्याद्री वृत्तपत्र समुहाचे खुप मनापासून आभार मानतो ,

(२) दैनिक शौर्य स्वाभिमानचे

खंबीर मार्गदर्शक तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक साईसंध्याचे संपादक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, संपादक मा.श्री.उद्धव फंगाळ साहेब, व्यवस्थापकीय संपादिका सौ.किरण वाघ मॅडम आणि संपादक मंडळ तथा दैनिक शौर्य स्वाभिमान वृतपत्र समुह मेहकर जि.बुलढाणा, (३) दैनिक समतादुत चे संपादक इंजि. मोहसीन शौकत शेख आणि संपादक मंडळ,, (४) आंतरराष्ट्रीय वर्ल्ड पार्लमेंट न्यूज बुलेटीन  शाखा श्रीरामपूर चे क्रिकेट अंपायर ,समालोचक तज्ज्ञ श्री. दत्ता विघावे सरांनी २१० देशात मालिका पोहोचवण्याचं मोठं काम केलेत. 

(५) माहिती व कायदा वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल बेलापूर चे अस्लमभाई सय्यद, अमन सय्यद, आणि संपादक मंडळ, (६) दैनिक बिनधास्त न्यूज चे अस्लमभाई बिनसाद, (७) दैनिक धुमाकूळचे इम्रान मुसा पटेल, (८) दैनिक मेमन रिपोर्टर चे अफजलभाई मेमन, (९) शेवगाव ताजी खबरे चे अलीमभाई शेख, (१०) दैनिक कॉमन न्युजचे अलताफभाई शेख, अहमदनगर , पुणे , मुंबई, ठाणे , सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कराड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नासिक, जळगाव,धुळे,नांदुरबार, नागपूर,येथील दैनिकांनी व बहुतांश साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल्स संपादकांनी आपल्या प्रसार माध्यमांतील जागेच्या हिशोबाने सदरील मालिका प्रकाशित केली, आणि वाचक वर्गाने देखील यास भरभरुन साथ दिली.या सर्वांच्या सहकार्यामुळेच लेखन मालिका लिहीण्याची मला संधी प्राप्त झाली.करीता या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे.. असेच प्रेम सदैव माझ्या व माझ्या परीवारावर राहु द्यावेत,भारतात सर्व धर्म समभाव एकता अखंडता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न व दुआ करीत रहावेत ही नम्र विनंती .

सर्व वाचकांना, हितचिंतकांना, पत्रकार,संपादक महोदयांना ईद च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा -ईद मुबारक

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 मोबा: ९२७१६४००१४ 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget