*"इस्लाम समजून घेताना"*
प्रेषित मुहम्मद स्व.सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ; दिन-दिईन- (धर्म) म्हणजे काय ??.
यावर प्रेषित स्व.सल्लम यांनी तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की, अद दिईन नु नसीह ! , अद दिईन नु नसीह !! , अद दिईन नु नसीह !!!,
अर्थात:- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) ,
!! लोक कल्याण हाच दिईन (धर्म ), !!
!! लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) !! आहे...
! आज जुम्मातुल विदाह - व लैलतुल जा-य-जा ची अवलोकनाची रात्रं...!!
विदाह - या शब्दाचा अर्थ होतो अंतिम, पुन्हा परत न येण्यासाठी,आपण कालच्या लेखात उल्लेख केला होता अंतिम विदाह - म्हणजेच अखेरच्या पुन्हा परत न येण्याच्या प्रवासाला तसेच प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या हज्जतुल- विदाह,लग्नाच्या दिवशी मुलीला विदाह करतात त्याला ही विदाह म्हणून संबोधतात,असो.
रमजान महीन्यातील शेवटच्या जुम्माला -जुम्मातुल विदाह म्हणतात,याचं महत्त्व फार आहे, प्रत्येक जुम्माला एक क्षण महत्वपूर्ण असतो,त्यावेळी प्रत्येक दुआ याचना कबुल (पुर्ण) होतात, रमजान विदाह तर अजुनही महत्वाचे असणार त्या मंगलमय क्षणांची संधी साधण्यात मोठेपणा असून आदली रात्र लैलतुल कद्रची हजारों महीन्यांची एकच कद्र च्या रात्रींचाही फायदा उचलला पाहिजे.
आज जुम्माची येणारी रात्र " लैलतुल जा-य-जा "- अर्थात उर्दू शब्द आहे, आपल्या प्रत्येक कामाचं जायजा घेणं ; मराठीत " अवलोकन "होतो. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्यक्तींच्या महत्वपूर्ण गुणात एक खास गुण बघायला मिळातो,तो स्वतःच - स्वतः चे अवलोकन करणं, काय चुकलं ? काय साध्य करायचे ? काय बाकी आहेत ?, छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये चुकीचं झालेत का ? , मग काय बरोबर केले पाहिजेत ?, याचं अवलोकन करणं.चुका झाल्याशिवाय सुधारणा होत नसते. मग माणुस चुकीतूनच पुढे शिकत असतो. चुकांची गोळाबेरीज करून पुन्हा पुढे जायचं आहेत; सुधारणा करायची आहे ती आजच्या लैलतुल जा-य-जा व लैलतुल कद्र च्याच रात्रीमध्ये , अल्लाह जवळ क्षमा - दया - याचना करून पुन्हा -पुन्हा चुकीचे होणार नाहीत हे स्पष्ट शब्दात अल्लाह जवळ सांगणे,
उदाहरणार्थ:- आपल्या खास जवळच्या मित्राला सर्व खासगी गोष्टी सांगतो, त्या खाजगी गोष्टी मित्र सोडून कोणालाही सांगत नाहीत अशा आयुष्यातील प्रत्येक लहानाहुन -ही -लहान खाजगी गोष्टी ही अल्लाह जवळ एका मित्रांसारखंच सांगणे, तो अल्लाह आहे व्यक्तिगत म्हणणं पुर्ण (कबुल) करतात, म्हणुनच त्यांना अल्लाह म्हणतात.
पापं - गुन्हे - चुका अल्लाहला सांगुन रिते होवून जाणे. पुढे चांगले संस्कार मुल्यं शिकण्याची, जोपासण्याची तय्यारी करणे व आयुष्यातील पुढील पडावासाठी - प्रवासासाठी तयारी सुरू केली पाहिजे तर मनुष्य या जगात पण प्रगती करतो व अंतिम प्रवासाचीही म्हणजे मृत्यूनंतरची यशस्वी होण्यासाठीही तय्यारी करतो " अर्थात दुनिया भी और आखिरत भी बनानी होती है ! " दोन्ही ठिकाणीचा फायदाच फायदा ..आज लैलतुल जा-य-जा ला फायदा उचलला गेला पाहिजे, भरपूर तिलावत करुन अल्लाह रब्बुल आलमीन ला राजी करून देशाच्या शांततेसाठीही दुआ याचना करून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी दुआ याचना करणे.
तसेच हे फक्त रमजान स्पेशल पुरतेच न थांबता बारा ही महिने सबाब -पुण्यं कमवायला हवेत, सेवा कार्य सतत करणं याच गोष्टींना- " सदका - ए-जारीया " म्हणतात,लोक कल्याणकारी कामे केल्याने सुद्धा सबाबच भेटतं.
प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ,दिन- दिईन- (धर्म) म्हणजे काय ?,
प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांनी उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य तोंडातून उच्चारले ," अद दिईन नु नसीह !,"अद दिईन नु नसीह !!, "अद दिईन नु नसीह !!!
अर्थात :- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) !!
!! लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) !!,
!! लोक कल्याण हाच दिईन ( धर्म )!!!उदाहरणार्थ :- (१) स्वतः साठी जी दुआ याचना मागतो, त्यामधे दुसऱ्या लोकांसाठी निरोगी आयुष्यासाठीही दुवा मागणे, आजारी रुग्णांसाठी ते निरोगी व्हावे म्हणून अल्लाह जवळ दुआ मागणे, इतर गरजेचे वेळी दुआ याचना करणे ,(२) मुलांसाठी चांगले संस्कार मुल्यं शिक्षण द्यावीत, (३) दुसऱ्यांना चांगले उपयोगी सल्ले द्यावीत ; चुकीचे सल्ला देऊ नयेत,चुकीच्या गोष्टी पासून लोकांना सावधान करावेत,(४) दुसऱ्यासबघून चेहऱ्यावर हास्य यावेत,त्यांचे हासून स्वागत करावे ,(५) कुठल्याही अडचणींसमयी मदतीस धावून जावेत,आपल्या कुवतीप्रमाणे होईल तेवढी मदत करावी, (६) समोरच्याला वेळप्रसंगी काम यावे ,खास वेळे काढून वेळ द्यावा, (७ ) चांगल्या प्रकारे शिक्षण द्यावीत, मुलांना संस्कार -संस्कृती- रितीरिवाज -परंपरा- मुल्य शिक्षण द्यावीत, (८ ) आणिबाणीच्या परिस्थिती त्यांना धीर द्यावा, (९ ) वाईट सवयी लागल्या असतील तर त्यांना वारंवार चांगले संस्कार देऊन ,त्या वाईट सवयींपासून परावृत (अलिप्त) व्हायला मदत करावी. मोटीवहेशनल शिबीर राबवावित, (१०) प्रत्येकाशी अदबीने व शांत धीम्या आदरयुक्त भावनेतून बोलावे ,हितगुज करावेत, (११) भांडणे करूच नये,वाद विवाद टाळावेत, किंवा नजर अंदाज करावेत , (१२) प्रत्येकांचा आदर सन्मान करावा, (१३) शेजारी, मित्र ,आप्त परिवाराच्या सुख दुःखात सहभागी होऊन मदत करावी, (१४) ज्या परंपरा रितीरिवाज त्रासदायक आहेत त्यांना हद्दपार करावेत, (१५) शक्यतो मित्रांमध्ये,परीवारात, समाजातील लोकांमध्ये मेलमिलाफ,समेट करावं.घडवावे, (१६) कोणी आपल्या चांगल्या विचारांपासून भटकत असेल तर त्याला चांगल्याप्रकारे समुपदेशन देऊन सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे.(१७) रस्त्याने चालत असताना रस्त्यावरील लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या वस्तू बाजुला कराव्यात. (१८) उन्हाळ्याच्या दिवसांत पाणपोई सुरू करावीत, (१९) शाळा,मदरसा, कॉलेज, शिक्षण संस्था उभाराव्यात ,(२०) धर्मदाय दावाखाने चालू करावीत, (२१) झाडं लावावीत व निसर्गाचं संवर्धन करावेत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तुची देखभाल करावीत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारची हानी होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
.इ.अनेक गोष्टी या मानवी कल्याणासाठी अल्लाह जवळ " सबाब - ए- जारीया ' मध्ये येतात . तुम्ही केलेल्या गोष्टी जो पर्यंत या जगात त्यांच्यांमुळे लोकांना फायदा होतो ,तो पर्यंत तुम्हाला सबाब भेटत राहील. यालाच सबाब - ए ,- जारीया म्हणतात. (कायम भेटणारे पुण्यं) अर्थात तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर ही त्याचं पुण्यं (सबाब) भेटेल.
अशा पुष्कळशा समाजोपयोगी गोष्टी आहेत ते बारांही महीने केल्याने तुम्हाला सबाबच भेटेल, तिचं एखादी चांगली गोष्ट तुम्हाला तुमच्या कयामतच्या अंतिम दिवशी तुम्हाला जन्नतुल फिरदौस स्वर्गात जाण्यासाठी जरूर कामी येईल, तर शक्य असेल तेव्हा प्रत्येक समाजातील लोकांची मदत होईल तेवढी करावी...
विशेष गोष्ट म्हणजे :- अंतिमतः आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार मानतो, जेवढं आभार मानले तेवढे थोडेच राहतील,महिनाभर ," इस्लाम समजून घेताना" लेख मालिका रोज काळजीपुर्वक वाचुन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवलीत.यासाठी सर्वांचे खुप खुप मनापासून धन्यवाद मानतो. त्यात प्रामुख्याने
(१) दैनिक राष्ट्र सह्याद्री चे संपादक मा.श्री.करण नवले साहेब,आणि दैनिक राष्ट्र सह्याद्री वृत्तपत्र समुहाचे खुप मनापासून आभार मानतो ,
(२) दैनिक शौर्य स्वाभिमानचे
खंबीर मार्गदर्शक तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक साईसंध्याचे संपादक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, संपादक मा.श्री.उद्धव फंगाळ साहेब, व्यवस्थापकीय संपादिका सौ.किरण वाघ मॅडम आणि संपादक मंडळ तथा दैनिक शौर्य स्वाभिमान वृतपत्र समुह मेहकर जि.बुलढाणा, (३) दैनिक समतादुत चे संपादक इंजि. मोहसीन शौकत शेख आणि संपादक मंडळ,, (४) आंतरराष्ट्रीय वर्ल्ड पार्लमेंट न्यूज बुलेटीन शाखा श्रीरामपूर चे क्रिकेट अंपायर ,समालोचक तज्ज्ञ श्री. दत्ता विघावे सरांनी २१० देशात मालिका पोहोचवण्याचं मोठं काम केलेत.
(५) माहिती व कायदा वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल बेलापूर चे अस्लमभाई सय्यद, अमन सय्यद, आणि संपादक मंडळ, (६) दैनिक बिनधास्त न्यूज चे अस्लमभाई बिनसाद, (७) दैनिक धुमाकूळचे इम्रान मुसा पटेल, (८) दैनिक मेमन रिपोर्टर चे अफजलभाई मेमन, (९) शेवगाव ताजी खबरे चे अलीमभाई शेख, (१०) दैनिक कॉमन न्युजचे अलताफभाई शेख, अहमदनगर , पुणे , मुंबई, ठाणे , सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कराड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नासिक, जळगाव,धुळे,नांदुरबार, नागपूर,येथील दैनिकांनी व बहुतांश साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल्स संपादकांनी आपल्या प्रसार माध्यमांतील जागेच्या हिशोबाने सदरील मालिका प्रकाशित केली, आणि वाचक वर्गाने देखील यास भरभरुन साथ दिली.या सर्वांच्या सहकार्यामुळेच लेखन मालिका लिहीण्याची मला संधी प्राप्त झाली.करीता या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे.. असेच प्रेम सदैव माझ्या व माझ्या परीवारावर राहु द्यावेत,भारतात सर्व धर्म समभाव एकता अखंडता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न व दुआ करीत रहावेत ही नम्र विनंती .
सर्व वाचकांना, हितचिंतकांना, पत्रकार,संपादक महोदयांना ईद च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा -ईद मुबारक
डॉ.सलीम सिकंदर शेख
मोबा: ९२७१६४००१४
Post a Comment