डाँक्टर मुकुंद व्यास यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुरच्या अध्यक्षपदी निवड
बेलापुर (प्रतिनिधी )-श्री जुने बालाजी मंदिर बेलापुर चे अध्यक्ष श्री हरिप्रसाद जी व्यास यांचे सुपुत्र तसेच राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार पूजनीय स्वामीजी श्री गोविन्द देवगिरिजी महाराज व भागवताचार्य पंडीत महेशजी व्यास यांचे पुतणे डाॅ श्री मुकुंद हरिप्रसाद व्यास यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुर च्या अध्यक्ष (डीन )पदी नियुक्ति झाली असुन त्यांच्या नियुक्तीने बेलापुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे मागील वर्षी डाँक्टर मुकुंद व्यास यांनी प्रोफेसर म्हणून त्यांना पदभार स्विकारला होता आता त्यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुरच्या अध्यक्षपदी (डीन )निवड करण्यात आलेली आहे त्यांची इतक्या मोठ्या संस्थेवर नियुक्ति मुळे बेलापुरच्या वैभवाता आणखी भर पडली आहे या नियुक्ति बद्दल जि.प सदस्य शरदराव नवले,जनता आघाडीचे अध्यक्ष रविंन्द्र खटोड, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक, सरपंच महेंद्र साळवे उपसरपंच श्री अभिषेक खंडागळे बेलापुर कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले,भा जा पा चे प्रफुल्ल डावरे माहेश्वरी समाज चे हरिप्रसाद जी खटोड ,जैन समाजाचे श्री शांतिलाल गांधी,छन्याति समाजाचे श्री रमेशजी दायमा,गोसेवक श्री नंदलाल डागा पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा आदिंनी अभिनंदन केले आहे।।
Post a Comment