जनतेचा आमच्यावर विश्वास म्हणून आम्हाला सत्ता मिळतेःमाजी आ.भानुदास मुरकुटे
बेलापूरःकृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतक-यांशी निगडीत आहे.या संस्थेच्या माध्यमातून शेतक-यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तसेच अनेक विकास कामे करावयाची आहेत.यासाठी सत्तेचे पाठबळ लागते.त्यासाठीच महसूल मंञी श्री.राधाकृष्ण विखे,मी आणि करण ससाणे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही कायम जनतेत असतो म्हणूनच आम्हाला सत्ता मिळते हे केवळ निवडणूकांच्या वेळी अवतरणारांनी ध्यानात ठेवावे असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्रीरामपूर सहकार विकास पॕनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे आयोजित मेळव्यात श्री.मुरकुटे बोलत होते.जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे,भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे,साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर,माजी सभापती नानासाहेब पवार,डीपी.डी.सी चे सदस्य बाबासाहेब दिघे,जि.प.सदस्य शरद नवले,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ,भास्कर खंडागळे, रवी खटोड ,सुधीर नवले,अभिषेक खंडागळे, राम पोळ, आदी उपस्थित होते. श्री.मुरकुटे म्हणाले की,श्रीरामपूरची बाजार समितीला उर्जितावस्था मिळवून द्यायची आहे.मुख्य बाजार समितीसह बेलापूर व टाकळीभान येथील उपबाजार समिती येथे जनावरांचे बाजार,कांदा मार्केट सुरु करणे यासह अनेक विकास कामे करावयाची आहेत.तालुक्यात खंडकरी व आकारी पडीत शेतक-यांचे प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक गावांची गावठाण हद्द संपली आहे.गावठाण हद्द वाढीसाठी शेती महामंडळाची जागा मिळवायची आहे.हे सर्व प्रश्न महसूल मंञ्यांशी निगडीत आहेत.महसूल मंञ्यांनी या प्रश्नी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.शेतक-यांचे प्रश्न सोडविणेसाठीच आम्ही युती केली आहे.सत्तेसाठी आम्ही झुकत नाही तर आम्ही नादी लागणारांना घुडगे टेकावयास लावतो. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्हाला सत्ता मिळते हे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करणारांनी ध्यानात घ्यावे असे श्री.मुरकुटे म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांनी केले.देवीदास देसाई यांनी सूञ संचलन केले तर सरपंच महेन्द्र साळवी यांनी आभार मानले.कार्यक्रमास भरत साळुंके,जालिंदर कु-हे,प्रकाश नाईक,शेषराव पवार,भगवान सोनवणे,भाऊसाहेब कुताळ,किशोर नवले,शिवाजी वाबळे,ज्ञानदेव वाबळे,पंडीतराव बोंबले,भास्कर बंगाळ,दत्ता कु-हे ,विलास मेहेञे,प्रकाश नवले,सुधाकर खंडागळे,बाळासाहेब वाबळे,अनिल नाईक,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,रमेश अमोलिक, प्रभात कु-हे,पुरुषोत्तम भराटे,वैभव कु-हे,प्रसाद खरात,सुरेश कु-हे,रामचंद्र राशिनकर,विलास कु-हे ,प्रकाश कु-हे, असिफ बागवान,हाजी ईस्माइलभाई शेख,मोहसीन सय्यद,जीना शेख, जाकीर शेख,आयजुभाई शेख,सुरेश अमोलिक सचिन अमोलिक,रावसाहेब अमोलिक,किशोर बोरुडे,अन्तोन आमोलिक,दिलिप अमोलिक ,प्रशांत लढ्ढा,शांतिलाल हिरण,प्रदीप शेलार,सुभाष शेलार,वैभव कु-हे,अमोल गाढे,महेश कु-हे,सचिन वाघ,विशाल आंबेकर आदिंसह ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment