Latest Post

श्रीरामपूर : अवैध धंद्यामुळे श्रीरामपूरची अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात चर्चा होत आहे. मागील काही महिन्यात अवैध धंदे बंद करावे, या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांनी अनेकदा उपोषणे, तक्रारी केल्या. परंतु, पोलीस प्रशासनाला अवैध धंदे कायमस्वरूपी बंद केलेच नाही. 'समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफभाई जमादार हे श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत असून आजपासून (दि.5) जमादार यांनी शहरातील गांधी चौकात साखळी उपोषणास सुरवात केली आहे. यापूर्वी जमादार यांनी 22 मार्च 2022 रोजी 4 दिवस आमरण उपोषण केले होते. उपोषणास विविध पक्ष, संघटनांच्या पाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. शिव स्वराज्य मंचचे संस्थापक सलमान पठाण यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.समजावादीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जामादार यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही अवैध धंदे बंद झाले नाही. श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील सर्वच अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करून अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावे.  दि. १० नोव्हेंबर रोजी लेखी निवेदन देऊनही पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे गुटखा,मटका , पत्त्यांचे क्लब,सोरट वगैरे असे विविध प्रकारचे सर्वच अवैध व्यवसाय हे सर्रासपणे खुलेआम सुरुच असल्यामुळे नाईलाजाने आज (दि.०५ ) पासून मेनरोडवरील म. गांधी यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले. निवेदनाच्या प्रति वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या आहेत.


उपोषणास भाजपाचे मारुती बिंगले, पत्रकार विलास भालेराव, आपचे हरिभाऊ तुवर, यांनी भेट दिली. शिव स्वराज्य मंचचे संस्थापक सलमान पठाण, योगेश चव्हाण, युसूफ शेख, हारून तांबोळी, दीपक आव्हाड, चंदू परदेशी, अहमद शेख, लक्ष्मण वाडीतके यांनी पठिंबा दिला.

श्रीरामपूर प्रतिनिधी:- ६ डिसेंबर या दिवशी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण, व बाबरी मशीद पडल्याने या दिवशी,कोणताही अनुचित प्रकार घडून. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यास येत असल्याने. त्यांच्या सुविधे करिता, श्रीरामपूर पोलीस विभागात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर पोलीस उपविभागात.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी,सपोनि ज्ञानेश्वर थोरात, यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गासह,तालुका हद्दीतील हेरेगाव उंदिरगाव परिसरात १५ अधिकारी व 120 कर्माचारी यांनी पथ संचलनात सहभागी झाले होते. ज्यात  सपोनि जीवन बोरसे, सपोनि विठ्ठल पाटील, पोसई सुरेखा देवरे ,पोसई समाधान सुरवडे, पोसई रावसाहेब शिंदे,पोसई अतुल बोरसे, पोसई संजय निकम,यांच्या सह श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस तसेच राज्य राखीव दलचे जवान उपस्थितीत होते.









श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुरकरांनी मला भरभरुन प्रेम दिल्यामुळे त्या प्रेमाची उतराई कामाच्या माध्यमातून करणे हे माझे कर्तव्य असुन सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्यिकरीता मी सदैव बांधील आहे असे उद़्गार आमदार लहु कानडे यांनी काढले आमदार लहु कानडे यांच्या विकास निधीतुन रेव्हेन्यू हौसींग सोसायटी श्रीरामपुर या ठिकाणी ओपन जिमचे साहीत्य देण्यात आले त्या वेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की मी सर्व प्रथम या सोसायटीचाच रहीवासी होतो त्यामुळे येथील समस्यांची मला जाण असुन त्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे असेही आ. कानडे म्हणाले  या वेळी बोलताना अँड बाळासाहेब देशमुख म्हणाले की

आमदार कानडे हे या सोसायटीचे जुने रहीवासी आहेत यापूर्वीही आमदार कानडे यांनी या भागातील अनेक समस्या सोडविल्या पुढील काळातही असेच सहाकार्य लाभो असा आशावाद अँड देशमुख यांनी व्यक्त केला सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर आरोटे म्हणाले की आमदार कानडे यांनी या सोसायटीस ओपन जिम देवुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेतली तसेच अंतर्गत रस्ते अंत्यत खराब झाले आसुन ते दुरुस्त करावेत अशी मागणी केली या वेळी माजी नगर सेवक अशोक कानडे नगरसेवक प्रकाश ढोकणे सोसायाटीचे व्हा चेअरमन राजेंद्र त्रीभुवन एस एस नाईक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक अरुण धर्माधिकारी रिजवान शेख इम्रान पठाण प्रविण पंडीत श्रीमती शकुंतला देशमुख प्रकाश वराडे शिवाजी गोसावी एस आर नवले छबुराव शिंदे बख्तियार खान आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अँड बाळासाहेब देशमुख यांनी केले तर सूत्रसंचलन रज्जाक पठाण यांनी केले

अहमदनगर प्रतिनिधी-अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करत आसतानापोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, कोल्हार बु, ता. राहाता येथे दोन इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी घेवुन येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/दिनकर मुंडे, पोसई/सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ/विजय वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप दरदंले, पोकॉ/रणजीत जाधव व चापोना/भरत बुधवंत यांनी मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने गोसावी वस्ती, कोल्हार बुा, ता. राहाता येथील एका पत्र्याचे शेड जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना दोन इसम पत्र्याचे शेडमध्ये बसलेले दिसले. बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम असल्याची पथकाची खात्री होताच संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना ते पळुन जावु लागले यावेळी पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले 
त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नावे 1) रविंद्र भाऊसाहेब थोरात वय 30, रा. कुरणपुर, ता. श्रीरामपूर व 2) बाळासाहेब भिमराज थोरात वय 59, रा. कोल्हार बुा, ता. राहाता असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेता अंगझडतीमध्ये 3 गावठी बनावटीचे कट्टे व 6 जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील दोन्ही इसमांकडे गावठीकट्टे व काडतुस बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन तपास केला असता त्यांनी सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे विक्री करीता आणल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपींकडे 3 गावठी कट्टे व 6 जिवंत काडतूस असा एकुण 91800/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोकॉ/2514 रणजीत पोपट जाधव ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 608/2022 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कायदेशिर कार्यवाही लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उविपोअ शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
 

श्रीरामपुर प्रतिनिधि-क्रांति गुरू लहुजी साळवे यांचे विचारने काम करणाय्रा व्याक्तिंच्या कामांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना वेगवेगळ्या सम्मान पञाने सम्मानित करण्याचा यज्ञ गेल्या अनेक वर्षापासुन सुरू ठेवलेला आहे 

दि,१४/११/२०२२ रोजी क्रांति गुरू लहुजी साळवे यांच्या २२८व्या जयंती सोहळा भारतीय लहुजी सेनाबमार्फत संपूर्ण राज्यभर साजरा होत असलेने   या कार्यक्रमाची सांगता दि , ३०/११/२०२२ रोज़ी श्रीरामपुर येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे क्रांति गुरू लहुजी साळवे जन्म उत्सव सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होते सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथि इंजि के के आव्हाड,  राष्ट्रीय अध्याक्ष  बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा अध्यक्ष रज्जाक भाई शेख, यांचे प्रमुख उपस्थितीत पाहुण्यांना पुरस्कार मानचिन्ह, श्रीफळ, हार व शाल देवून गौरवण्यात आले .


   सदर जयंती उत्सावाकरीता लहुजी गर्जना आर्केस्ट्रा गित गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रामात राज्यप्रमुख सुरेश अढागळे, जिल्हा कार्यअध्यक्ष शांतवन खंडागळे, महंत नारायणगिरी महाराज, औरंगाबाद जिल्हा प्रमुख शकील शेख, या प्रमुख अतिथि यांनी प्रमुख्याने कार्यक्रमास हजर राहुन या कार्यक्रमास यशस्वी करण्यास प्रयत्न केले सदर कार्यक्रमात लहुजी सेनेचे रईस भाई शेख यांना युवा उद्योजक या पुरस्काराने गौरवण्यात आले ह भ प प्रतिभाताई जाधव यांना  समाज जागृति पुरस्काराने गौरवण्यात आले हभप ज्ञानेश्वर महाराज अढाव याना अनाथाच्या कार्यबद्दल नाथ पुरस्काराने गौरवण्यात आले, अर्जुन भाऊ दाभाडे याना हिंदु रक्षक  पुरस्काराने गौरवण्यात आले, तर राजेंद्र आल्हाट यांना वॄक्षमित्र पुरस्काराने गौरवण्यात आले, भाऊसाहेब शेलार समाज मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले राजेश घोरपडे साहेब श्रीरामपुर भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, हाजी लतीफ भाई सय्यद याना मौलाना आजाद समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, अजहर भाई शेख याना डॉ अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आले, ऑड लतीफ शेख याना विधि सेवक या पुरस्काराने गौरवण्यात आले, आसलम बिनसाद याना बाळशास्त्री जांभेळकर समाज प्रबोधन भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले सोहेल भाई शेख युवा भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, सुभाष दादा त्रिभुवन यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, विजय भाऊ पवार यांना नवयुवक स्वाभिमान पुरस्कारने गौरवण्यात आले मंजूषा ताई ढोकचौळे यांना आदर्श महिला समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले निलेश मोहन एडके यांना  युवागौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, ऑड  लक्ष्मीकांत दुधकवडे याना लोक न्याय रक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले सुनिल शिदे याना कृषिभुषण पुरस्काराने गौरवण्यात आले अभिमान कामळे याना क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, आनंद बोधरा याना उद्योजक रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले सुनील सकट याना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले ,   रंजीत बारहाळीकर याना कुशल संघटन पुरस्काराने गौरवण्यात आले,    जगन्नाथ कोरडे याना कृषिसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले, बाळासाहेब कदम यांना प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने गौरवण्यात  आले सौ रूपाली नवले यांना आदर्श शिक्षका या पुरस्काराने गौरवण्यात आले तौफीक पठाण यांना कोविड योध्दा या पुरस्काराने गौरवण्यात आले,  

     सदर कार्यक्रम यशस्वीकरीता राजेंद्र ञिभुवन ,सिकंदर ताबोली,फैजन पठान, शुभंम बाळासाहेब बागुल, संदीप शेडगे सलमान पठान, मेहमुद पठान, रमेज पोपटीया, रमेश खामगर,  विशाल मोज़े युसुफ शेख, संजय ससाने विजय शेलार ,बाबा शिदे बरकत अली  शेख, अब्दुल शेख, खाजेखर, संतोष मोकळ,अकबर भाई शेख, मुसा पटेल ताराचंद खंडागळे, रामभाऊ पिंगळे ,भाऊसाहेब आव्हाड, सोमनाथ गायकवाड़, मंगलाताई चव्हाण ,मिसाळ साहेब ,आसीफ शेख, आमजन कुरेशी शेरू कुरेशी,मतीन कुरेशी, साबिर शाह संजय शिरसाठ राजू शेलार रमजान शेख, आदि कार्यकत्यानी  विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्रात मोठ्या  प्रमाणातुन कार्यकर्ते उपस्थित होते .तसेच शेवटी औरंगाबाद जिल्हा प्रमुख शकील शेख यांनी या सर्वाचे आभार व्याक्त केले .

अहमदनगर प्रतिनिधी-पोलिस.निरिक्षक.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा इसम पाथर्डी तालुक्यातील करंजी गांवातील बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाथर्डी तालुक्याती करंजी गांवातील बस स्टॅण्ड, येथे जावून सापळा लावुन थोड्याच वेळात एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसला. पोलीस पथकाची खात्री   झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) शेरखान मुबारक पठाण, वय 35, रा. करंजी, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 25,300/- रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हा पाथर्डी परिसरात एक (01) गावठी कट्टा व एक (01) जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकॉ/विनोद शिवाजी मासाळकर नेमनुक  स्थागुशा यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संदीप मिटके साहेब, उविपोअ श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



श्रीरामपूर : आगामी होऊ घातलेल्या,  राहाता तालुक्यातील रांजनखोल ग्रामपंचायत निवडणुकीत,वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याची अधिकृत माहिती, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशालभैया कोळगे व चरणदादा त्रिभुवन यांनी दिली असून. १८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत, गावातील घराणेशाही तसेच राजकीय मक्तेदारी मोडून काढण्यासाठी. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब वाघ यांच्या पत्नी सौ विजया ताई वाघ यांच्या सरपंच पदासाठीच्या  उमेदवारीवर शिक्का मूर्तब करण्यात आला असून. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सौ विजया ताई वाघ यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याची माहिती.वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशालभैया कोळगे व चरणदादा त्रिभुवन यांनी घेतलेल्या बैठकीत दिली आहे. तसेच सर्व समावेश आणि गावाच्या पारदर्शी कारभारासाठी, रांजनखोल ग्रामपंचायत निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget