उपोषणास भाजपाचे मारुती बिंगले, पत्रकार विलास भालेराव, आपचे हरिभाऊ तुवर, यांनी भेट दिली. शिव स्वराज्य मंचचे संस्थापक सलमान पठाण, योगेश चव्हाण, युसूफ शेख, हारून तांबोळी, दीपक आव्हाड, चंदू परदेशी, अहमद शेख, लक्ष्मण वाडीतके यांनी पठिंबा दिला.
अवैध धंद्यामुळे श्रीरामपूर राज्यात बदनाम : अवैध धंदे बंद कायमस्वरूपी बंद झालेच पाहिजे ; 'समजावादी पार्टी'चे श्रीरामपुरात साखळी उपोषण सुरु
श्रीरामपूर : अवैध धंद्यामुळे श्रीरामपूरची अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात चर्चा होत आहे. मागील काही महिन्यात अवैध धंदे बंद करावे, या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांनी अनेकदा उपोषणे, तक्रारी केल्या. परंतु, पोलीस प्रशासनाला अवैध धंदे कायमस्वरूपी बंद केलेच नाही. 'समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफभाई जमादार हे श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत असून आजपासून (दि.5) जमादार यांनी शहरातील गांधी चौकात साखळी उपोषणास सुरवात केली आहे. यापूर्वी जमादार यांनी 22 मार्च 2022 रोजी 4 दिवस आमरण उपोषण केले होते. उपोषणास विविध पक्ष, संघटनांच्या पाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. शिव स्वराज्य मंचचे संस्थापक सलमान पठाण यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.समजावादीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जामादार यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही अवैध धंदे बंद झाले नाही. श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील सर्वच अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करून अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावे. दि. १० नोव्हेंबर रोजी लेखी निवेदन देऊनही पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे गुटखा,मटका , पत्त्यांचे क्लब,सोरट वगैरे असे विविध प्रकारचे सर्वच अवैध व्यवसाय हे सर्रासपणे खुलेआम सुरुच असल्यामुळे नाईलाजाने आज (दि.०५ ) पासून मेनरोडवरील म. गांधी यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले. निवेदनाच्या प्रति वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या आहेत.
Post a Comment