नेवासा : मागील काही आठवड्यांपूर्वी नेवासा फाटा येथील हॉटेल औदुंबरवर येथे देह विक्री संदर्भात कारवाई झाल्या संदर्भात विविध प्रसार माध्यमातून,वृत्त प्रसारित करण्यात आले होते. मात्र वास्तविक पाहता सदरची कारवाई हॉटेल औदुंबर येथे नसून. हॉटेल पासून ५ हजार फुटावर नेवाश्याच्या दिशेने असलेल्या. औदुंबर लॉज येथे झाली होती. केवळ नावातील समानतेचा गैरफायदा घेऊन. काही विघ्नसंतोषी प्रवृतीच्या लोकांनी चुकीच्या अफवा पसरून. कोणताही संबंध नसतांना, अनेक वर्षांपासून दर्जेदार आणि प्रामाणिकपणे.असंख्य ग्राहकांना सेवा देणाऱ्या हॉटेल औदुंबरची बदनामी करण्याचे षड्यंत्रामुळे, हॉटेल औदुंबर उद्योग समूहास, सामजिक प्रतिष्ठेसह, मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. अखेर घडलेल्या प्रकरणा यासंदर्भात, केवळ नावातील समानता आणि चुकीची माहिती देऊन.,लोकप्रियतेचे शिखर गाठणा-या हॉटेल औदुंबरला बदनाम करण्याचे काम केले जात असून. काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईचा आणि हॉटेल औदुंबरचा कोणताही एक संबंध नसल्याची माहिती,हॉटेल औदुंबरला उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या अफवांवर भरोसा ठेऊ नये असे आवाहन हॉटेल औदुंबरचे संचालक राजेंद्र नांगरे पाटील यांनी दिली आहे.
Post a Comment