महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संधेला, पोलीस प्रशासनाचे पथ संचालन.
श्रीरामपूर प्रतिनिधी:- ६ डिसेंबर या दिवशी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण, व बाबरी मशीद पडल्याने या दिवशी,कोणताही अनुचित प्रकार घडून. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यास येत असल्याने. त्यांच्या सुविधे करिता, श्रीरामपूर पोलीस विभागात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर पोलीस उपविभागात.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी,सपोनि ज्ञानेश्वर थोरात, यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गासह,तालुका हद्दीतील हेरेगाव उंदिरगाव परिसरात १५ अधिकारी व 120 कर्माचारी यांनी पथ संचलनात सहभागी झाले होते. ज्यात सपोनि जीवन बोरसे, सपोनि विठ्ठल पाटील, पोसई सुरेखा देवरे ,पोसई समाधान सुरवडे, पोसई रावसाहेब शिंदे,पोसई अतुल बोरसे, पोसई संजय निकम,यांच्या सह श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस तसेच राज्य राखीव दलचे जवान उपस्थितीत होते.
Post a Comment