Latest Post

अहमदनगर जिल्हा श्रीरामपुर, निमगाव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था,श्री.नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने "राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्यसन मुक्तीवर जनजागृतीपर वक्तृत्व स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ तसेच विशेष घटक युवक प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमांतर्गत  रक्तदान शिबिराचे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील न्यू मिलन मंगल कार्यालय याठिकाणी सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते,तसेच यानिमित्ताने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान करत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले,यामध्ये श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले बैतूश्शिफा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर सलीम सिकंदर शेख  यांना,त्यांनी केलेल्या विविध समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन "राज्यस्तरीय समाजरत्न "  पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याचबरोबर विविध क्षेत्रात अनेक समाजोपयोगी कार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही यावेळी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्यामध्ये श्रीरामपूर येथील अलमिजान उर्दू शाळेच्या उपमुख्याध्यापक इक्बाल इस्माईल काकर (सर) यांनाही समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले, शब्दगंध प्रकाशन संघटनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मिराबक्षभाई बागबान (सर) आणि त्यांच्या कन्यारत्न सौ.आरिफाबानो बागवान यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.सदरील कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सुप्रसिद्ध मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकेत भुमिका बजावलेले अभिनेते अशिष सातपुते यांनी उत्कृष्ट विनोदी अदाकारी सादर करत तथा विविध प्रसिद्ध मराठी,हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलावंतांचे हुबेहूब आवाज काढत मिमिक्रीद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले,यावेळी शब्दगंध महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा तथा बेलापूर येथील प्राचार्या सौ. गुंफाताई कोकाटे,खुलताबाद (जि. औरंगाबाद) येथील  प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे (सर) ,लायन्स मिगटाऊन अहमदनगर अध्यक्षा सौ.संपुर्णा सावंत, उद्योजक अजय लामखडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.माधवराव लामखडे, तसेच प्रसिद्ध मराठी कवी आनंदा साळवे, निमगांव वाघाचे सरपंच, उपसरपंच, संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पैलवान नाना डोंगरे आणि सौ. डोंगरे, यासोबतच स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक,परीसरातील तथा जिल्हाभरातील कवी, लेखक, समाजसेवक आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करत सामाजिक अंतर,मास्क आणि सॅनिटायझरचे वापर करत मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला.स्वाभिमानी संपादक सेवा संघ तथा समता फाउंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख, अॅड. मोहसिन शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले जात आहे.

 

लोणी प्रतिनिधी -लोणी, राहुरी आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात लोणी पोलिसांना यश आले आहे.राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील मणियार गल्लीतून 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री फिरोज बशीर मणियार यांचा महेंद्रा कंपनीचा मालवाहू पिकअप किराणा सामानासह घरासमोरून चोरी झाला होता. त्याची तक्रार लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 431/21 नुसार दाखल करण्यात येऊन सहा. फौजदार मरभळ हे तपास करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर पिकअप खंडाळा, ता. श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी फारुख हसन सय्यद याला पिकअपसह ताब्यात घेतले. स.पो.नि. समाधान पाटील यांनी आरोपी फारुख याला बोलते केले. त्याने साकुरी येथील साईल पांडुरंग बनसोडे आणि शिर्डी येथील दौलत यशवंत कदम यांच्याकडून पिकअप घेतल्याची कबुली दिली. लोणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले व चोरी झालेला पिकअप, 4 हजार 360 रुपयांचे किराणा सामान हस्तगत केले.या आरोपींनी राहुरी पोलीस ठाणे व शिर्डी पोलीस ठाणे येथून चारचाकी वाहने चोरल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांनी वाहन चोरांची टोळी जेरबंद केल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. 

 

श्रीरामपूर उपविभागातर्गत सुतगिरणी कक्ष अंतर्गत दि. २१.०१.२०२२ ते ३१.०१.२०२२ पर्यंत विशेष थकबाकी विज बिल वसुली मोहीम चालू करण्यात आली होती. आज दि.२२.०१.२०२२ रोजी वार्ड क्र. २ गोंधवणी रोड येथे विज बिल वसुली पथक विज बिल वसुलीसाठी गेले असता तेथील  थकबाकी असलेल्या  ग्राहकाने(ग्राहकाचे नाव-रोकडे भाऊसाहेब कचरू) यांनी कृष्णा कुसळकर (नि.लिपिक(मांस) व विमल मोरे  (नि.लिपिक(मांस)यांना शिवीगाळ केली  व दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला. सदर ग्राहकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व शिवीगाळ करून  मारण्याचा प्रयत्न करनेकामी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तरी सर्व गाऱ्हाकांना सहकार्य करून वीज बील भरण्याची विनंती महावितरण च्या अधिकारी यांनी केली आहे.


श्रीरामपूर(वातार्हर)- शहरातील मोरगे हॉस्पिटल मेडिकलमध्ये झालेल्या 21 लाख रुपये रक्कमेचा चोरीचा तपास लवकरत लवकर लागावा या मागणीसाठी श्रीरामपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले.शहरातील मोरगे हॉस्पिटल मेडिकल याठिकाणी दिनांक  7 डिसेंबर 2021 रोजी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून 21 लाख रुपयांची मोठी जबरी चोरी करून रक्कम लुटलेली होती या गंभीर लुटमारीचा तपास अद्याप पर्यंत शहर पोलिसांकडून लागलेला नाही सदर चोरीचा त्वरित तपास लागावा आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी श्रीरामपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी पोलीस निरीक्षक  संजय सानप यांना निवेदन देण्यात आले.यावेळी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा निमंत्रित श्री रवींद्रजी गुलाटी, सेन्ट्रल झोन अध्यक्ष शशांक जी रासकर, श्रीरामपूर तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र बधे,सचिव सुजित  राऊत, खजिनदार जालिंदर भवर, ओम नारंग  सचिन  चुडीवाल, रवींद्र  चौधरी, न्यानेश्वरजी मोरगे, बाळासाहेब ढेरांगे, आनंद कोठारी आदी उपस्थित होते.शहरातील गांजा विक्री, अवैध दारू विक्री, ऑनलाइन औषधी द्रव्य सिरिंज व्यसन, तसेच इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत गुंडाळ प्रवृत्तीचे नशेबाज लोक अशा प्रकारची वेगवेगळे व्यसन नशा करून दादागिरी, गुंडगिरी, दरोडे लुबाडणूक  चोऱ्यामाऱ्या, मारामाऱ्या   करून कुठल्याही थरास जायला घाबरत नाहीत असे प्रसंग दररोज शहरात घडत आहेत शहर पोलिसांनी त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा असे जिल्हा निमंत्रक केमिस्ट असोसिएशन चे रवींद्र गुलाटी यांनी यावेळी बोलले तसेच मोरगे हॉस्पिटल मेडिकल च्या चोरीचा तपास त्वरित लावा अन्यथा तालुक्यातील सर्व औषधांचे दुकाने बंद ठेवू असा इशारा नाशिक झोन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री शशांक रासकर यांनी या वेळी  दिला. 


शिर्डी (प्रतिनिधी)येथिल श्री साई संस्थानच्या रुग्णालयात कार्यरत असताना डॉक्टर अभिमन्यू कडू या वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वतःच्या नावावर श्रीरामपूर येथे कोव्हीड केअर सेंटर टाकून संस्थानांच्या नियमाचे उल्लंघन केल्या बद्दल त्यांच्यावर  कारवाई करून त्यांना संस्थान सेवेतून बडतर्फ करावे.या मागणीचे निवेदन  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांना देण्यात आले आहे.श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीचे जोयेफ जमादार यांनी निवेदन श्री साईबाबा संस्थान कार्यालयात दिले आहे. साई संस्थांनला दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अभिमन्यू कडू हे कार्यरत असून ते एमबीबीएस आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावर शासनाच्या नियमाप्रमाणे

एमबीबीएस असल्या कारणाने शासना कडून कोव्हीड केअर सेंटर टाकण्यासाठी मंजुरी घेतली व श्रीरामपूर येथे इतर काही डॉक्टर मित्रांच्या साथीने कोव्हीड केअर सेंटर सुरू केले. मात्र साई संस्थांनमध्ये कार्यरत असणाऱ्या कोणत्याही डॉक्टरला असे दुसऱ्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन करून कुठेही इतर रुग्णालयात वैद्यकीय सेवा करणे किंवा कोव्हीड केअर सेंटर टाकता येत नसतानाही त्यांनी ते टाकले व या कोव्हीड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्ण उपचारार्थ दाखल करून अव्वाच्या सव्वा रुपये कमावले. यासंदर्भात संस्थानने या डॉक्टर अभिमन्यू कडू यांना (मेमो)नोटीसही दिली होती. त्यानंतर डॉक्टर कडू यांनी एक डिसेंबर 2021 रोजी संस्थान रूग्णालयातील नोकरीचा राजीनामा  दिला होता. मात्र तदनंतर 20 दिवसांनी परत 20 डिसेंबरला 2021 हा दिलेला राजीनामा त्यांनी माघारी घेतला व परत ते संस्थान रुग्णालयात कार्यरत आहेत. मात्र संस्थांनच्या कोणताही कर्मचारी, अधिकाऱ्यास संस्थान आस्थापनेवर नेमणूक होताना लेखी घेतले जाते व त्यास संस्थांन शिवाय दुसऱ्या इतर ठिकाणी काम करण्यास मनाई असते. असा नियम असताना डॉक्टर अभिमन्यू कडू यांनी या नियमाचे उल्लंघन करत स्वतःच्या नावावर श्रीरामपूर येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू केले व त्यातून मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा बिले आकारून कमाई केली .यासंदर्भात साई संस्थान प्रशासनाने संस्थांनच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल डॉक्टर अभिमन्यू कडू यांना चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. व संस्थानच्या रुग्णालयातून त्यांना बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी या निवेदनातून श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीचे जोयेब जामदार यांनी केली आहे.


श्रीरामपूर - श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आल्याने त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे.आंबेजोगाई येथे देखील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द होती. आज गुरुवार दिनांक 20 जानेवारी रोजी स्वाती भोर यांनी दिपाली काळे यांच्याकडून श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.


श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी DySp मिटके यांना  याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख 25 हजार रुपये प्रदान करण्यात आले.Dy.s.p.संदीप मिटके यांनी अहमदनगर शहर येथे कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.न.456/2018 भा द वि कलम 376( अ),( ब),354,323,506,34,   पोक्सो अधिनियम.कलम 5( एम), 6, व 17 या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे या कामगिरी करता त्यांना गौरविण्यात आले

आहे.अहमदनगर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.दि. 15/09/2018 च्या 3 ते 4 दिवस अगोदर सायंकाळच्या वेळेस पिडीत मुलगी भराड गल्ली तोफखाना अहमदनगर येथे   बाकड्या जवळ सायकल खेळत असताना आरोपी क्र.1 अफसर लतीफ सय्यद हा पीडित मुलीला बंद घराच्या छतवर् घेऊन गेला तिला विवस्त्र करून हाताने मारहाण केली व् तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला त्यावेळी आरोपी क्र 2 मुन्नी ऊर्फ शमिना लतिफ सय्यद घटनास्थळी आली आणि तिने पीडित मुलीला झालेल्या प्रकाराबाबत तू तुझे घरी कोणाला काही एक सांगू नकोस नाहीतर मी तुझे घरी येऊन तुझे आईला तुझे नाव सांगेल अशी धमकी दिली व तिला तिच्या घरी पाठवून दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी  अफसर लतीफ सय्यद याने पीडित मुलीस  पुन्हा सायंकाळी चे वेळेस त्यात ठिकाणावरील  बाकड्या जवळून उचलून त्यांच्या  घराच्या छतावर नेले आरोपीने पीडित   मुलीस जीवे मारण्याची भीती   दाखवून  तिला विवस्त्र करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला तसेच कोणाला काही सांगू नको नाहीतर मी तुझा जीव घेईल  असे म्हणून घरी पाठवून दिले त्यानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखत असलेने फिर्यादी हि तिला दवाखान्यात चल असे म्हणाली असता पीडित मुलगी  घाबरलेली होती फिर्यादी हिस काही सांगत नव्हती हे पाहून फिर्यादीने तिच्या बहिणीला फोन करून बोलावून घेतले व पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने तीन दिवसापूर्वी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले फिर्यादीने सदर घटनेबाबत तिच्या पतीला सांगितल्यानंतर ते पीडित मुलीस तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी घेऊन गेले सदर घटनेबाबत आरोपीविरुद्ध भा द वि क ३७६( ए)( बी) ३५४,३२३,५०६सह् ३४ तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा( पॉक्सो)२०१२ चे कलम५( एम),६ व१७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्याचे विरोधात राज्यभर पडसाद उमटले होते विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी मोर्चे व आंदोलने करून निषेध व्यक्त केला होता प्रथम या गुन्ह्याचा तपास Psi.विशाल  सणस यांच्याकडे  होता या. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास Dy.s.pसंदीप मिटके  यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी  आरोपी क्र. 1 अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे  संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि 20 वर्षे सश्रम कारावास व ५००००रु दंड आणि दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी क्र. 2) मुन्नी उर्फ शमीना सय्यद वय 52 वर्ष रा.भराड गल्ली मीरावली बाबा दर्गाजवळ तोफखाना जि.अहमदनगर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को 2012 चे   17 व 21 प्रमाणे दोषी धरुन एक महिना  साधी कैद (प्रत्येकी) 500/-दंड व दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. 

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके आणि त्यांचे पथकातील परिविक्षाधीन Dysp पुनम पाटील,PSIविशाल सणस, PSI जया तारडे, ASI भालसिंग, HC सुयोग सुपेकर, PC याकूब सय्यद आदींनी केला.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget