साई संस्थानच्या एका डॉक्टरांकडून नियमभंग! बडतर्फ करण्याची समाजवादी पार्टीच्या जमादार यांची मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी)येथिल श्री साई संस्थानच्या रुग्णालयात कार्यरत असताना डॉक्टर अभिमन्यू कडू या वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वतःच्या नावावर श्रीरामपूर येथे कोव्हीड केअर सेंटर टाकून संस्थानांच्या नियमाचे उल्लंघन केल्या बद्दल त्यांच्यावर  कारवाई करून त्यांना संस्थान सेवेतून बडतर्फ करावे.या मागणीचे निवेदन  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांना देण्यात आले आहे.श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीचे जोयेफ जमादार यांनी निवेदन श्री साईबाबा संस्थान कार्यालयात दिले आहे. साई संस्थांनला दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अभिमन्यू कडू हे कार्यरत असून ते एमबीबीएस आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावर शासनाच्या नियमाप्रमाणे

एमबीबीएस असल्या कारणाने शासना कडून कोव्हीड केअर सेंटर टाकण्यासाठी मंजुरी घेतली व श्रीरामपूर येथे इतर काही डॉक्टर मित्रांच्या साथीने कोव्हीड केअर सेंटर सुरू केले. मात्र साई संस्थांनमध्ये कार्यरत असणाऱ्या कोणत्याही डॉक्टरला असे दुसऱ्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन करून कुठेही इतर रुग्णालयात वैद्यकीय सेवा करणे किंवा कोव्हीड केअर सेंटर टाकता येत नसतानाही त्यांनी ते टाकले व या कोव्हीड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्ण उपचारार्थ दाखल करून अव्वाच्या सव्वा रुपये कमावले. यासंदर्भात संस्थानने या डॉक्टर अभिमन्यू कडू यांना (मेमो)नोटीसही दिली होती. त्यानंतर डॉक्टर कडू यांनी एक डिसेंबर 2021 रोजी संस्थान रूग्णालयातील नोकरीचा राजीनामा  दिला होता. मात्र तदनंतर 20 दिवसांनी परत 20 डिसेंबरला 2021 हा दिलेला राजीनामा त्यांनी माघारी घेतला व परत ते संस्थान रुग्णालयात कार्यरत आहेत. मात्र संस्थांनच्या कोणताही कर्मचारी, अधिकाऱ्यास संस्थान आस्थापनेवर नेमणूक होताना लेखी घेतले जाते व त्यास संस्थांन शिवाय दुसऱ्या इतर ठिकाणी काम करण्यास मनाई असते. असा नियम असताना डॉक्टर अभिमन्यू कडू यांनी या नियमाचे उल्लंघन करत स्वतःच्या नावावर श्रीरामपूर येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू केले व त्यातून मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा बिले आकारून कमाई केली .यासंदर्भात साई संस्थान प्रशासनाने संस्थांनच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल डॉक्टर अभिमन्यू कडू यांना चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. व संस्थानच्या रुग्णालयातून त्यांना बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी या निवेदनातून श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीचे जोयेब जामदार यांनी केली आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget