श्रीरामपूर(वातार्हर)- शहरातील मोरगे हॉस्पिटल मेडिकलमध्ये झालेल्या 21 लाख रुपये रक्कमेचा चोरीचा तपास लवकरत लवकर लागावा या मागणीसाठी श्रीरामपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले.शहरातील मोरगे हॉस्पिटल मेडिकल याठिकाणी दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून 21 लाख रुपयांची मोठी जबरी चोरी करून रक्कम लुटलेली होती या गंभीर लुटमारीचा तपास अद्याप पर्यंत शहर पोलिसांकडून लागलेला नाही सदर चोरीचा त्वरित तपास लागावा आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी श्रीरामपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले.यावेळी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा निमंत्रित श्री रवींद्रजी गुलाटी, सेन्ट्रल झोन अध्यक्ष शशांक जी रासकर, श्रीरामपूर तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र बधे,सचिव सुजित राऊत, खजिनदार जालिंदर भवर, ओम नारंग सचिन चुडीवाल, रवींद्र चौधरी, न्यानेश्वरजी मोरगे, बाळासाहेब ढेरांगे, आनंद कोठारी आदी उपस्थित होते.शहरातील गांजा विक्री, अवैध दारू विक्री, ऑनलाइन औषधी द्रव्य सिरिंज व्यसन, तसेच इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत गुंडाळ प्रवृत्तीचे नशेबाज लोक अशा प्रकारची वेगवेगळे व्यसन नशा करून दादागिरी, गुंडगिरी, दरोडे लुबाडणूक चोऱ्यामाऱ्या, मारामाऱ्या करून कुठल्याही थरास जायला घाबरत नाहीत असे प्रसंग दररोज शहरात घडत आहेत शहर पोलिसांनी त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा असे जिल्हा निमंत्रक केमिस्ट असोसिएशन चे रवींद्र गुलाटी यांनी यावेळी बोलले तसेच मोरगे हॉस्पिटल मेडिकल च्या चोरीचा तपास त्वरित लावा अन्यथा तालुक्यातील सर्व औषधांचे दुकाने बंद ठेवू असा इशारा नाशिक झोन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री शशांक रासकर यांनी या वेळी दिला. 
Post a Comment