श्रीरामपूर उपविभागातर्गत सुतगिरणी कक्ष अंतर्गत दि. २१.०१.२०२२ ते ३१.०१.२०२२ पर्यंत विशेष थकबाकी विज बिल वसुली मोहीम चालू करण्यात आली होती. आज दि.२२.०१.२०२२ रोजी वार्ड क्र. २ गोंधवणी रोड येथे विज बिल वसुली पथक विज बिल वसुलीसाठी गेले असता तेथील थकबाकी असलेल्या ग्राहकाने(ग्राहकाचे नाव-रोकडे भाऊसाहेब कचरू) यांनी कृष्णा कुसळकर (नि.लिपिक(मांस) व विमल मोरे (नि.लिपिक(मांस)यांना शिवीगाळ केली व दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला. सदर ग्राहकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न करनेकामी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तरी सर्व गाऱ्हाकांना सहकार्य करून वीज बील भरण्याची विनंती महावितरण च्या अधिकारी यांनी केली आहे.
Post a Comment