Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सुभाष वाघुंडे यांनी अनाथ मातापित्यासाठी वृध्दाश्रम काढुन त्यांची सेवा सुरु केली असुन त्यांच्या कार्यास समाजाने हातभार लावावा असे अवाहन अशोक कारखान्याचे संचालक आदिनाथ झुरळे यांनी केले   श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमास पत्रकार देविदास देसाई व देसाई परिवाराच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला त्या वेळी झुरळे बोलत होते या वेळी अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे  भाऊसाहेब वाघमारे देविदास देसाई  सौ प्रतिभा देसाई उपस्थित होते या वेळी माहीती देताना वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुंडे यांनी कर्ज काढुन हा वृध्दाश्रम सुरु केल्याचे सांगुन हे समाजकार्य करताना आजपर्यत आलेले अनेक हृदयद्रावक प्रसंग कथन केले त्यामुळे उपस्थित सर्वांनाच गहीवरुन आले या वेळी अशोकचे संचालक व बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनीही सुभाष वाघुंडे यांच्या समाजकार्याचा गौरव करुन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले या वेळी देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे आदिनी मनोगत व्यक्त केले या वृध्दाश्रमात पंधरा वयोवृध्द आजी आजोबा राहत असुन लोकांनी दिलेल्या लोक वर्गणीवरच हा आश्रम सुरुअसल्याचे वाघुंडे यांनी सागुंन उपस्थितांचे आभार मानले.



बेलापूरः(प्रतिनिधी )-येथील पुरातन व  पंचक्रोशीतील प्रसिध्द इंद्रबिल्वेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कनजीशेठ टाक तर सचिवपदी अँड विजयराव साळूंके  यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. इंद्रबिल्वेश्वर मदिरांच्या विश्वस्तमंडळाच्या निवडीसाठी जेष्ठ मार्गदर्शक व समाजसेवक सुवालाल लुंक्कड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती  त्या बैठकीत अध्यक्ष व सचिवासहीत उपाध्यक्ष म्हणून वसंतराव म्हसे,सहसचिव म्हणून ,कांतीलाल मुथा तर खजिनदार म्हणून  केदारनाथ मंञी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ..सदर बैठकीत सर्वश्री शरद नवले,प्रा.हंबीरराव नाईक,अभिषेक खंडागळे ,  रविन्द्र खटोड,रविंद्र कोळपकर,प्रवीण लुक्कड ,गोरख उंडे,सचिन चायल,राहुल दायमा,प्रमोद कर्डीले,महेश गोरे,शेखर चंगेडे,सुभाष देसर्डा,सुभाष सोमाणी ,विशाल वर्मा,राजेश राठी यांची विश्वस्त म्हणून सर्वानुमते निवड करण्यात  आली.तर सर्वश्री सुवालालजी लुक्कड ,रणजीतशेठ श्रीगोड, किशोर नवले,सुभाष राठी यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.   या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी नविन पदाधिकारी व विश्वस्त मंडळाला शुभेच्छा देवुन मंदिराच्या तसेच घाटाच्या सुशोभीकरण व विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.या वेळी जनसेवा पतसंस्था व लोकवर्गणीव्दारे सुमारे चाळीस लाख रुपये रक्कम मंदिराचे जिर्णोध्दार कामी खर्च झाल्याची माहिती सुवालाल लुक्कड यांनी दिली.रणजीत श्रीगोड,रविन्द्र कोळपकर व  प्रमोद कर्डीले यांनी भविष्यातील रुपरेषेबाबत माहिती दिली.मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा लवकरच संपन्न होणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष कंजीशेठ टाक यांनी दिली. अॕड.विजय साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.


बेलापूर (वार्ताहर)- राष्ट्रीय - स्वयंसेवक संघ आणि भाजपचे काम करताना गंगाधर शास्त्री साळुंके यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ प्रचारक असताना त्यांना १९५३ मध्ये दिलेल्या संदेशाचे आयुष्यभर पालन करून नव्या पिढीला एक आदर्श घालुन दिला, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी यांनी काढले.

गंगाधर बद्रीनारायण साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व बेलापूर पोस्ट ऑफिस मार्फत आयोजित आधार कार्ड लिंकिंग आणि मतदार नोंदणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी औटी बोलत होते.ते म्हणाले की, शास्त्री यांचे जवळचे नातेवाईक काँग्रेसतर्फे खासदार, आमदार, मंत्री पदावर असूनही त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही. त्यांच्याकडून संघटनेत शिस्तीत काम करण्याची शिकवण मिळाली. त्यामुळे आम्हा सर्वांना जीवनात यशस्वीपणे काम करता आले. त्यामुळे त्यांचे नेहमी स्मरण होत राहील. त्यांच्या स्मरणार्थ

साळुंके परिवाराने आयोजित केलेल्या या शिबिराचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी पं. महेश व्यास, पं. स. सदस्य अरुण पा. नाईक, उपसरपंच अभिषेक खंडागळे,माजी सरपंच भरत साळुंके,प्रा. ज्ञानेश गवले आदींची भाषणे झाली.

यावेळी सर्वश्री विश्व हिंदू परिषदेचे देविदास चव्हाण, जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समिती संचालक सुधीर नवले जनता आघाडी प्रमुख रवींद्र खटोड, बेलापूर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव साळुंके, भागवतराव साळुंके, अॅड. विजय साळुंके, माजी सरपंच भरत साळुंके, पोलीस पाटील अशोक प्रधान, पोष्ट विभागाचे अधिकारी श्री. कोल्हे, गणेश साळुंके, पं. महेश व्यास,दिलीप काळे, चंद्रशेखर डावरे, प्रभाकर ढवळे, योगेश जाधव, संजय कुलकर्णी, लक्ष्मण शिंदे, नितीन कुलकर्णी, प्रशांत मुंडलीक, महेश कुंभकर्ण, बाळू दायमा, ग्रा.पं. सदस्य मुश्ताक शेखप्रभात कु-हे,साईनाथ शिरसाठ, सुभाष शेलार आदी उपस्थित होते. या शिबिराचा दिडशे नागरिकांनी लाभ घेतला.

प्रास्ताविक अॅड. मयुर साळुंके यांनी केले. तर अॅड. अजिंक्य साळुंके यांनी आभार मानले, सुत्रसंचालन प्रदीप साळुंके यांनी, केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, पुरुषोत्तम साळुंके,प्रताप साळुंके, सोहम साळुंके, संजय साळुंके, ऋषिकेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंके मरिवाराने परिश्रम घेतले.





श्रीरामपूर प्रतिनिधी-अनेक वर्षे कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावलेले मुरकुटे पिता-पुत्र व शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काल उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर दोघांनीही फराळाचा आस्वाद घेतला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या फराळाची ‘गोड’ चर्चा शहरात सुरू झाली आहे.माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यातील राजकीय संघर्ष तालुक्याने जवळून पाहिला आहे. कार्यकर्त्यांनी त्याचा चांगलाच अनुभही घेतला आहे. ससाणे-मुरकुटे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून ससाणे-मुरकुटे यांच्यातील संघर्ष हळूहळू मावळताना पहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे या दोघांनाही बिनविरोध संचालक करण्यात महत्वाची भूमिका बजावून या नव्या मैत्रीची रेशिमगाठ बांधली. ससाणे यांच्या या दिवाळी फराळ कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही हजेरी लावली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समवेत त्यांनीही फराळाचा आस्वाद घेतला. माजी आमदार भानुदास मुरकुटे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या हजेरीची काल दिवसभर शहरात खमंग चर्चा सुरु होती. त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर फिरत होते.




श्रीरामपूर =(वार्ताहार) अलीकडे काही महिन्यापासून बेलापूर गाव व श्रीरामपूर शहरातील शांतता भंग करण्याच्या दुष्ट हेतूने काही समाजकंटक दोन धर्मात जातीय कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी व समंजस नागरिकांमुळे असे प्रकार जागीच रोकले गेल्याने शांतता ,कायदा व सु व्यवस्था आबाधित असून हे टिकविण्याची जबाबदारी प्रशासना बरोबर नागरिकां ची व पत्रकारांची असल्याने आपण हिंदू-मुस्लीम समाजात प्रेम व गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजनकेल्याचे त्यांनी सांगितले बुधवार दिनांक 10 /11 /2021

रोजी दुपारी तीन वाजता रामगड ,तालुका श्रीरामपूर या ठिकाणी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते अध्यक्षपदाची सुचना बेलापूर शाखा कार्याध्यक्ष मुसा भाई सय्यद यांनी मांड लि त्यास अनुमोदन पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद यांनी दिले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसा द यांनी केले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जि प सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक ग्रा प सदस्य मुस्ताक भाई शेख ग्रा प सदस्य आप्पा साहेब नवले बेलापूर पोलीस दूर क्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके बेलापूर येथील डॉक्टर काळे ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे दूरदर्शन प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवले सर पत्रकार देविदास देसाई पत्रकार किशोर कदम पत्रकार दिलीप दायमा पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण ,वैजापूर तालुका अध्यक्ष मोजम भाई शेख ,नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख ,पाटोदा येथील पत्रकार दादाभाऊ मोरे ,पत्रकार मुजम्मिल शेख, पत्रकार शफिक बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सोहेब शेख, बेलापूर चे माजी सरपंच भरत साळुंके ,अशोक राव गवते ,रवी सेठ खटोड ,सामाजिक कार्यकर्ते मोसिन शेख ,उंबरगाव येथील दादाभाऊ काळे, सेवानिवृत्त सी आर पी एफ मेजर मारुतराव पुजारी, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड ,पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ समीना शेख, श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी पुष्पहार देऊन पाहुण्यांचा सत्कार केला आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत आली पुढे म्हणाले महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचा विस्तार महाराष्ट्रभर होत असून पत्रकारांवर होणारे हल्ले व दाखल होणारे खोटे गुन्हे अशावेळी त्या पत्रकारास न्याय मिळून देण्याकरिता पत्रकार संघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून न्याय मिळवून देण्याचे काम सर्वत्र करीत आहे असे त्यांनी सांगितले जि प सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून पत्रकार संघाच्या विधायक कार्याबद्दल प्रशंशा केली पत्रकार संघ पूर्वी अनेक वर्षापासून ईद मिलन चा कार्यक्रम करीत आहे आज फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रकार संघाने एकात्मतेचा संदेश दिला आहे या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांनी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध असल्याचे सांगितले शेख यांनी त्यांचे वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या माध्यमातून एकात्मता अबाधित राखण्याचे काम केले असून तळागाळातील गोरगरीब जनता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहे त्यांच्या या चांगल्या कार्यास आपण प. स. सदस्य या नात्याने शुभेच्छा देतो असे ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, दूरदर्शन प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवले ,पत्रकार देविदास देसाई, पत्रकार रियाज खान पठाण, पत्रकार उस्मान भाई शेख ,पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड ,पत्रकार मन्सूर भाई पठाण आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली कार्यक्रमास पत्रकार संघाचे एजाज भाई सय्यद,  सलीम भाई शेख मुसा भाई सय्यद ,कासम भाई शेख, मोहम्मद अली शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक राव गवते, जमीर हसन यांच्यासमवेत बेलापूर व रामगड येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक राज मोहम्मद शेख यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत पठाणाने करण्यात आली.



बेलापूर:-(प्रतिनिधी  )-संस्कृतच्या अभ्यासिका सौ.विद्या कुलकर्णी व सौ.शितल गुंजाळ यांना राम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. जुने बालाजी मंदिरात हिंद सेवा मंडळाच्या खटोड कन्या विद्यालयातील संस्कृत विषयाच्या शिक्षका सौ.विद्या कुलकर्णी व शा.ज.पाटणी विद्यालयाच्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ.शितल गुंजाळ या महिला शिक्षकांनी संस्कृत भाषेला महत्व देऊन विशेष कार्य करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण केली व विविध

उपक्रमांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला त्यांच्या या कार्याचा स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.त्यांचे या सन्मानाबद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,संस्थेचे पदाधिकारी पुरुषोत्तम मुळे, अशोक उपाध्ये,अनिल देशपांडे, प्राचार्य तागड,प्राचार्य आर.व्ही.कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बेलापूर चे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,पंडित महेशजी व्यास,प्रा.आदिनाथ जोशी,प्रा.ज्ञानेश्वर गवले,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,रमेशचंद्र दायमा,प्राचार्य गोरख बारहाते,दत्तात्रय काशिद यांनी अभिनंदन केले आहे तसेच सौ.कुलकर्णी व सौ.गुंजाळ यांचे शिक्षक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संस्कृत विभागाचे संचालक रवींद्र मुळे यांनी देखील अभिनंदन केले.संस्कृत विषयाला विद्यालयीन अभ्यासक्रमात प्राधान्य दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.



बेलापूर प्रतिनिधी- गंगाधर शास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान बेलापूर बुद्रुक (.....एक सामाजिक उपक्रम) आणि पोस्ट ऑफिस बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत साळुंके बिल्डिंग आझाद मैदान ग्रामपंचायत समोर बेलापूर बुद्रुक येथे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक करणे व आधार कार्ड दुरुस्ती करणे व नवीन मतदार नोंदणी करणे साठी सदर शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने अँड. अजिंक्य साळुंके आणि अँड. मयूर साळुंके यांनी दिली आहे.

या शिबिरा बाबत माहिती देताना अँड. साळुंके म्हणाले की अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी लिंक असणे गरजेचे आहे तसेच अनेक नागरिकांच्या आधार कार्ड मध्ये नाव पत्ता यामध्ये चुका झाल्या असल्याने त्या चुका दुरुस्त होणे गरजेचे आहे यासाठी गंगाधरशास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व पोस्ट ऑफिस बेलापूर बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील शिबिराचे आयोजन केले गेले आहे.

गंगाधर शास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने यापुढेही बेलापूर व परिसरात सामाजिक कामे करण्याच्या मानस अँड. साळुंके यांनी व्यक्त केला आहे.

तरी बेलापूर आणि पंचक्रोशीतील सर्वच आणि जास्त जास्त नागरिकांनी या सदरील कॅम्पचे लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठान तर्फे श्री. पुरुषोत्तम गंगाधर साळुंके, श्री. प्रताप गंगाधर साळुंके, श्री. प्रदीप गंगाधर साळुंके, अँड. मयूर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके,प्रज्वल साळुंके, सोहम साळुंके , संजय साळुंके ,पार्थ साळुंके तसेच सर्व साळुंके परीवारातर्फे करण्यात आलेला आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget