बेलापूर:-(प्रतिनिधी )-संस्कृतच्या अभ्यासिका सौ.विद्या कुलकर्णी व सौ.शितल गुंजाळ यांना राम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. जुने बालाजी मंदिरात हिंद सेवा मंडळाच्या खटोड कन्या विद्यालयातील संस्कृत विषयाच्या शिक्षका सौ.विद्या कुलकर्णी व शा.ज.पाटणी विद्यालयाच्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ.शितल गुंजाळ या महिला शिक्षकांनी संस्कृत भाषेला महत्व देऊन विशेष कार्य करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण केली व विविध
उपक्रमांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला त्यांच्या या कार्याचा स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.त्यांचे या सन्मानाबद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,संस्थेचे पदाधिकारी पुरुषोत्तम मुळे, अशोक उपाध्ये,अनिल देशपांडे, प्राचार्य तागड,प्राचार्य आर.व्ही.कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बेलापूर चे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,पंडित महेशजी व्यास,प्रा.आदिनाथ जोशी,प्रा.ज्ञानेश्वर गवले,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,रमेशचंद्र दायमा,प्राचार्य गोरख बारहाते,दत्तात्रय काशिद यांनी अभिनंदन केले आहे तसेच सौ.कुलकर्णी व सौ.गुंजाळ यांचे शिक्षक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संस्कृत विभागाचे संचालक रवींद्र मुळे यांनी देखील अभिनंदन केले.संस्कृत विषयाला विद्यालयीन अभ्यासक्रमात प्राधान्य दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment