श्रीरामपूर =(वार्ताहार) अलीकडे काही महिन्यापासून बेलापूर गाव व श्रीरामपूर शहरातील शांतता भंग करण्याच्या दुष्ट हेतूने काही समाजकंटक दोन धर्मात जातीय कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी व समंजस नागरिकांमुळे असे प्रकार जागीच रोकले गेल्याने शांतता ,कायदा व सु व्यवस्था आबाधित असून हे टिकविण्याची जबाबदारी प्रशासना बरोबर नागरिकां ची व पत्रकारांची असल्याने आपण हिंदू-मुस्लीम समाजात प्रेम व गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजनकेल्याचे त्यांनी सांगितले बुधवार दिनांक 10 /11 /2021
रोजी दुपारी तीन वाजता रामगड ,तालुका श्रीरामपूर या ठिकाणी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते अध्यक्षपदाची सुचना बेलापूर शाखा कार्याध्यक्ष मुसा भाई सय्यद यांनी मांड लि त्यास अनुमोदन पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद यांनी दिले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसा द यांनी केले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जि प सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक ग्रा प सदस्य मुस्ताक भाई शेख ग्रा प सदस्य आप्पा साहेब नवले बेलापूर पोलीस दूर क्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके बेलापूर येथील डॉक्टर काळे ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे दूरदर्शन प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवले सर पत्रकार देविदास देसाई पत्रकार किशोर कदम पत्रकार दिलीप दायमा पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण ,वैजापूर तालुका अध्यक्ष मोजम भाई शेख ,नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख ,पाटोदा येथील पत्रकार दादाभाऊ मोरे ,पत्रकार मुजम्मिल शेख, पत्रकार शफिक बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सोहेब शेख, बेलापूर चे माजी सरपंच भरत साळुंके ,अशोक राव गवते ,रवी सेठ खटोड ,सामाजिक कार्यकर्ते मोसिन शेख ,उंबरगाव येथील दादाभाऊ काळे, सेवानिवृत्त सी आर पी एफ मेजर मारुतराव पुजारी, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड ,पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ समीना शेख, श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी पुष्पहार देऊन पाहुण्यांचा सत्कार केला आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत आली पुढे म्हणाले महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचा विस्तार महाराष्ट्रभर होत असून पत्रकारांवर होणारे हल्ले व दाखल होणारे खोटे गुन्हे अशावेळी त्या पत्रकारास न्याय मिळून देण्याकरिता पत्रकार संघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून न्याय मिळवून देण्याचे काम सर्वत्र करीत आहे असे त्यांनी सांगितले जि प सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून पत्रकार संघाच्या विधायक कार्याबद्दल प्रशंशा केली पत्रकार संघ पूर्वी अनेक वर्षापासून ईद मिलन चा कार्यक्रम करीत आहे आज फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रकार संघाने एकात्मतेचा संदेश दिला आहे या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांनी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध असल्याचे सांगितले शेख यांनी त्यांचे वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या माध्यमातून एकात्मता अबाधित राखण्याचे काम केले असून तळागाळातील गोरगरीब जनता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहे त्यांच्या या चांगल्या कार्यास आपण प. स. सदस्य या नात्याने शुभेच्छा देतो असे ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, दूरदर्शन प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवले ,पत्रकार देविदास देसाई, पत्रकार रियाज खान पठाण, पत्रकार उस्मान भाई शेख ,पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड ,पत्रकार मन्सूर भाई पठाण आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली कार्यक्रमास पत्रकार संघाचे एजाज भाई सय्यद, सलीम भाई शेख मुसा भाई सय्यद ,कासम भाई शेख, मोहम्मद अली शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक राव गवते, जमीर हसन यांच्यासमवेत बेलापूर व रामगड येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक राज मोहम्मद शेख यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत पठाणाने करण्यात आली.
Post a Comment