Latest Post

Dysp संदीप मिटके यांचे पथकाची औरंगाबाद जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरं न 359/2021 भादवि कलम 307,308,143,147,148,149, 323,504,506, आर्म  ॲक्ट 3/25 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील बेग गँगचा फरार आरोपी गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे हा वैजापूर येथे लपून बसला असले बाबत गुप्त बातमीदारा मार्फत Dy.s.p. संदीप मिटके यांना खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले सदर पथकाने वैजापूर येथे जाऊन एका हॉटेलमधून  वैजापूर पोलिसांच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपी गोरख उर्फ विजय मुन्ना  जेधे यास  शिताफीने अटक केली आहे त्याच्यावर या अगोदर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, मोकका, दंगल अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते पुढीलप्रमाणे 

 1)  श्रीरामपूर शहर पो.स्टे. गु.र .नं.I 221/2015 भा द वी क 324,323,143,147,148,149 प्रमाणे

 2) I353/2015  भा द वी क 302,307,326,324,143,147 सह मोक्का  प्रमाणे

3) I 210/2010   भा द वी क 307,143,148,149 वगैरे प्रमाणे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली DySP   संदीप मिटके, pi सानप , psi अतुल बोरसे , पो. हे. कॉ. सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ  पो. कॉ. सुनील दिघे आदींनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-कोविड लसीकरणा दरम्यान गोंधळ होवु नये म्हणून टोकण पध्दतीची सुरुवात करणाऱ्या बेलापूरात आज उपसरपंचानी वशिलेबाजी न करता नियमानुसार टोकण घेवुनच लस घेतली व समाजापुढे एक आदर्श ठेवला                                             लसीकरणा दरम्यान होणारा गोंधळ लक्षात  घेता जि प सदस्य शरद नवले यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित निर्णय घेवुन टोकण पध्दत सुरु केली त्यामुळे कुठलीही गडबड गोंधळ न होता लसीकरण सुरळीत पार पडू लागले आज बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होते बेलापुरचे उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी सर्व सामान्य नागरीकाप्रमाणे पहाटे रांगेत येवुन आपले नाव नोंदविले तसेच नंबर आल्यानंतरच नंबर प्रमाणे येवुन लस घेतली  छोटे मोठे कार्यकर्ते आपल्या पदाचा तोरा मिरवुन आपली वैयक्तिक कामे करवुन घेतात त्या सर्वांच्या डोळ्यात उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी झणझणीत अंजन घातले आहे कितीही मोठे झालात तरी आपण एक सर्व सामान्य नागरीक आहोत हे विसरता कामा नये हेच खंडागळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या. झाल्या असून त्यांच्या जागी नव्याने चार निरीक्षक (Police Inspectors) जिल्ह्यात बदलून आले आहेत. तर तीन पोलीस निरीक्षकांना मुदतवाढ  मिळाली आहे. नाशिक परिक्षेत्र स्तरावरील पोलीस निरीक्षक यांच्या बदल्याबाबते आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांनी मंगळवारी रात्री काढले.पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, दौलत जाधव, वसंत पथवे यांची नाशिक ग्रामीण तर राकेश मानगावकर यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व अभय परमार यांना मुदतवाढ मिळाली आहे. बदली झालेल्या चार निरीक्षकांच्या जागी जळगाव जिल्ह्यातून भिमराव नंदुरकर, नंदुरबार जिल्ह्यातून विजयसिंग राजपुत, नाशिक ग्रामीणमधून नरेंद्र भदाणे व गुलाबराव पाटील यांची जिल्ह्यात बदली झाली आहे.

जळगाव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात अवैध सावकारी  विरोधात जिल्हा उपनिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आठ पथक तयार करण्यात आले आहेत. आठ पैकी सहा पथकाच्या माध्यमातून सावदा, कुंभारखेडा, तासखेडा, आचेगाव याठिकाणी पोलीस बंदोबस्तात छापे टाकून घरांची झडती घेण्यात आली. दरम्यान, तपासणी करुन कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे.जिल्ह्यात काही ठिकाणी अवैध सावकारीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे नाशिक विभागीय सहनिबंधक लाटकर आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निर्देशानुसार कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले. मंगळवारी सहा पथकांच्या माध्यमातून सावदा, कुंभारखेडा, तासखेडा, आचेगाव याठिकाणी पोलीस बंदोबस्तात छापे टाकून घरांची झडती घेण्यात आली. पंचासमक्ष तपासणी करुन संबंधितांकडून काही आक्षेपार्ह कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले आहे. पथकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-मागील आठवड्यात नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची ऑडिओ क्लिप विविध समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची तात्काळ बदली नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी केली होती या ऑडिओ क्लिप ची चौकशी करण्याची मागणी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने पुढील चौकशी श्रीरामपुर Dy.s.p संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आली आहे   

पोलिस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून घेता येईल तेवढे घेऊन जा.मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सर्व बंद अशा आशयाची एका पोलीस अधिकारी व एक इसम यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी नेवासा तालुक्यात व्हायरल झाली होती

     त्या क्लिप मध्ये P.I  करे समोरच्या व्यक्तीला ' तुम्ही पिंपळगाव मध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा मी पोलीस स्टेशन मधून पिंपळगाव येथे येण्यास निघालो आहे मी तिथे येण्याआधी जेवढे वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढे काढून घ्या नाहीतर जेवढी वाहने मिळतील तेवढे जप्त करण्यात येतील.येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील' अशा आशयाची ऑडिओ क्लिप फेसबुक , व्हाट्सऍप आणि विविध समाज  माध्यामा द्वारे व्हायरल होत आहे

ही क्लिप कोणी व्हायरल केली?समोरील बोलणारा व्यक्ती कोण? या प्रकरणात अजून कोणा कोणाचा समावेश आहे?याची सविस्तर चौकशी Dy.s.p.संदीप मिटके यांच्याकडून केली जाणार आहे.

 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला बेलापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली                येथील अल्पवयीन मुलीचा अजुन तरी पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली रस्ता रोको केला तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले

नसेल ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे पोलीस केवळ अश्वासने देत आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने बंदचे अवाहन करण्यात आले होते याअवाहनाला सर्व व्यापारी नागरीक बंधुनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेवले लाँक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

बेलापूर (वार्ताहर)ःस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बेलापूर बु।। ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  कोरोनामुक्त गाव करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला असुन प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात १५ आँगस्ट पासुन करण्यात येणार असल्याची माहीती जि प सदस्य शरद नवले व सरपंच महेंद्र साळवी यांनी दिली आहे                                         . या अभियानातंर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे घरोघर जावुन सर्वेक्षण करण्यात येणार असून  कौटुंबिक आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार आहे.त्यात त्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहीती असणार आहे घरातील सदस्यांना कोणते आजार आहेत कोवीड लसीचे किती डोस केव्हा घेतले या बाबतची सर्व माहीती संकलीत केली जाणार आहे                                        या  अभियानाचा मान्यवरांच्या हस्ते स्वातंंञ्यदिनाचे औचित्य साधुन  शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,आरोग्याधिकारी डॉ.देविदास चोखर,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,प्रकाश पा. नाईक, जालिंदर कु-हे, ज्येष्ठ पञकार मारुती राशिनकर,भास्कर बंगाळ,इस्माईल शेख,भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,पञकार देविदास देसाई,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गवले, सुहास शेलार,दिलीप दायमा,किशोर कदम प्रकाश कु-हे,प्रभात कु-हे,सुरेश अमोलिक,शफीक बागवान,किशोर खरोटे,गणेश बंगाळ,जिना शेख, बाबा शेख,अकबर सय्यद अजिज शेख आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget