जळगाव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात जिल्हा उपनिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आठ पथक तयार करण्यात आले आहेत. आठ पैकी सहा पथकाच्या माध्यमातून सावदा, कुंभारखेडा, तासखेडा, आचेगाव याठिकाणी पोलीस बंदोबस्तात छापे टाकून घरांची झडती घेण्यात आली. दरम्यान, तपासणी करुन कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे.जिल्ह्यात काही ठिकाणी अवैध सावकारीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे नाशिक विभागीय सहनिबंधक लाटकर आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निर्देशानुसार कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले. मंगळवारी सहा पथकांच्या माध्यमातून सावदा, कुंभारखेडा, तासखेडा, आचेगाव याठिकाणी पोलीस बंदोबस्तात छापे टाकून घरांची झडती घेण्यात आली. पंचासमक्ष तपासणी करुन संबंधितांकडून काही आक्षेपार्ह कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले आहे. पथकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले.
Post a Comment