बेलापुर (प्रतिनिधी )-कोविड लसीकरणा दरम्यान गोंधळ होवु नये म्हणून टोकण पध्दतीची सुरुवात करणाऱ्या बेलापूरात आज उपसरपंचानी वशिलेबाजी न करता नियमानुसार टोकण घेवुनच लस घेतली व समाजापुढे एक आदर्श ठेवला लसीकरणा दरम्यान होणारा गोंधळ लक्षात घेता जि प सदस्य शरद नवले यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित निर्णय घेवुन टोकण पध्दत सुरु केली त्यामुळे कुठलीही गडबड गोंधळ न होता लसीकरण सुरळीत पार पडू लागले आज बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होते बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सर्व सामान्य नागरीकाप्रमाणे पहाटे रांगेत येवुन आपले नाव नोंदविले तसेच नंबर आल्यानंतरच नंबर प्रमाणे येवुन लस घेतली छोटे मोठे कार्यकर्ते आपल्या पदाचा तोरा मिरवुन आपली वैयक्तिक कामे करवुन घेतात त्या सर्वांच्या डोळ्यात उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी झणझणीत अंजन घातले आहे कितीही मोठे झालात तरी आपण एक सर्व सामान्य नागरीक आहोत हे विसरता कामा नये हेच खंडागळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
Post a Comment