Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालूक्यातील कुरणपूर येथील युवक गणेश उमाकांत चिंधे (वय २५) आपल्या शेतात पाणी भरत असताना रानडूकराने चावा घेवून धडक दिल्याने जखमी झाला असून पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले.  घटनास्थळी वनाधिकारी बी.एस. गाढे,वनपाल विकास पवार,लांडे हजर झाले.

पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील साई एशियन हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

परीसरतात बिबट्या बरोबरच रानडूकरांची संंख्या मोठ्या प्रमाणात असून सध्या प्रवरा नदिला पाणी भरपूर असल्याने मका,उस हे पीक मोठ्या प्रमाणात असून रानडूकरांना व बिबट्यांचा वावर या परीसरात आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-गावात विनाकारण विना मास्क फिरणारावर बेलापुर पोलीसांनी कारवाई सुरु केली असुन आत्तापर्यत ३० हजार रुपयाच्या पुढे दंड वसुल करण्यात आला असल्याची माहीती बेलापुर  पोलीसांनी दिली आहे            शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरुच ठेवुन नियमाचे पालन न करणाऱ्या तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यात ओंकार किराणा दुकानदारास एक हजार रुपये दंड करण्यात आला तर पंचरचे दुकान उघडे ठेवणार्या क्षिरसागर यास १५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे आणखी एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन विना मास्क फिरणार्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहीती बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी दिली आहे                                      पोलीसांनी कारवाई सुरु केली असली तरी बेलापुरची कोरोना समिती मात्र शांत दिसत आहे गावात अनेक लोक विनाकारण टोळक्या टोळक्याने गप्पा मारताना दिसत आहे त्यांच्यावर कोण पायबंद घालणार असा सवाल सुज्ञ नागरीकाकडून विचारला जात आहे सायंकाळी तीन ते पाच वाजे दरम्यान आझाद मैदानावर तर जत्राच भरते ती मटका येण्याची वेळ असल्यामुळे अनेक मटका बहाद्दर आकड्याची वाट पहात बसलेले असतात अनेक दुकानावर निर्बंध असताना बेलापूरात मटका मात्र खूलेआम सुरु आहे या मटक्यास नेमका आशिर्वाद कुणाचा आहे बेलापुरात मटका अन गुटखाही जोरात कोरोना महामारीच्या काळात तरी गुटखा विक्री  मटका बंद ठेवण्याची मागणी  करण्यात येत आहे.


श्रीरामपूर तालुक्यात काल 66 रुग्ण सापडले आहे. तर 987 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत 
आहेत. काल 09 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.जिल्हा रुग्णालयात 04 खासगी रुग्णालयात 17 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 45 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 09 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 987 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 3852 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1776 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 987 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.श्रीरामपूर शहरात 17 रुग्ण असून तर तालुक्यात 44 व अन्य तालुक्यातील 5 रुग्ण आढळून आले आहेत.शहरात वॉर्ड नं. 1-06, वॉर्ड नं. 3-03, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-07 से 17 तर ग्रामीण भागात उक्कलगाव-01, खंडाळा-01, गोंडेगाव-04, वळदगाव-04, ब्राम्हणगाव-01, उंदिरगाव-01, महांकाळवाडगाव-01, उंबरगाव-02, गुजरवाडी-01, टाकळीभान-01, खिडीर्र्-02, बेलापूर-05, शिरसगाव-01, दिघी-02, निमगाव खैरी-05, हरेगाव-05, गोंधवणी-0़5, रामपूर-01, फत्याबाद-01, नायगाव-01 असे एकूण 61 रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील आंबी-01, श्रीगोंदा तालुक्यातील खाणगा-01, तर अन्य तीन पत्ते माहित नसल्यामुळे श्रीरामपूरात वर्ग झालेले रुग्ण आहेत.गेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी शंभर दोनशेचे आकडे पार करुन करोना संसर्गाने कहर केला होता. काल मात्र केवळ 66 रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी थोडा मोकळा श्वास घेतला.

अहमदनगर-रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने काळा बाजार विक्री करणाऱ्या दोघा मेडिकल चालकांसह डाॅक्टर दांपत्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार मधील म्हस्के हाॅस्पिटलचे डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के, डॉ. कौशल्या किशोर म्हस्के (दोघे रा. वडारवाडी, भिंगार), प्रसाद दत्तात्रय अल्हाट (वय 27 वर्ष रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर), रोहित अर्जुन पवार (वय 22 रा. साकत ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.औषध प्रशासन विभागाचे जावेद शेख यांनी फिर्याद दिली आहे. प्रसाद अल्हाट व रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली असून म्हस्के डाॅक्टर दांपत्य पसार झाले आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. 15 रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल, एक दुचाकी असा एक लाख दोन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भिंगारमध्ये डाॅ. किशोर म्हस्के यांच्या हाॅस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. असे असताना प्रसाद अल्हाट हा रोहित पवार याच्या मदतीने व म्हस्के हॉस्पिटलमधील म्हस्के डॉक्टर दांपत्यांशी संगनमत करून चैतन्य मेडिकल या ठिकाणावरून बेकायदेशीररित्या मिळवून करोना रुग्णांचा तपासणी अहवाल नसताना 4 हजार 800 रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या भावाने काळ्याबाजारात 12 हजार रुपये किमतीला विक्री करताना मिळून आले आहे.पोलिसांनी कलम 420, 34 सह परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 चे 6 कलम, जीवनावश्यक वस्तूची अधिनियम 1955 चे उल्लंघन, तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहे.


अहमदनगर-
पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे मच्छिंद्र फुंदे यांच्या साईप्रेम हॉटेल समोर सुधीर शिरसाठ याने त्याचे वाहन उभे केले होते. मच्छिंद्र यांचे भाऊ माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांनी सुधीरला वाहन काढून घेण्यास सांगितले. याचा राग सुधीरला आल्याने त्याने त्याच्या इतर साथीदारांना बोलवून घेतले. विश्वनाथ यांना लोखंडी पाईप व रॉडने मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना जबरदस्तीने वाहनामधून पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयाच्या पाठीमागे आणले. त्याठिकाणी मारेकऱ्यांनी विश्वनाथ यांना जबरदस्तीने दारु पाजून पुन्हा लोखंडी पाईप व रॉडने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या चौघांना एलसीबीने राहुरी तालुक्यातील कानडगावच्या डोंगरामध्ये पाठलाग करत पकडले. मोठ्या शिताफीने पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली आणि सुधीर शिरसाठसह आकाश वारे, आकाश डुकरे, गणेश जाधव यांना अटक केली. त्यांच्यासोबत असलेला केतन जाधव हा पसार झाला आहे.विश्वनाथ फुंदे यांची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांनी पाथर्डी सोडली. तिसगाव येथील एका मित्राच्या मदतीने त्यांनी राहुरी तालुक्यातील कानडगाव गाठले. कानडगावातील डोंगराच्या पायथ्याशी मारेकऱ्यांचा एक मित्र राहत होता. त्याच्या घरी मारेकऱ्यांनी आश्रय घेतला. मित्राच्या घरी डोंगराळ भागात आश्रय मिळाल्याने मारेकरी निश्चिंत होते. असे असले तरी त्यांचे पोलिसांकडे लक्ष होते. मारेकरी कानडगावच्या डोंगराच्या पायथ्याशी असल्याची कुणकुण शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांना लागली. त्यांनी त्यांच्या परीनं आरोपींचा शोध घेतला, परंतु मारेकरी त्यांच्या हाती लागले नाही. जिल्ह्यात खबऱ्यांचे जाळं पक्क असलेल्या एलसीबीच्या एका पथकाला आरोपींच्या ठावठिकाणाची पक्की खात्री मिळाली. ते पथक त्यावेळी दुसऱ्या एका खूनाच्या गुन्ह्यात पुणे जिल्ह्यामध्ये आरोपींचा शोध घेत होते. त्या गुन्ह्यातील आरोपी मिळत नसल्याने त्या पथकाने राहुरी तालुक्यातील कानडगावच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. तो पर्यंत मारेकरी मित्राच्या घरी बिंधास्त होते. एलसीबीचे पथक कानडगावच्या डोंगराशी जाऊन धडकताच मारेकरी डोंगराच्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी डोंगरामध्ये त्यांचा पाठलाग करून आरोपींना पकडण्याची मोहीम फत्ते केली. एक आरोपी डोंगराचा फायदा घेत पसार झाला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ युनूस जमादार यांची समाजवादी पार्टीच्या उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे,

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असिम आझमी यांनी नुकतेच त्यांना पद निवडीचे पत्र दिले असून यामुळे श्री.जमादार यांच्या सामाजिक कार्यांना अधिक गती मिळून मोठे बळ मिळणार आहे.

श्री.जोएफ जमादार यांनी आपल्या जे.जे.फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागळातील उपेक्षित घटकांसाठी नेहमीच विविध सामाजाभिमूख उपक्रम राबविले असून श्रीरामपूरच्या सामाजिक कार्यक्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे तथा त्यांनी याकक्षेत्रात मोठे नावलौकिक मिळविले आहे, गोर-गरीबांच्या न्याय हक्का प्रसंगी आहोरात परीश्रम करणारा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे,

त्यांच्या याच सामाजाभिमुक कार्यांची दखल घेऊन समाजवादी पार्टीने उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना सोपवली आहे,आपल्या शिस्तप्रिय शैलीने ही जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतीलच यात शंका नाही त्यांच्या या निवडीबद्दल असिफ तांबोळी, तौफिक शेख,गुडडू जमादार, अनवर तांबोळी,अय्यूब पठाण, सोहेल बागवान, दानिश पठाण, नरेंद्र लोंढे, शादाब पठाण, दानिश शाह, मोसीन कुरैशी,अजहर जहागीरदार,शोएब शाह, तबरेज शेख, मकसूद शाह, शादाब शेख, मुबाश्शिर पठाण,जकेरिया सैय्यद, अरबाज कुरैशी, साद पठाण, मोसीन बागवान,मुजाहिद तांबोळी, जिशान शेख, अरबाज शेख, अमीर खान, एजाज शाह, राहुल, फरहान शेख, अल्तमश शेख, नईम बागवान, नवाज शेख, शादाब पठाण,आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन स्वस्त धान्य दुकानदार यांच्या जिवीतास धोका वाढला आहे त्यामुळे धान्य दुकानदारांच्या अंगठ्यावरच कार्डधारकांना धान्य देण्याची मुभा द्यावी तसेच कोरोनाने मयत झालेल्या दुकानदारांच्या वारसांना विमा देण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना  केली आहे                                    अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की  जिल्ह्यात कोरोना रुग्णंची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यातील १८०० दुकानदारांचा जिव टांगणीला लागला आहे दुकानात धान्य घेण्यास येणाऱ्या कार्डधारकांचा अंगठा हातात धरुनच तो पाँज मशिनवर ठेवावा लागतो एकदा अंगठा जुळला नाही तर अनेक वेळा तिच प्रक्रिया करावी लागते अशा वेळेस एखादी बाधीत व्यक्ती दुकानात आल्यास दुकानदारही बाधीत होवु शकतो तसेच त्या पुढील येणारा कार्डधारकही बाधीत होवु शकतो धान्य वाटप करताना मास्क सँनिटायझर सोशल डिस्टन्सींगचा वापर केला तरी कार्डधाराकांचा पाँज मशिनशी सरळ सरळ संपर्क येत असल्यामुळे दुकानदार बांधीत होण्याची दाट शक्यता आहे तसेच कोरोना पसरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोरोनावर जो पर्यंत नियंत्रण येत नाही तो पर्यंत धान्य दुकानदारांना त्यांच्या अंगठ्यावरच धान्य देण्याची मुभा द्यावी जेणे करुन कोरोनाचा प्रसार होणार नाही व धान्य दुकानदारांच्या जिवीतासही धोका पोहोचणार नाही तसेच कोरोना काळात आपला जिव धोक्यात घालुन धान्य वाटप करताना मयत झालेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयाना विमा संरक्षण देण्यात यावे तसेच यापुढील काळात जर कोरोनाने एखादा दुकानदार दगावला तर त्यांच्या  कुटुंबीयांना विमा संरक्षण देण्यात यावे शासनाने ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरीकांना कोवीड लस देण्याचा निर्णय घेतला असला तरी आमचे बरेचसे धान्य दुकानदार ४५ वर्ष वयाच्या आतील असल्यामुळे त्यांना तसेच मदतनीसालाही  प्राधान्याने  कोवीड लस देण्यात यावी असेही देविदास देसाई यांनी निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति  मा जिल्हाधिकारी मा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठविलेल्या आहेत या निवेदनावर देसाई यांच्यासह सचिव रज्जाक पठाण सुरेश उभेदळ मिनाताई कळकुंबे  बाबा कराड बाळासाहेब दिघे शिवाजीराव मोहीते विश्वासराव जाधव गजानन खाडे बजरंग दरंदले चंद्रकांत झुरंगे भाऊसाहेब वाघमारे विजयराव गायकवाड सुखदेव खताळ गणेश ऐलम रावसाहेब भगत सुरेश कोकाटे गोपीनाथ शिंदे गणपत भांगरे कैलास बोरावके रविंद्र बागुल ज्ञानदेव वहाडणे  आदिंच्या सह्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget