Latest Post


नाशिक : जिल्हा न्यायालयात एका आरोपीने न्यायाधिशांवर चप्पल भिरकावल्याचा प्रकार आज दुपारी घडला आहे. मधुकर खंडू मोरे (७५, वडाळारोड, भारतनगर) असे चप्पल भिरकवणार्‍या आरोपीचे नाव असून दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान अधिक माहिती अशी कि, आरोपी मधुकर मोरे यांनी शाळेत मुख्याध्यापिका असणार्‍या पत्नीवर शाळेसमोर २७ फेब्रुवारी २०१८ ला चाकुने प्राणघातक हल्ला केला होता.यासंदर्भात न्यायालयात सुनावणीच्या कामकाज चालू होते. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यास ५ वर्षाची शिक्षा सुनावली. याचा राग आल्याने त्याने चप्पल न्याधिशांच्या बाजुने भिरकावली. यामुळे नायायालयीन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

औरंगाबाद : बंजारा कॉलनी, बहादुरपुरा येथील रहिवासी पोलीस नाईक कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.उमाकांत पद्माकर पाटील (५२)असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.  क्रांतीचौक   पोलिसांनी सांगितले की, उमाकांत पाटील हे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते. उमाकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणाची केस कोर्टात प्रलंबित आहे. त्यांच्या या केसची सोमवारी सुनावणी होती. यामुळे  गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. रविवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केले. यांनतर ते झोपले.दरम्यान पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास त्यांनी जिन्याखालील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. यांनतर शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली आणि घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी उमकांत यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.उमाकांत यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा आहे. त्यांचा मुलगा दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी करतो. मुलगा नोकरीला लागल्यापासून उमाकांत आणि त्यांची पत्नीच घरी राहात होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत.

सोलापूर/पुणे : सोलापूरहून आलेल्या तरुणीला इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नºहे येथील मानाजीनगरमध्ये रविवारी घडली. फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते़ परंतु, घरच्यांचा विराध होईल, या भीतीने या तरुणीने त्याला नकार दिल्याने त्याने चिडून तिच्यावर चाकूने वार करुन तो पळून गेला आहे.बसवराज हिळी (वय २६, रा़ मानाजीनगर,मुळ गाव दुधनी, ता़ अक्कलकोट, जि़ सोलापूर) असे त्याचे नाव असून सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी ही मूळची सोलापूर जिल्ातील अक्कलकोट तालुक्यातील आहे. तिची बसवराजसोबत फेसबुकवरुन मैत्री झाली होती़ त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले़ परंतु, घरचा विरोध असल्याने या तरुणीने बसवराज याला नकार दिला होता. बसवराज याने बीसीए केले असून तो एका कंपनीत नोकरी करतो. ही तरुणी दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी येथील तिच्या बहिणीकडे राहावयास आली होती. तो मानाजीनगर भागातील गुरुदेव अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन पाच मित्रांसोबत राहत होता. तिला त्याने रुमवर बोलावले होते़ त्याच्या सांगण्यावरुन रविवारी सकाळी ती तेथे आली. बसवराज याने तिला रुममध्ये न नेता थेट टेरेसवर नेले व तिच्याकडे विचारणा केली़ तिने घरचे विरोध करीत असल्याचे सांगून त्याला पुन्हा भेटणार नसल्याचे सांगितले. आधीच ठरवून ठेवल्याप्रमाणे त्याने तिचे उत्तर ऐकताच चाकू काढून तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर तो पळून गेला. जखमी अवस्थेत ती खाली आली. तिने रुमचा दरवाजा वाजविला. बसवराजच्या रूमपार्टनरने दरवाजा उघडल्यावर तिने बसवराजने मारल्याचे सांगितले.

सातारा : घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मयूर सुधीर मोरे (वय १९, रा. साखरवाडी, ता. फलटण) याला जिल्हा न्यायाधीश-२ एन.एल. मोरे यांनी तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, फलटण तालुक्यातील एका गावामध्ये ६ फेब्रुवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला. पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपी मयूर याने मुलीशी गैरप्रकार केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मयूर मोरेच्या विरोधात विनयभंग व पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. शिंगटे यांनी मयूरला अटक केली. त्यानंतर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने मयूर मोरे याला तीन महिने सश्रम कारावासची शिक्षा सुनावली.सहायक सरकारी वकील महेश शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल एम. आर. शेख यांनी सहकार्य केले.

बुलढाणा - प्रतिनिधी कासिम शेख :-23 सितंबर
महाराष्ट्र के बुलढाणा जिले के आदिवासी ग्राम मालेगांव निवासी एक आदिवासी परिवार ने कुएं में कूदकर अपनी जीवन यात्रा को खत्म कर दिया.ये घटना 22 सितंबर को "बेटी दिवस" के दिन हुई है जहां एक माँ ने अपने साथ अपनी 4 बेटियों को मौत की आगोश में ढकेल दिया.घटना वाकई में समाज को सन्न करने वाली है साथ ही सरकार को शर्मिंदा भी कर रही है, एक तरफ सरकार "बेटी बचाओ" का नारा लगा रही है किंतु सरकार के इस नारे की पोलखोल इस घटना ने कर के रख दी है.
        बुलढाणा जिले की मेहकर तहसील अंतर्गत का ग्राम मालेगांव दुर्गम भाग है जो अजंता पर्वत श्रंखला के जंगल मे बसा हुआ है.गांव में 80 प्रतिशत आदिवासी "आंध" प्रजाति के समुदाय का अधिवास है.खेती,खेतमजदूरी,मजदूरी और मवेशी चराना यही उनका रोजगार है.भूमिहीन 38 वर्षीय बबन ढोके के परिवार में पत्नी और 4 बेटियां थी जो अपने परिवार की परवरिश के लिए मजदूरी करता था.एक से डेढ़ माह पहले बबन ने विषैली दवाई पी ली जिस से उसकी मौत हो गई थी.ऐसे में 4 बेटियों के पालन-पोषण सहित भविष्य में उनकी शादी-ब्याह का कर्तव्य भी माँ उज्वला को ही निभाना था किंतु इतनी बडी जवाबदारी को कैसे पूरा करें? यह प्रश्न स्वभाविक रूप से उज्वला के सामने खडा होगा.पती बबन की मौत के बाद उज्वला ने घर का बोझ उठाते हुए खेत में मजदूरी से काम करना शुरू कर दिया था ताकि अपनी बेटियां भूकी ना रहे सके.कल 22 रविवार को उज्वला अपनी चारों बेटियों को साथ मे लेकर खेत मे काम के लिए गई जहां शाम 4 बजे काम निपटाने के बाद वापस घर जा रही ऐसा कहते हुए अपनी बेटियों के साथ घर की तरफ निकल पडी लेकिन रात होने पर भी घर नही लौटने पर परिजन व ग्रामीणों ने उसे तलाशा पर कोई पता नही चल पाया ऐसे में आज सुबह गांव से 1 किलोमीटर की दूरी पर तुलशिराम तोंडकर के खेत स्थित कुएं में माँ उज्वला ढोके (35) और उनकी चार बेट‍ियां वैष्णवी ढोके (9 वर्ष), दुर्गा ढोके (7 वर्ष), आरुषी ढोके (4 वर्ष) तथा पल्लवी ढोके इन पांचों के शव तैरते हुए नज़र आने के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई थी.
        दरअसल ये घटना सनसनी फैलानेवाली ही है जो इस सरकार पर प्रश्नचिन्ह खडे कर रही है.एक माँ अपनी 4 बेटियों के साथ अपनी जान दे तो फिर सरकार की बंदर भपकियाँ केवल विज्ञापनों तक ही सीमित है क्या?राज्य में विधानसभा का चुनावी माहौल बना हुआ है और नेता चाहे सत्ता दल के हो या विपक्ष के सब अपनी पुंगी बजाने में व्यस्त है.सरकार को चाहिए कि,ऐसे ज़रूरतमंदों तक पहोंचे जो सरकारी योजनाबके हकदार है,,तब जा कर कोई उज्वला को "बेटी दिवस" पर अपनी बेटियों के साथ आत्महत्या करने की ज़रूरत नही पडेगी.

राहुरी प्रतिनिधी :- राहुरी येथीलकासार गल्ली येथे पिण्याच्या पाईप लाईन मध्ये वाळु दगड माती असल्या मुळे गेले ५ ते ६ महिन्या पासुन दुशित पाणी पुरवठा होत आहे व गेल्या १५ दिवसा पासुन पाणी पुरवठा बंद होता फायर फायटर ने सुध्दा पाईप लाईन मधील वाळु दगड निघाले नाही तरी यांची दखल घेऊन नगरपरिषदेने दखल घ्यावी पिण्याचे पाणी पुरवठा सुरळीत करावा हि विनंती

श्रीरामपुर- येथील नगरपालिकाशाळा क्रमांक. ६ श्रीरामपुर शाळेस राज्यस्तरिय आदर्श शाळा पुरस्काराने राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते गौरविण्यात आले
     नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे आळंदि येथे आयोजन   करण्यात आले होते
     अहमदनगर जिल्ह्यतील पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग असणारी मोठया पटाची व विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणारी 7 लाख रुपये खर्चाची आदर्श विज्ञान प्रयोग शाळा सूसज्ज ईमारत असणारी जिल्यातील एकमेव मराठी शाळा म्हणून निवड करण्यात आली
         शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर व त्यांचे सहकारी शिक्षक कांचन मुसळे अरुना लोखंडे ताराचंद पगारे लता औटी मनीषा सांगळे यास्मिन शेख योगिता मदने सुनीता हंडाळ वर्षा वाकचोरे अनिता बढे आदीचा गौरव  चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला
          या वेळी राज्याचे अध्यक्ष अर्जुन कोळी महामंडळ शिक्षण संस्थचे सद्यस्य अजित वडगावकर आळंदी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने खोपोलीच्या प्रशासनाधिकारी जयश्री धायगुडे राज्यउपाध्यक्ष शिवाजी राजविडे सरचिटणीस अरुण पवार कार्याध्यक्ष संजय आवळे महिला आघाडी प्रमुख साधना साळुंके मनीषा गावकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेटके आदिमान्यवर उपस्तीत होते
         राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्याचे मा आमदार भाऊसाहेब कांबळे नगरपालिकेच्या लोक नियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक जेष्ठ नगरसेवक  अंजुम शेख समीना शेख ताराचंद रणदिवे जायदाबी कुरेशी कलीम कुरेशी मुख्याधिकारी बारींद्र कुमार गावित गटशिक्षण अधिकारी सुनील सूर्यवंशी प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकिल आत्तर व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget