प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर वार करून खुनाचा प्रयत्न.

सोलापूर/पुणे : सोलापूरहून आलेल्या तरुणीला इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नºहे येथील मानाजीनगरमध्ये रविवारी घडली. फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते़ परंतु, घरच्यांचा विराध होईल, या भीतीने या तरुणीने त्याला नकार दिल्याने त्याने चिडून तिच्यावर चाकूने वार करुन तो पळून गेला आहे.बसवराज हिळी (वय २६, रा़ मानाजीनगर,मुळ गाव दुधनी, ता़ अक्कलकोट, जि़ सोलापूर) असे त्याचे नाव असून सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी ही मूळची सोलापूर जिल्ातील अक्कलकोट तालुक्यातील आहे. तिची बसवराजसोबत फेसबुकवरुन मैत्री झाली होती़ त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले़ परंतु, घरचा विरोध असल्याने या तरुणीने बसवराज याला नकार दिला होता. बसवराज याने बीसीए केले असून तो एका कंपनीत नोकरी करतो. ही तरुणी दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी येथील तिच्या बहिणीकडे राहावयास आली होती. तो मानाजीनगर भागातील गुरुदेव अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन पाच मित्रांसोबत राहत होता. तिला त्याने रुमवर बोलावले होते़ त्याच्या सांगण्यावरुन रविवारी सकाळी ती तेथे आली. बसवराज याने तिला रुममध्ये न नेता थेट टेरेसवर नेले व तिच्याकडे विचारणा केली़ तिने घरचे विरोध करीत असल्याचे सांगून त्याला पुन्हा भेटणार नसल्याचे सांगितले. आधीच ठरवून ठेवल्याप्रमाणे त्याने तिचे उत्तर ऐकताच चाकू काढून तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर तो पळून गेला. जखमी अवस्थेत ती खाली आली. तिने रुमचा दरवाजा वाजविला. बसवराजच्या रूमपार्टनरने दरवाजा उघडल्यावर तिने बसवराजने मारल्याचे सांगितले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget