नाशिक : जिल्हा न्यायालयात एका आरोपीने न्यायाधिशांवर चप्पल भिरकावल्याचा प्रकार आज दुपारी घडला आहे. मधुकर खंडू मोरे (७५, वडाळारोड, भारतनगर) असे चप्पल भिरकवणार्या आरोपीचे नाव असून दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान अधिक माहिती अशी कि, आरोपी मधुकर मोरे यांनी शाळेत मुख्याध्यापिका असणार्या पत्नीवर शाळेसमोर २७ फेब्रुवारी २०१८ ला चाकुने प्राणघातक हल्ला केला होता.यासंदर्भात न्यायालयात सुनावणीच्या कामकाज चालू होते. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यास ५ वर्षाची शिक्षा सुनावली. याचा राग आल्याने त्याने चप्पल न्याधिशांच्या बाजुने भिरकावली. यामुळे नायायालयीन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
Post a Comment