श्रीरामपुर नगरपालिका शाळा क्रमांक. ६ राज्यस्तरिय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपुर- येथील नगरपालिकाशाळा क्रमांक. ६ श्रीरामपुर शाळेस राज्यस्तरिय आदर्श शाळा पुरस्काराने राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते गौरविण्यात आले
     नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे आळंदि येथे आयोजन   करण्यात आले होते
     अहमदनगर जिल्ह्यतील पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग असणारी मोठया पटाची व विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणारी 7 लाख रुपये खर्चाची आदर्श विज्ञान प्रयोग शाळा सूसज्ज ईमारत असणारी जिल्यातील एकमेव मराठी शाळा म्हणून निवड करण्यात आली
         शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर व त्यांचे सहकारी शिक्षक कांचन मुसळे अरुना लोखंडे ताराचंद पगारे लता औटी मनीषा सांगळे यास्मिन शेख योगिता मदने सुनीता हंडाळ वर्षा वाकचोरे अनिता बढे आदीचा गौरव  चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला
          या वेळी राज्याचे अध्यक्ष अर्जुन कोळी महामंडळ शिक्षण संस्थचे सद्यस्य अजित वडगावकर आळंदी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने खोपोलीच्या प्रशासनाधिकारी जयश्री धायगुडे राज्यउपाध्यक्ष शिवाजी राजविडे सरचिटणीस अरुण पवार कार्याध्यक्ष संजय आवळे महिला आघाडी प्रमुख साधना साळुंके मनीषा गावकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेटके आदिमान्यवर उपस्तीत होते
         राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्याचे मा आमदार भाऊसाहेब कांबळे नगरपालिकेच्या लोक नियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक जेष्ठ नगरसेवक  अंजुम शेख समीना शेख ताराचंद रणदिवे जायदाबी कुरेशी कलीम कुरेशी मुख्याधिकारी बारींद्र कुमार गावित गटशिक्षण अधिकारी सुनील सूर्यवंशी प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकिल आत्तर व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget