बुलडाणा - 23 सप्टेंबर
बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह पाण्याने भरलेली विहिरित आढळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळला असल्याची माहिती देण्यात आली आहे.यात आईसह 4 मुलींचा समावेश आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गावा मालेगांव या गावा जवळ एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढलले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा तर त्यासोबत 4 चिमुकल्यांचा मृतदेह आहे. मृतांमध्ये आई आणि 4 मुली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आई उज्वला ढोके वय 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष , पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.
Post a Comment