या कार्यक्रमादरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील गायक, वादक आणि कलाकारांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने वातावरण रंगले. त्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
यानिमित्ताने श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामील झालेल्या नव्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटनेला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, बांधकाम कामगार, महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करत, राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.
डॉ. विखे पाटील म्हणाले, या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाली. परंतु आता ते दिवस संपले. श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही, ही माझी ग्वाही आहे. त्यांनी पुढे सांगितले की, खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून, आता आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. पुढील सात ते आठ महिन्यांत या प्रश्नावरही निर्णय लागेल, असे ते म्हणाले.
डॉ. विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली. ते म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते. रात्री सातनंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात. परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही. गेल्या २५ वर्षांत सत्तेत राहिलेल्यांनी काय केले, हे आता जनतेने विचारले पाहिजे. ते म्हणाले, विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. एमआयडीसीची अवस्था बघा आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही. त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो. हे बदलायचे काम आपण करणार आहोत. ६ महिन्यांत शिवाजी महाराज पुतळा; पुढे आंबेडकर स्मारक
विखे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्षे लोक आंदोलने करत होते. पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लावला. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यांत सोडवणार आहोत. दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे. ते म्हणाले, ज्यांना ४० वर्षांत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही, ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार?
हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी देत आहे, असे जाहीर करताना त्यांनी दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागातील गटारी, रस्ते, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांना वेग देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटले, गटारीच्या पैशात टक्केवारी करणाऱ्यांना अजून मला ओळखत नाही. ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला, त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत. ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो, कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे, असे त्यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांचे नाव न घेता टोला लगावला
ते म्हणाले, श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला, तर मी तात्काळ उद्योग निर्माण करतो. बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच, आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो
आपल्या भाषणाच्या शेवटी विखे पाटील म्हणाले, मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही. मला फक्त विकास करायचा आहे. या जमिनीवर तुम्ही घर बांधाल, तुमच्या मुलांचं भविष्य घडवाल हेच माझं समाधान आहे. मला तुमच्याकडून काही नको, फक्त आशीर्वाद द्या. कारण गरिबांच्या प्रार्थनेत ती ताकद असते, जी मला पुन्हा उभं करते.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले, आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटांत संपला. वेळेचं महत्त्व ठेवू या. बोलणं कमी, काम जास्त असू द्या. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर मा. तालुकाध्यक्ष दिपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे मा. सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन भागडे, भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे, ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के, विस्ताराधिकारी दिनकर ठाकरे शरद त्रिभुवन, ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने, सरपंच दिलीप त्रिभुवन, सरपंच जितेंद्र गोलवड, उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात डॉ. विखे पाटील यांनी ‘विकासासाठी संघर्ष’, ‘सामाजिक समतेचा आदर्श’ आणि ‘राजकारणापेक्षा कार्य’ या तीन मुद्यांवर ठाम भूमिका मांडली.
पत्रकार संघटनेने या संदर्भात स्पष्ट म्हटलं आहे की —
“LCB चे काम गुन्हे उघड करणं आहे; पण काही ठिकाणी गुन्हेगारांचं रक्षण करणं दिसतंय. हा विभाग जनतेसाठी भयावह नव्हे, सुरक्षिततेचा आधार व्हायला हवा.”
यासोबतच तक्रारीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अतिरेक आणि दबावाच्या वागणुकीबद्दलही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं नमूद आहे.
पत्रकार संघटनेच्या तक्रारीत आणखी एक मुद्दा ठळक करण्यात आला आहे —
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचं धोरण राबवलं होतं, पण अलीकडे पुन्हा त्याच धंद्यांना खतपाणी मिळत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पत्रकार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पारदर्शक कार्यपद्धती राबविण्याची मागणी केली आहे.
यावेळी संजय भोंडगे,मेजर किरण शेलार,बाबुलाल पठाण,दिपक क्षत्रिय,पुंजाहरी सुपेकर, विलास नागले, भगीरथ मुंडलिक,किरण गागरे, रविंद्र कर्पे, महेश जेठवा,विशाल आंबेकर, राधेश्याम अंबिलवादे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,सचिन वाघ,संदीप सोनवणे,महेश कुऱ्हे,सचिन देवरे, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, मच्छिंद्र खोसे आदी उपस्थित होते.
कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, मांडवे, तांबेवाडी,फत्याबाद, चांडेवाडी, कुरणपूर, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, आठवाडी, जवाहरवाडी, यादी परिसरात अनेक प्रश्न त्यामध्ये
वीज, पिण्याचे पाणी,बिबट्या कडून हल्ल्या, हॉस्पिटलचे प्रश्न, बांधकाम कामगार, रस्ते, रेशनचे, त्याचबरोबर संजय गांधी निराधार, अपंग, एकल महिला, बालसंगोपन प्रकरणही मोठ्या प्रमाणावर या परिसरात राबवले आहे.कोरोना काळातही मोठं काम असून महिला बचत गटांच्या समस्या सोडवण्याचे काम यापूर्वी केलेले असून मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. आतापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी हे गावात कोणालाच माहीत नव्हते. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दुकानात त्यांचा शिक्का व सही उपलब्ध होती त्याचा हे उल्लेखनीय काम विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप साठी देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेले आहे. या सामाजिक कामाबद्दल गळनिंब येथील व प्रभाग क्रमांक तीन मधील कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणुकीत उभं करून बिगर खर्च निवडून आणले ते गळनिंब ग्रामपंचायतचे दहा वर्षे सदस्य असून श्रीरामपूर न्यायालयाच्या विधी सेवा समिती चे तीन वर्षे काम केले. याव्यतिरिक्त त्यांचं सामाजिक काम फार मोठे असून स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले असून या पाच गावे वाड्या वरती ४२ मावस भाऊ,सासरवाडी घरातील सर्वांची, भावाची सासरवाडी याच पाच गावात असल्याने मोठे नातेगोते व मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यात या भागातून जाणारा कोल्हार बेलपिंपळगाव रस्ता याचे काम देखील त्यांच्या रेट्यामुळे झाले. फत्याबाद मधील असणारे कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गटार त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी काँग्रेटीकरण करून रस्ता उंचावण्यासाठीचा प्रस्ताव करण्यात आला. या ठिकाणी बोलले जाते. उक्कलगाव प्रवरापट्ट्यातील पाच गावांच्या विकास कामासाठी त्यांचं मोठे प्रयत्न राहिले असल्याने परिसरातील नागरिकांची मनोमन इच्छा आहे त्यांनी उकलगाव गनातून पंचायत समिती निवडणूक लढवावी.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कांबळे (चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख, पर्यवेक्षक विजय दळवी, परीक्षा विभाग प्रमुख प्रमोदकुमार राऊत, क्रीडा शिक्षक श्री. सुनील बनसोडे, प्रा. बाळासाहेब शेळके, तसेच श्रीरामपूर क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री. काकासाहेब चौधरी व सचिव श्री. संभाजी ढेरे उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांचा सत्कार काकासाहेब चौधरी यांनी केला, उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद यांचा सत्कार पुंडलिक शिरोळे सरांनी, तर प्रा. सुभाष देशमुख यांचा सत्कार विजय गाडेकर सरांनी केला. तसेच काकासाहेब चौधरी यांचा सत्कार प्राचार्य कांबळे यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवरांचा व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचा सत्कार प्रा. बाळासाहेब शेळके यांनी केला.
प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना सांगितले की, “आयुष्यात प्रत्येकाने एक खेळ तरी खेळला पाहिजे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळते.”
यानंतर मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय गाडेकर सरांनी केले.