Latest Post

बेलापूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर खूर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.सविता प्रकाश राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडी बद्दल पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय दादा विखे पाटील तसेच अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे , शरद नवले यांनी अभिनंदन केले आहे  .                         बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या सरपंच प्रणालीताई भगत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाकरता नुकतीच निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत सविता राजुळे यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे सरपंच पदी सौ.राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या वेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडे, वसंत पुजारी, दिलीप भगत ,राजेंद्र बारहाते, माजी सरपंच सौ प्रणाली भगत, कल्पना ताई भगत ,राणी पुजारी, नयनाताई बडधे, प्रियंकाताई थोरात आदि सदस्य हजर होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून नितीन मुळे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र मेहत्रे ,कामगार तलाठी शिंदे मॅडम यांनी सहकार्य केले. या वेळी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक द्वारकनाथ बडदे, ज्ञानदेव वाकडे ,विनय भगत, राजेंद्र कुंकूलोळ, सुनील क्षिरसागर, शशिकांत पुजारी ,रामदास थोरात ,राकेश बडदे ,बी. एम. पुजारी, गोरख भगत, पंकज खर्डे ,

 जितेश महाडिक, विक्रांत पाटील, पंकज पाटील, पोलीस पाटील उमेश बारहाते, युवराज जोशी, ऋषिकेश बारहाते, चंद्रकांत गाढे, ऋषिकेश महाडिक, रणजीत काळे, सतीश बारहाते, अशोक महाडिक, राजेंद्र गागरे, शंकर बारहाते, अनिल बारहाते ,प्रशांत बडदे, नंदू कुऱ्हे, समीर सय्यद, अर्जुन गोरे, कैलास थोरात, गणेश महाडिक, अमोल जोशी, किशोर कांबळे ,राहुल शेलार, सुनील बडधे, संतोष बडधे, महेश बडधे, सागर तागड आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते

बेलापूर -(प्रतिनिधी)गावात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झालेला असुन हेच खाजगी सावकार 50%पासुन 120% टक्क्यापर्यंत व्याज वसूल करीत आहेत मात्र या विषयावर ग्रामपंचायत गप्प का आहे, असा  सवाल सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी केला आहे.

याबाबत नाईक यांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना निवेदन  पाठविले असुन त्यात पुढे म्हटले आहे की खाजगी सावकाराचा गावाला वेढा  पडला असून काही ठराविक लोक गोरगरीब तसेच अडलेल्या नडलेल्या कडून मन मानेल त्या पद्धतीने व्याजाची आकारणी करून जनतेला लुबाडत आहेत याबाबत अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या परंतु त्या सावकाराच्या दडपशाहीमुळे दडपल्या गेल्या. कुणाच्या जमिनी, कुणाच्या चार चाकी, कुणाच्या दोन चाकी, कुणाची मालमत्ता घर गहाण ठेवून हे सावकार खुलेआम 50 टक्के पासून ते 120% पर्यंत व्याजाची आकारणी करून लबाडणूक करत आहेत यांचा व्याजाचा दर हा दर महा असून महिना संपला की हे लोक संबंधित व्यक्तीकडे तगादा लावतात अर्वाचे भाषा वापरून दादागिरी करतात व त्याने गहाण टाकलेल्या मालमत्ता विकण्याचा दम देतात त्यामुळे अनेक गोरगरिबांना आपल्या मालमत्ता सोडून देण्याची वेळ येत आहे तरी बेलापुराला पडलेला हा  खाजगी सावकारकीचा विळखा सुटणार कधी याबाबत विक्रम नाईक यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सवाल विचारला आहे. तसेच बेलापूर गाव मध्ये किती अधिकृत व किती अनाधिकृत सावकार आहेत याची यादी माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे काय याचीही माहिती  त्यांनी ग्रामपंचायतकडे मागवली आहे तसेच संबंधित सावकाराची कर्ज वसुली कशी असते तसेच किती टक्के व्याज घेतली जाते याबाबतही ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती मागविण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिकारी  ही माहिती देत नसेल तर बेकायदेशीरपणे चाललेल्या या सावकारकीला  ग्रामपंचायतचा छुपा पाठिंबा तर नाही ना असा सवाल नाईक यांनी विचारला असून याबाबत लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी दिलेला आह 

 जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही ग्रामपंचायतने खाजगी सावकारकीकडे कठोर पावले का उचललेली नाहीत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आहे. “गाव बुडतंय आणि ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

बेकायदेशीर सावकारी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेवुन गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) –अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या वतीने आयोजित शास्त्रीय संगीत गायन आणि तबला वादन परीक्षा सन २०२४-२५ मध्ये श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला, मेहनत आणि संगीताची समज दाखवत उत्कृष्ट गुणांनी यश प्राप्त केले.

गायन परीक्षेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये २० विद्यार्थी विशेष श्रेणीसह उत्तीर्ण होत शाळेचा मान उंचावला.तबला वादन परीक्षेत ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यापैकी २५ विद्यार्थी विशेष गुण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर बाकीचे विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीत उल्लेखनीय कामगिरी करत कौतुकास पात्र ठरले.विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण देताना रेखा गायकवाड (गायन) आणि उस्ताद श्री. दिग्विजय भोरे (तबला) यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे दर्जेदार यश प्राप्त केले, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नैथालिन फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शास्त्रीय संगीत आणि वादन या भारतीय संस्कृतीतील मौल्यवान कला शालेय पातळीवरच जोपासत विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम श्री शारदा स्कूल सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास,आत्मविश्वासाची वाढ आणि सांस्कृतिक भान या उद्देशाने घेतले जाणारे हे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असून, शाळेचा सांस्कृतिक पाया अधिक भक्कम करणारे ठरत आहेत.

बेलापूरःराज्याचे जलसंपदा मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी  नाम.राधाकृष्ण विखे पा.च्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली 'प्रारंभ कचरा संकलन प्रकल्पा'च्या सहकार्याने  गावातील ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञपणे संकलन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.नजिकच्या काळात कच-यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांनी दिली.                                                 बेलापूर ग्रामपंचायतीने कच-याचे वर्गिकरण करुन संकलन करण्याचा उपक्रम श्री.शरद नवले व श्री.अभिषेक खंडागळे यांचे संकल्पनेतून हाती घेण्याचे जाहिर केले होते.याबाबत स्वच्छता कर्माचा-यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे जमा करावा याबाबत ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले होते.प्रारंभ प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग व अनिता पाचपिंड या घरोघरी जाऊन कचरा संकलना बाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना बेलापूर ग्रामपंचायत यांच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.                ग्रामपंचायतीच्या आवाहनास ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.ग्रामस्थ ओला कचरा(फळे.भाजीपालाभाज्यांच्या,साली व देठे,पालापाचोळा,खरकटे,खराब अन्न इत्यादी )तर सुका कचरा(प्लॕस्टिक बाॕटल्स,खाद्यपदार्थ पाकिटे,कागद व पुठ्ठे,प्लास्टिक वस्तु,कापडाच्या चिंध्या,औषधांची पाकीटे,प्लास्टिकचे अवशेष इत्यादी)स्वतंञपणे संकलित करुन कचरागाडीतील ओल्या व सुक्या कच-यासाठीच्या स्वतंञ कप्यांत टाकून गोळा करण्यात येत आहे.                                         नजिकच्या काळात हा कचरा नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोफत उपलब्ध करुन दिलेल्या जमिनीवर डंम्पिंग यार्ड करुन तेथे टाकण्यात येणार आहे.तसेच या डम्पिंग यार्डवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारुन सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ.साळवी व उपसरपंच श्री.नवले यांनी  दिली.

बेलापूर: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत १५ वर्षांचा टप्पा पार केला, त्यानिमित्त बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.


पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफास केरुन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली, येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे. श्री.बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार स्वीकारताना, बडे यांनी आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणांचे अनेक धाडसी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांच्या या अनुभवांबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.


या छोट्याशा सत्कार सोहळ्याला पत्रकार देवदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, सामाजिक  कार्यकर्ते दादासाहेब कुताळ, तिळवण तेली महासंघाचे एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांसह मान्यवर उपस्थित होते.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) – सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, शाळेच्या इतिहासात प्रेरणादायी अशी कामगिरी नोंदवली आहे. यामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील आदर्श आढळ, अवधूत अंभोरे, आयुष निर्मल, शर्वरी बोरसे, श्रीरंग मालपुरे आणि श्रेया वर्गुडे तर इयत्ता आठवीतील सृष्टी वावधणे आणि नचिकेत काठमोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही कामगिरी म्हणजे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे प्रामाणिक मार्गदर्शन यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.या यशामध्ये शिक्षिका शिल्पा खांडेकर, सोनल निकम, माधुरी भस्मे,सुनंदा कदम, स्वरूपा वडांगळे, सीमा शिंदे, गणेश मलिक आणि अर्चना बाजारे यांनी विद्यार्थ्यांसोबत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी )- जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीने  सातत्याने विविध उपक्रम राबविले असुन या उपक्रमामुळे गावातील विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                बेलापूर बुll ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास संबोधित करताना नवले बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मिनाताई साळवी या होत्या.तर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे,उपसरपंच चंद्रकांत नवले,ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,रंजना बोरुडे,प्रतिभा नवले, मानवी खंडागळे,पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी  शोभा शिंदे,बँक आॕफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक राजेश परदेशी, डॉ. अश्विनी लिपटे, शशिकांत दुशिंग आदि उपस्थित होते.                         आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की गावात महिलांची संख्या पन्नास टक्के असुन या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा, माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले  आहेत. गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता आल्यापासून गावात विविध विकास कामे वेगाने होत असून बेलापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक,मिनाताई  साळवी,माजी उपसरपंच तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,सदस्य उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,शिलाताई पोळ,छायाताई निंबाळकर आदिंचा यात  मोठा सहभाग आहे.गावकरी मंडळाने  समाजांतील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबिले असुन लवकरच १००० घरकुलांचे बांधकाम सुरू होणार आहे.महिलांकरीता शासनाच्या अनेक  योजनां असुन योजनांची माहिती न झाल्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहतात.महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते.त्यामुळे महीलांनी आरोग्याबाबात सजग व्हावे यासाठी आरोग्य प्रबोधन व तपासणी स्वच्छता महिलांना मिळणारे लाभ गावाच्या विकासात महीलांचे योगदान या सर्व बाबींची माहिती व्हावी या हेतुने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे नवले यांनी सांगीतले .                                          प्रास्तविक भाषणात बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणाले की,आजवर बेलापूर ग्रामपंचातीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे  भक्कम सहाय्य व पाठबळ मिळाले आहे.नाम.विखे यांच्या सहकार्याने १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच या योजनेच्या साठवण तलावासाठी आठ एकर जमिन ग्रामपंचायतीला मोफत मिळाली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होणार असुन तिनं म्हशीने पुरेल इतका पाणीसाठा त त्यात असणार आहे.गावातील गरजूंसाठी तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली आहेत.  या घरकुलासह,सेंद्रिय खत प्रकल्प,क्रिडा संकुल तसेच सर्वधर्मियांच्या स्मशानभुमिसाठी ३४ एकर जागा नाम.विखे पा. यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे.ग्रामपंचायतीने भुयारी गटारीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे संकलित करण्याचे कामही सुरु केले आहे.भविष्यात कच-यावर प्रक्रिया करुन खतप्रकल्प उभारणी केली जाणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई झाल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत.माञ पावसाळ्यानंतर लगेचच रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी नाम.विखे पा.यांचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पाणीपुरवठा योजना कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खंडागळे यांनी दिली.                                                यावेळी सरपंच मिनाताई साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तर सौ.आशाताई गायकवाड ,ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प.समितीच्या प्रकल्प आधिकारी शोभा शिंदे यांनी बचतगटा संदर्भातील योजना,त्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय याची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेचे बेलापूर शाखेचे व्यवस्थापक  राजेश परदेशी यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून त्याबाबात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभ प्रकल्पचे शशिकांत दुशिंग यांनी घनकचरा व ओलाकचरा संकलन व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले.पञकार देविदास देसाई यांनी अंधश्रध्देबाबत प्रबोधन केले.मेळाव्याचे दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षीय सूचना सौ. मनिषा दळे यांनी मांडली त्यास सौ. संध्या तेलोरे यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ.योगिताताई अमोलिक यांनी केले तर सौ. वैशालीताई शेळके यांनी आभार मानले.मेळाव्यास उपसरपंच चंद्रकांत नवले सदस्य मुस्ताक शेख तबसूम बागवान प्रियंका खुरे उज्वला कुताळ जया भराटे आशा गायकवाड ज्योती जगताप मंगल जावरे सरिता मोकाशी वैशाली शेळके मनीषा दळे संगीता देसाई प्रतिभा देसाई संगीता शिंदे तेलोरे नीलिमा कुमावत सुजाता गुंजाळ वैशाली शिरसाठ सुवर्णा खंडागळे आदिसह मोठ्या संख्येने परिसरातील बचत गटाच्या महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget