महीलेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला परंतु त्या चोरट्याकडून महीलेच्या अंगावर ऍसिड टाकण्याचा प्रयत्न
श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील बाबासाहेब बाळाजी आठरे राहणार फत्याबाद यांच्या घरी दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची सून हर्षदा हीने आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पळून गेले परंतु आपल्याला ओळखले असावे असा समज झाल्याने आज सायंकाळी हर्षदा तिच्यावर ऍसिड फेकण्याची घटना घडली असून या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की फत्याबाद येथील बाबासाहेब आठरे हे दिनांक रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री जेवण करून झोपले असता पहाटेच्या वेळेस तिन ईसम त्यांच्या घरात घुसले व त्यांनी सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारला त्यावेळी त्यांची सुनबाई हर्षदा ही बाथरूमला गेलेली होती त्यादरम्यान चोरट्याने सर्व उचका पाचक केली काही दागिन्याचे गाठोडे बांधले व रोख रक्कम सोबत घेतली नेमकी त्याच वेळेस हर्षदा आठरे ही बाथरूम मधून बाहेर आली व घरात उचकापाचक करत असलेले पाहून जोरात आरडाओरड केली त्यावेळी शेजारीच असलेले आठरे यांचे पुतणे गणेश आठरे सुभाष आठरे चेतन आठरे हे धावत आले हे पाहून चोरट्याने सोन्याचे दागिने असलेले गाठोडे वरून खाली फेकले व दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या व नागरिक येत असल्यामुळे ते आपला जीव वाचून पळाले परंतु त्यांना वाटले की या महिलेने आपल्याला ओळखलेले आहे त्यामुळे दोन दिवसापासून या महिलेच्या मार्गावर ते चोरटे होते कालही त्या महिलेला वीट फेकून मारली होती परंतु ती थोडक्यात बचावली आज बाबासाहेब आठरे यांची सून हर्षदा आठरे ही मुलीला घेऊन फत्याबाद येथे दवाखान्यात आली होती सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी ही देखील होती दवाखान्यातून परत जात असताना दोन इसम मोटरसायकलवर आले व त्यांनी स्कुटीवर चाललेल्या या दोन महिलेच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला त्यात हर्षदा तिची पाठ भाजली व बाबासाहेबांचे पुतणीच्या छातीला भाजलेले आहे त्यांना तातडीने प्रवरणागर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हा हल्ला केवळ आपल्याला ओळखले आहे या गैरसमजुतीतुन झालेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे