बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर मिनाताई साळवी यांची बिनविरोध निवड
बेलापूर/(प्रतिनिधी)--तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा. व माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जि.परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या मिनाताई अरविंद साळवी यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच स्वाती अमोलिक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणुक अधिकारी व्हि.एस.गवारी (मंडलाधिकारी)यांचे अध्यक्षतेखाली,तलाठी व्हि.एच.खेमनर व ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक संपन्न झाली.सरपंच पदासाठी गावकरी मंडळाच्या मिनाताई साळवी यांचा एकमेव अर्ज आला.विरोधी सुधीर नवले,रविन्द्र खटोड व भरत साळुंके यांचे नेतृत्वाखालील जनता विकास आघाडीने निवडणुकीतून माघार घेतली.बैठकीस गावकरी मंडळाच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंंच प्रियंका कु-हे, सदस्य अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख,तबसुम बागवान,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार उपस्थित होते.तर जनता विकास आघाडीचे सदस्य या बैठकीस अनुपस्थित राहिले.त्यामुळे मिनाताई साळवी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. निवडीनंतर झालेल्या आभार सभेत जि.परिषद सदस्य शरद नवले म्हणाले की,गावकरी मंडळाने सरपंच पदाबाबत जो शब्द दिला आहे तो पाळला आहे.यापुढील काळात प्रवरा घाट विकास पर्यटन केन्द्र,गाव अंतर्गत रस्ते,सेंन्द्रिय खत प्रकल्प,बाराशे घरकुलांचे संकुल,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्र आदी प्रश्न मार्गी लावायचे आहेत.आजच्या बिनविरोध निवडीने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत.गावकरी मंडळात फूट पडावी यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या विरोधकांना गावकरी मंडळाने ऐक्यातून चपराक दिल्याचे श्री.नवले म्हणाले. बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की विरोधकांनी बेताल आरोप केले त्याला आम्ही कामातून उत्तर दिले.विरोधकांच्या वीस वर्षात झाली नाहित इतकी विकास कामे गावकरी मंडळाने चार वर्षात करुन दाखविली.१२६ कोटीची ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना,भुयारी गटारे,साठवण तलाव,घरकुल,क्रिडा संकुल,सर्वधर्मिय स्मशानभुमी,सेंद्रिय खत प्रकल्पासाठी ४३ एकर मोफत जमिन आदि ठळक कामे झालित. या वाटचालीत पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे बहुमुल्य सहकार्य लाभल्याबद्दल खंडागळे यांनी धन्यवाद व्यक्त केले.या प्रसंगी गावकरी मंडळाचे मार्गदर्शक, पदाधिकारी,नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment