श्रीरामपूर - येथील ह्जरत सैलानी बाबा दरबार यांचा ६६ व्या उर्स शरीफ निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली. 15 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या संदल निमित्त चादरीची मिरवणूक सैलानी बाबा दर्गाह पासून सायंकाळी निघाली. गिरमे चौक, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, महात्मा गांधी पुतळा, शिवाजी चौक, शिवाजी रोड मार्गे पुन्हा सैलानी बाबा दर्गा येथे येऊन फातेहा ख्वानी नंतर सुंदरची चादर बाबांच्या मजारीवर अर्पण करण्यात आली.
१६ तारखेला सकाळी 11 ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
हजरत सैलानी बाबा बहुद्देशीय संस्था व नित्यसेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबीराचे उद्घाटन आमदार हेमंत तात्या ओगले तसेच माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरात हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कलीम बिनसाद व अबूबकर बिनसाद यांच्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अस्लम दिनसाद यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी रक्तदान करून जनतेत सामाजिक कार्याचा एक अनोखा उपक्रम आपल्यापासूनच सुरू करायला हवा असा संदेश दिला. राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद पाहायला मिळत असतांना या ठिकाणी मात्र हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून सर्व धर्मीय लोकांनी रक्तदान करून
हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला.यावेळी सर्व पदाधिकारी,सदस्य व येणाऱ्या भाविक भक्तांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.
Post a Comment