Latest Post

श्रीरामपूर - येथील ह्जरत सैलानी बाबा दरबार यांचा ६६ व्या उर्स शरीफ निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली. 15 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या संदल निमित्त चादरीची मिरवणूक सैलानी बाबा दर्गाह पासून सायंकाळी निघाली. गिरमे चौक, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, महात्मा गांधी पुतळा, शिवाजी चौक, शिवाजी रोड मार्गे पुन्हा सैलानी बाबा दर्गा येथे येऊन फातेहा ख्वानी नंतर सुंदरची चादर बाबांच्या मजारीवर अर्पण करण्यात आली.
 १६ तारखेला सकाळी 11 ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
याचवेळी यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

हजरत सैलानी बाबा बहुद्देशीय संस्था व नित्यसेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबीराचे उद्घाटन आमदार हेमंत तात्या ओगले तसेच माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरात हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कलीम बिनसाद व अबूबकर बिनसाद यांच्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अस्लम दिनसाद यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी रक्तदान करून जनतेत सामाजिक कार्याचा एक अनोखा उपक्रम आपल्यापासूनच सुरू करायला हवा असा संदेश दिला. राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद पाहायला मिळत असतांना या ठिकाणी मात्र हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून सर्व धर्मीय लोकांनी रक्तदान करून 
हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एकतेचा  संदेश दिला.यावेळी सर्व पदाधिकारी,सदस्य व येणाऱ्या भाविक भक्तांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श  होलिस्टिक स्पाइन केयर  व  पंचगव्य सेंटर यांच्यावतीने श्री कोरेश्वर गोसंवर्धनचे प्रख्यात नाडी परीक्षण तज्ञ ओमकारदेव अशोकदेव मुळे गुरुजी हे आपल्या श्रीरामपूरच्या शाखेत बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नाडी परीक्षण घेणार आहे.

नाडी परिक्षण करून रक्तदाब कैन्सर, स्त्रियांचे विकार, संधिवात, जुनाट आजार, सनायुचे आजार,लहान बालकांचे आजार,हृदय विकार,युरिन इफेक्शन,पित्त विकार, किडनी विकार,कफ विकार,दमा इत्यादी आजारांवर वर मार्गदर्शन व उपचार करणार आहे. आता पर्यंत हजारो रुग्णना नाडी परीक्षण करून पंच्यागव्य औषधेनि गुरूजीनि हजारो रुग्णना बरे केले आहे.

तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श स्पाइन होलिस्टिक  स्पाइन केयर व पंचगव्य सेंटर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

शिबिराच्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधा - 7003497003

बेलापूर (प्रतिनिधी)- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय फर्निचर कामाचा लोकार्पण सोहळा बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. बेलापूर ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करून या वाचनालयाच्या फर्निचरचे काम करण्यात आले असून बेलापूर ग्रामपंचायतच्या या वाचनालयात जवळपास १९००० इतके ग्रंथ विविध पुस्तके उपलब्ध आहेत.ही पुस्तकांची मांडणी करण्या करता या आधीच्या काळात व्यवस्था नव्हती.ग्रामस्थांना विशेष करून तरुण पिढीला या वाचनालयाचा फार उपयोग होत आहे हे लक्षात घेऊन गावकरी मंडळाचे नेते शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कुऱ्हे व सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जुन्या व दुर्मिळ पुस्तकाचे जतन व्हावे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या फर्निचर चे नूतनीकरण केले. ग्रंथालयाचे कामकाज ग्रंथापाल सौ.उज्वला साळुंके हे पाहत आहेत.ग्रंथालय कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,तबसूम बागवान,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब कुताळ,हाजी इस्माईल शेख,संजय भोंडगे,अँड. अरविंद साळवी,सुभाष अमोलिक,भास्कर बंगाळ,प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार,भास्कर खंडागळे,देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार,बाबुलाल पठाण,भाऊसाहेब तेलोरे,जाकीर हसन शेख,सागर खरात,गणेश बंगाळ,सुधीर तेलोरे,प्रविण बाठीया,दादासाहेब कुताळ,नवनाथ धनवटे, विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,जीना शेख, शशिकांत तेलोरे,विशाल शेलार,बंटी शेलार, पोपट पवार, विनायक जगताप,अमित तेलोरे,दत्तू निकम आदी उपस्थित होते.

तेलंगणा (गौरव डेंगळे) ःपी जे आर स्टेडियम,तेलंगणा येथे झालेल्या पहिल्या 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप स्पर्धेत कर्णधार श्रिया गोठोस्कर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने यजमान संघाला  सरळ दोन सेटमध्ये हरवून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक समाधान मानावे लागले.तेलंगणा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील आठ राज्य पात्र ठरले होते.अंतिम सामन्याच्या सुरुवातीला यजमान तेलंगाना संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत पहिल्या सेटमध्ये ४ गुणांची आघाडी घेतली.श्रिया गोठोस्कर,संजना गोठोस्कर, अरमान भावे यांनी आपला खेळ उंचावत महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली.पहिला सेट मध्ये महाराष्ट्राने १९- १९ बरोबरी सादत पहिला सेट २१- १९ ने पटकावला. दुसऱ्या सेटमध्ये देखील महाराष्ट्राच्या मुलींनी सुरेख खेळण्याचा प्रदर्शन करत दुसरा सेट २१- १७ ने जिंकत पहिल्या फेडरेशन कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राची कर्णधार श्रिया गोठोस्कर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.उमा सायगावकर,अरमान भावे,उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांनी देखील स्पर्धेमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.प्रशिक्षक नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र मुलींचा संघाने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र मुलीच्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल हरेगावच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री मारुती हजारे,3A साईड महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री स्वामीराज कुलथे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



अंतिम निकाल:

मुली:

सुवर्णपदक: महाराष्ट्र

रोप्यपदक : तेलंगाना

कांस्यपदक: हरियाणा


मुले:

सुवर्णपदक: तेलंगणा 

रोप्यपदक : पंजाब 

कांस्यपदक: महाराष्ट्र



कोट: प्रत्येक खेळामध्ये मुला- मुलींनी चिकाटीने सराव केला तर निश्चितच आगामी काही वर्षांमध्ये भारत विश्व क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल असेल. तेलंगणामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी मोठ्या गटात खेळताना सुरेख खेळ करत विजेतेपद पटकावले.युवा खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे.


( श्री गौरव डेंगळे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव)

चदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे सुरू असलेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये साखळीतील तिसऱ्या सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर,उमा सायगावकर,अरमान भावे, उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर देवधमन संघावर २१- ०७ व २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील  सर्वसामान्य जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र महिला संघाचा उपांत्य फेरीचा सामना रंगला तो हरियाणा संघाबरोबर.पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत हरियाणा संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-१२ ने पटकावला.अरमान कडून सुरेख सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेट मध्ये देखील संजना व उपन्या यांनी सुरेख सर्विस व अटॅकिंग करत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापुढे हरियाणा संघ हतबल झाला व उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्राने २१ - १२ व २१ - १२ फरकाने जिंकत अंतिम फेरी प्रवेश केला. महाराष्ट्र मुलींचा अंतिम सामना रंगेल तो यजमान तेलंगाना संघाबरोबर आज सायंकाळी ६:०० वाजता.अंतिम सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर कडून आक्रमक खेळाची अपेक्षा असून महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तिच्यावर भिस्त असणार आहे.




कोट: महाराष्ट्र मुलींचा संघ लयबद्ध खेळ करत असून स्पर्धेतील सर्व ४ सामने जिंकून संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.आम्हाला आशा आहे की अंतिम सामना जिंकून फेडरेशन  कप जिंकू.

( श्री नितीन बलराज,महाराष्ट्र महिला संघ प्रशिक्षक)

चंदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे आजपासून सुरू झालेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्करच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर महाराष्ट्राचा छत्तीसगडवर २१- ०७ व २१-१९  अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत छत्तीसगड संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-०७ ने पटकावला.अरमान कडून सुरेखाची सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेटमध्ये चंदीगड संघाकडून अप्रतिम खेळ बघायला मिळाला.१५ गुणांपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर छत्तीसगड संघाने सलग ४ गुण घेऊन ४ गुणांची आघाडी घेतली.१५- १९ ने पिछाडीवर असताना महाराष्ट्राने आपला खेळ उंचावत १९-१९ अशी बरोबरी साधली.कर्णधार श्रिया ने शेवटचे २ गुण मिळवत सामना २१-१९ गुणांनी जिंकला. साखळीतील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघावर २१-१३ व २३-२१ ने मात करून उपांत्य फेरी प्रवेश केला.साखळीतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राची गाठ पडेल ती दिव दमन या संघाबरोबर.

बेलापूरःमहिलांमध्ये उपजत गुणवत्ता व कौशल्य असते.ते विकसित होण्यासाठी सामाजिक प्रेरणेची गरज आहे.महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन पातळीवरुन विविध योजनांव्दारे प्रयत्न केले जातात.महिलांनी या योजनांचा लाभ घेवून आत्मनिर्भर बनावे.महिला बचत गटाच्या महिलांनी विविध उद्योग व व्यवसाय सुरु करावेत त्यासाठी महिलांना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी आध्यक्ष सौ.शालिनीताई पा.विखे यांनी केले.                                   

बेलापूर बुll ग्रामपंचायत आयोजित नविन घरकुल वसाहतीचे राधाकृष्णनगर व सुजयनगर नामकरण,महिला बचत गटांना फुड प्रोसेसिंग युनिट,दिव्यांगांना बॕटरी सायकल तसेच जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना टॕबचे वाटप कार्यक्रमप्रसंगी सौ.विखे पा. बोलत होत्या.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले होते.                                                                     सौ.विखे म्हणाल्या की,विखे परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे.मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी केला पाहिजे.बेलापूर ग्रामपंचायत नेहमीच महिलांच्या विकासाला प्राधान्य व प्रेरणा देते हे कौतुकास्पद आहे.नाम.राधाकृष्ण विखे यांना मंञी म्हणून जेवढी  खाती मिळाली त्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले.महिला बचत गटांना विविध साहित्य वितरित केले जात आहे.त्याचा वापर व्यवसायासाठी करावा.यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व सहकार्य केले जाईल असे आश्वासन सौ.विखे यांनी दिले.                                                                                     अध्यक्षपदावरुन बोलताना शरद नवले म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे  यांचेसह विखे परिवाराचे बेलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे.तालुक्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे ती विखे परिवाराने भरुन काढावी.नजिकच्या काळातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचे नाम.विखे पा.यांचे स्वप्न पूर्ण करु.नाम.विखे यांनी खंडकरी व आकारी पड शेतक-यांचा प्रश्न मार्गी लावला.वर्ग २च्या जमिनी विनामोबदला वर् १ केल्या.तालुक्यातील १४ गावांना गावठाण,घरकुले यासाठी मोफात जमिनी दिल्या.माजी महसूलमंञी श्री.थोरात यांनी एक गुंठाही जागा दिली नाही.त्यासाठी नाम.विखेंसारखी दानत लागते.भविष्यात नदी संवर्धन योजनेतून घाट विकास,जाॕगिंग ट्रॕक,जलतरण सुविधा विकसित करायची आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे  स्मारक निर्माण करायचे आहे.त्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत पालकमंञी नाम.श्री.विखे पा. व सौ.शालिनीताई विखे पा.यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.                                           बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावकरी मंडळाची सत्ता आल्यावर गावाच्या विकासाला गती मिळाली.गावासाठी १२६कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली.साठावण तलाव व १२०० घरकुलांची वसाहत,हिंदू,मुस्लिम,आदिवासी स्मशानभुमी,घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व क्रिडा संकुलासाठी नाम.विखे पा.यांनी बाजारभावाप्रमाणे सुमारे ९० कोटी मुल्याची ४३ एकर शेती महामंडळाची जमिन ग्रामपंचायतला मोफत दिली.आज जनसेवा फौंडेशनच्या वतीने ३९ महिला बचत गटांना ५० लाख रु.किमतीचे फुड प्रोसेसिंग युनीटस्,दिव्यांगांना बॕटरी सायकलस्,शालेय मुलांना टॕब आदि साहित्याचे वाटप केले जात आहे.यापुढील काळात नाम.श्री.विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावाची विकासकामे मार्गी लावू असे श्री.खंडागळे म्हणाले.                                     कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच स्वाती अमोलिक यांनी केले.तर प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रामविकास अधिकारी श्री.निलेश लहारे यांनी आभार मानले तर डाॕ.आदिनाथ जोशी यांनी सूञसंचलन केले.यावेळी  उपसरपंच प्रियंका कुऱ्हे, बाळासाहेब तोरणे,भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब शेटे,किशोर बनकर,महेश खरात,मुकुंद लबडे, विराज भोसले,प्रवीण लिप्टे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,तबसुम बागवान, मीना साळवी,सुशीलाबाई पवार,उज्वला कुताळ, वैभव कुऱ्हे,मानवी खंडागळे,प्रतिभा नवले, रणजीत श्रीगोड , पुरुषोत्तम भराटे, जालिंदर कुऱ्हे, कनजीशेठ टाक,  भाऊसाहेब कुताळ, हाजी इस्माईल शेख, सुभाष अमोलिक,सुधाकर खंडागळे, विष्णुपंत डावरे,वृद्धेश्वर कुऱ्हे,सागर खरात, अशोक गवते,अशोक प्रधान,प्रभात कुऱ्हे, अॕड. अरविंद साळवी, बाबुराव पवार,भाऊसाहेब तेलोरे,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,सचिन वाघ,किशोर महापुरे, अभिषेक नवले,गोपी दाणी,भैया शेख,रावसाहेब अमोलिक,प्रवीण बाठिया,मोहसिन सय्यद, वैभव खंडागळे,प्रशांत मुंडलिक, जिना शेख, गफ्फुर शेख, दादासाहेब कुताळ,सुधीर तेलोरे,बंटी शेलार,बबन मेहेत्रे,संजय भोंडगे,बाबूलाल पठाण,सचिन देवरे, अल्ताफ शेख, शहानवाज सय्यद,रवींद्र कुताळ, दस्तगीर शेख, उल्हास कुताळ,राहुल माळवदे, अन्वर सय्यद,समीर सय्यद,राम सोनवणे,शाम सोनवणे, सचिन मेहेत्रे,श्रीकांत अमोलिक, गणेश बंगाळ, राजेंद्र कुताळ, राज गुडे, गोरख कुताळ,सचिन अमोलिक,शाहरुख शेख,जाकीर हसन शेख, दिपक गायकवाड, राजेंद्र काळे, सद्दाम आतार,रफिक शहा, अनिल कुऱ्हे,युनुस शेख यांचे सह कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेलापूर ग्रामपंचायत कमर्चारी यांनी विशेष प्रयत्न केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget