Latest Post

श्रीरामपूर तालुक्यातील भामानगर येथील श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान येथे महाशिवरात्रीचा पवित्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. भगवान शिवाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा असलेल्या या दिवशी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान शिव हे संहारकर्ता आणि पुनरुत्थान करणारे देव असून, ते भक्तांच्या सर्व संकटांचे निवारण करतात. ते त्रिमूर्तींपैकी एक असून सृष्टीचा समतोल राखतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, असे मानले जाते. तसेच, या दिवशी भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते, असे अनेक धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. शिवभक्त या दिवशी उपवास करतात, जागरण करतात, मंत्रजप व अभिषेक करून भगवान शिवाची आराधना करतात.

    भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून प्रगट झालेल्या अग्निनारायणाचाच अवतार म्हणजे अडबंगनाथ महाराज आहे. असा हा पवित्र अडबंगनाथ जन्मोत्सव व महाशिवरात्री उत्सवाची प्रथा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांनी घालून दिलेली आहे. त्यामुळे या दिवसाला गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने विशेष महत्व आहे.

   अश्या या विशेष दिवशी अत्यंत उत्साहाने विविध धार्मिक  कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांची सुरुवात बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता नाथांचा अभिषेक व होम हवन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता ज्या भावीकांचे धर्मनाथ बीज उत्सवासाठी अनमोल योगदान लाभलेले आहे अशा भाविकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे सत्संग प्रवचन होईल. तसेच दु.12 वाजता ओम चैतन्य अडबंगनाथ जन्मोत्सव साजरा होईल.

  तद्नंतर खिचडी महाप्रसाद श्री.अर्जुन आप्पा लोखंडे पाथरे  यांच्या वतीने होईल व संतपूजन श्री.बाळासाहेब वाकचौरे नाशिक यांच्या वतीने होईल. 

या दिवशी हजारो भाविकांना अडबंगनाथांचे दर्शन घेण्याचा अभूत पूर्व योग प्राप्त होणार आहे.भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात हा सोहळा भाविकांसाठी अपूर्व आनंद देणारा ठरणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री अडबंगनाथ मंदिरात आध्यात्मिक लहरींनी भारलेले वातावरण अनुभवता येणार आहे. भव्य दिव्य असा महाशिवरात्री व अडबंगनाथ जन्मोत्सव आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी दिवसभर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अन्नक्षेत्र, गुरुकुल चालू आहे तरी आपणास कार्यक्रमासाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन श्री क्षेत्र अडबगनाथ देवस्थानचे महंत अरुणगीरीजी महाराज यांनी केले आहे 


तसेच हजारो शिवभक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी )--श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रहिवासी असलेले श्रीकिसन मुंदडा यांचे सुपुत्र डॉक्टर अतिश मुंदडा यांना असोसिएशन ऑफ फॉर्म्युसुटिकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एकदिवसीय परिषदेत डॉक्टर एस जी वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   छत्रपती संभाजीनगर येथे १५फेब्रुवारी रोजी झालेल्या असोसिएशन ऑफ फार्मासुट्टीकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एक दिवशीय परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात चांदवड येथील एस एन जे बी संचलित श्रीमान सुरेश दादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक डॉक्टर अतिशकुमार श्रीकिसन मुंदडा यांना *डॉ. एस. जी. वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर* या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रेसिडेंटच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी असोसिएशन ऑफ फार्मासुटीकल टीचर्स ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. मिलिंद उमेकर, डॉ. सोहन चितलांगे तसेच महाराष्ट्र शाखेचे प्रेसिडेंट डॉ. राकेश सोमानी व व्हाईस प्रेसिडेंट डॉ. स्वरूप लाहोटी आणि डॉ. शिरिष जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आठवडाभरापूर्वीच डॉ . मुंदडा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात दोन मानाच्या पुरस्कारावर डॉ. मुंदडा यांनी मोहर लावल्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

गौरव डेंगळे/उत्तराखंड :उत्तराखंड राज्याला ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मिळाले.उत्तराखंड हे यजमानपद भूषवणारे १२ वे राज्य बनले आहे.उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये खेळाडूंनी ५८ नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. यापैकी नऊ राष्ट्रीय विक्रम आहेत आणि ४९ राष्ट्रीय खेळांचे विक्रम आहेत.विक्रम करण्यात धनुर्विद्या आघाडीवर आहे,त्यात २२ नवीन विक्रम झाले.अॅथलेटिक्स १६ विक्रमांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार,राष्ट्रीय पातळीवर अ‍ॅथलेटिक्समध्ये एक,पोहण्यात दोन आणि वेटलिफ्टिंगमध्ये सहा विक्रम झाले आहेत.तर राष्ट्रीय खेळांच्या विक्रमांमध्ये, धनुर्विद्यामध्ये २२, अॅथलेटिक्समध्ये १५, पोहणे आणि वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी ०६ विक्रम आहेत.

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सर्वाधिक २२ विक्रम झाले. झारखंडच्या ऑलिंपियन दीपिका कुमारीने चार राष्ट्रीय खेळांमध्ये विक्रम प्रस्थापित केले.तिने ७० मीटर, २x७० मीटर, महिला संघ आणि मिश्र संघात हा विक्रम केला आहे. या राष्ट्रीय खेळांमध्ये तिरंदाजीमध्ये उत्तराखंडने फक्त एकच विक्रम केला आहे. उत्तराखंडच्या आदर्श पनवारने भारतीय फेरीत दोन राष्ट्रीय खेळांचे विक्रम मोडले.


राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणारे उत्तराखंड हे १२ वे राज्य बनले!!!


स्थापनेच्या २५ व्या वर्षाच्या सुरुवातीला, उत्तराखंडने राष्ट्रीय खेळांचे आयोजन करून देशभरात क्रीडाभूमी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तराखंड हे राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणारे देशातील १२ वे राज्य बनले आहे.

१९२४ मध्ये देशात भारतीय ऑलिंपिक खेळ सुरू झाले. मग शहरांना यजमानपद देण्यात आले. १९३८ पर्यंतच्या ८ आवृत्त्यांपैकी ३ स्पर्धा लाहोरमध्ये झाल्या.त्यानंतर, १९४० पासून त्याचे नाव बदलून राष्ट्रीय खेळ असे करण्यात आले. १९४० ते १९७९ पर्यंत, १७ आवृत्त्या शहरांनी आयोजित केल्या होत्या.

कटक, मद्रास आणि लाहोर येथे खेळ दोनदा आयोजित करण्यात आले होते.परंतु १९८५ मध्ये,२६ व्या राष्ट्रीय खेळांपासून,त्याचे स्वरूप बदलण्यात आले आणि ते ऑलिंपिक स्वरूपाच्या धर्तीवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये राज्यांना खेळांचे आयोजन देण्यात येऊ लागले.१९८५ मध्ये दिल्ली पहिले यजमान बनले.

तेव्हापासून,२०२५ पर्यंत १३ आवृत्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत आणि उत्तराखंडला ३८ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मिळाले. उत्तराखंड हे यजमानपद भूषवणारे १२ वे राज्य बनले आहे. तर केरळमध्ये दोनदा खेळ आयोजित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य आजपर्यंत राष्ट्रीय खेळांचे आयोजन करू शकलेले नाही.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पुण्याहून जम्मूतावीला जाणारी व जम्मूतावीहून  पुण्याला येणारी झेलम एक्सप्रेस ही गाडी १६ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पत्रकार देण्यात आली आहे.

जम्मू येथे रेल्वे यार्ड चे मोठे काम सुरू  असल्याने सुमारे ३७ दिवसांसाठी वेगवेगळ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये पुण्याहून जम्मूतावीला जाणारी 11077 क्रमांकाची गाडी १७ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहे तर जम्मूतावीहून पुण्याला येणारी 11078 क्रमांकाची गाडी २१ फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंत बेलापूर म्हणजे श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर येणार नाही.त्यामुळे सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे.

दरम्यान मध्ये रेल्वेने झेलम रेल्वे १६ दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगर व श्रीरामपूर मधील प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या भागातून मोठ्या संख्येने प्रवासी वैष्णोदेवीसाठी या गाडीने जम्मूतावी ला जातात तसेच दिल्ली आणि पंजाब मधील अनेक गावांना जाण्यासाठी ही थेट गाडी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे खात्याने ही गाडी पूर्णपणे रद्द न करता किमान नवी दिल्लीपर्यंत सुरू ठेवायला पाहिजे होती अशी अपेक्षा बंटी गुरुवाडा,सलीमखान पठाण,अशोक उपाध्ये,राजेंद्र सोनवणे, अयाज तांबोळी यांनी व्यक्त केली.रेल्वेच्या या तुघलकी निर्णयाने प्रवाशांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागणार आहे.सध्या लग्नसराई व परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज नवले याचे चिरंजीव यश याची आशियाई पाॅवरलिफ्टिंग चम्पियनशीप २०२५ स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत त्याने घवघवीत यश संपादित करुन द्वितीय क्रमांक पटकावला होता त्यामुळे ही निवड करण्यात आली आहे.                       आशियाई स्पर्धा  २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धा गुजरात राज्यात संपन्न होणार आहे या स्पर्धेकरिता श्रीरामपूर येथील यश मनोज नवले यांची निवड  करण्यात आलेली आहे आहे. यश नवले याने  अमरावती येथे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या विषयात डिग्री व पदवी मिळवीलेली आहे.  हनुमान प्रसारक महाविद्यालय अमरावती येथे आपल्या खेळाचा सातत्याने सराव त्याने केला असून सध्या श्रीरामपूर येथील क्रीडा प्रशिक्षक माॅंटी साळवे , अविनाश राऊत तसेच मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली २५० किलो वजन उचलण्याचा सराव करत आहे. प्रसिद्ध नॅशनल बॉडी बिल्डर तसेच मानाचा गणपती वर्ष ७५ , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,  आझाद मैदान श्रीरामपूर , या मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांचे ते  चिरंजीव आहेत. यश नवले याने यापूर्वी देखील २०१३ मध्ये झालेल्या श्रीलंका येथे कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावून विजेतेपद मिळविले होते. या निवडीबद्दल राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील , राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते श्री. अविनाश आदिक , महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसीएनचे अध्यक्ष  सचिन टापरे, श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक , अहिल्यानगर जिल्हा पावर लिफ्टिंगचे अध्यक्ष  मनोज गायकवाड, प्रख्यात उद्योजक आशिषदादा बोरावके, माळी शुगर कारखान्याचे संचालक यश बोरावके, किशोर मल्टिप्लेक्स चे मालक कुणाल बोरावके गणगोत परिवार सोशल फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष देविदास देसाई प्रदेश सचिव राहुल क्षीरसागर सहसचिव कचरू वाघ उदय जगताप राजेंद्र गवळी ठकुनाथ भगत सुनील बडसल रवींद्र शिंदे माणिक देसाई रामदास गवळी अजिंक्य जगताप राजेंद्र जगताप प्रभाकर पराड इंद्रजीत पाटील खराद यांनी अभिनंदन केले आहे.

खंडाळा (गौरव डेंगळे): एकात्मिक बालविकास सेवा योजना,श्रीरामपुर शिरसगाव गट अंतर्गत खंडाळा येथील सांस्कृतिक भवन मध्ये आरंभ धमाल बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी एकात्मिक बा.वि.से.यो प्रकल्प श्रीरामपूर प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे,शिरसगाव बीट सुपरवायझर कल्पना फासाटे,तपर्यवेशिका आशा खेडकर, शांता गव्हाणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ छाया बर्डे यांच्यासह उपसरपंच भारती वाघमारे, सदस्या मंजुषा ढोकचौळे,अनिता मोरे,सोनाली विद्यावे, लहानबाई रजपूत,श्री ताराचंद अलगुंडे,संगिता ढोकचौळे,आरोग्य विभागाच्या डॉ मोक्षदा पटेल,खंडाळा दत्तनगर,शिरसंगाव,दिघी,गोंडेगावच्या आशा सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.बालकाचे बाल अवस्थेतील वय वर्ष ० ते ६ वर्ष हा काळ किती महत्त्वाचा असतो याची माहिती या स्टॉल द्वारे पालकांना देण्यात आली. प्रत्येक बालकाचा वाढत्या वयाप्रमाणे कशाप्रकारे विकास होतो याची देखील माहिती देण्यात आली.सर्व कार्यक्रमाची माहिती सौ फासाटे यांनी उपस्थित पालकांना दिली. कार्यक्रमासाठी मंडपाची व्यवस्था खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती.

गौरव डेंगळे/उत्तराखंड: सव्र्हिसेसने राष्ट्रीय खेळांमध्ये आपला दबदबा कायम ठेवत उत्तराखंडमधील ३८ व्या आवृत्तीत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.सव्र्हिसेसने गुरुवारी आणखी नऊ पदके जिंकली,ज्यात तीन सुवर्ण पदके आहेत,एकूण १२१ (६८ सुवर्ण, २६ रौप्य, २७ कांस्य). गोव्यात २०२३ च्या आवृत्तीत ते महाराष्ट्राच्या मागे दुसऱ्या स्थानावर होते.

त्याआधी,सलग चार राष्ट्रीय खेळांमध्ये (२००७,२०११, २०१५ आणि २०२२) पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते.महाराष्ट्राने १९८ (५४ सुवर्ण,७१ रौप्य,७३ कांस्य) सह सर्व्हिसेसपेक्षा अधिक पदके जिंकली परंतु सुवर्ण संख्या कमी म्हणजे ते दुसऱ्या स्थानावर राहिले.हरियाणाने १५३ (४८ सुवर्ण,४७ रौप्य,५८ कांस्य) मिळवून सर्व्हिसेसपेक्षा अधिक पदके मिळवली पण तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.कर्नाटक (३४ सुवर्ण,१८ रौप्य,२८ कांस्य) आणि मध्य प्रदेश (३३ सुवर्ण,२६ रौप्य,२३ कांस्य) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले.

तामिळनाडू (२७ सुवर्ण,३० रौप्य,३४ कांस्य),उत्तराखंड (२४ सुवर्ण,३५ रौप्य,४३ कांस्य), पश्चिम बंगाल (१६ सुवर्ण,१३ रौप्य,१८ कांस्य),पंजाब (१५ सुवर्ण,२० रौप्य,३१ कांस्य) आणि दिल्ली (१५ सुवर्ण,१८ रौप्य,२० कांस्य).२८ जानेवारीपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय खेळांच्या ३८ व्या आवृत्तीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हल्दवानी येथे समारोप समारंभ झाला.

हरिद्वार येथे झालेल्या हॉकी स्पर्धांमध्ये, हरियाणाने गेल्या आवृत्तीतील पराभवाचा बदला घेत त्यांनी अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा ४-१ असा पराभव करून महिला सुवर्णपदक जिंकले.

झारखंडने महाराष्ट्राचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले.

गोव्यातील २०२३ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये, नियमन वेळेत दोन्ही बाजूंनी गोलशून्य बरोबरी साधल्यानंतर मध्य प्रदेशने हरियाणाला शूटआऊटमध्ये ३-० ने पराभूत केले होते.

पुरुषांच्या स्पर्धेत कर्नाटकने उत्तर प्रदेशवर ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राने पंजाबवर १-० अशी मात करत कांस्यपदक पटकावले.

डेहराडूनमध्ये जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम दिवशी पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

सहा दिवस चाललेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने मात्र १२ सुवर्णांसह २४ पदकांसह जिम्नॅस्टिक पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.पश्चिम बंगाल ५ सुवर्णांसह १२ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हरियाणाच्या योगेश्वर सिंगने पुरुषांच्या कलात्मक व्हॉल्टिंग टेबल इव्हेंट आणि हॉरिझॉन्टल बारमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली. त्याने व्हॉल्टिंग टेबल स्पर्धेत १३.५०० गुण मिळवले, तर क्षैतिज बारमध्ये त्याने १२.३६७ गुण मिळवले.

पश्चिम बंगालच्या रितू दासने महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्स बॅलन्स बीम स्पर्धेत ११.३६७ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर संघसहकारी प्रणती दासने महिलांच्या मजल्यावरील व्यायाम स्पर्धेत अव्वल पारितोषिक पटकावले.

ओडिशाची टोकियो ऑलिंपियन प्रणती नायक हिला बॅलन्स बीम प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्राच्या परिना राहुल मदनपोत्रा ​​हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्स क्लब स्पर्धेत २५.६० गुणांसह सुवर्णपदक मिळवले. रिदमिक जिम्नॅस्टिक्स रिबन स्पर्धेत जम्मू आणि काश्मीरच्या मुस्कान राणा आणि महाराष्ट्राच्या संयुक्ता प्रसेन काळे यांनी २५.५५० गुणांसह सुवर्णपदक मिळवले.

समांतर बार स्पर्धेत,ओडिशाचा राकेश कुमार पात्रा १२.६०० गुणांसह विजयी ठरला.

टेबल टेनिसमध्ये,महाराष्ट्राच्या जयश अमित मोदीने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकण्यासाठी तामिळनाडूच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या साथियान ज्ञानसेकरनवर अपसेट विजय (७-११,६-११,११-७,११-८ १४-१२,६-११,११-६) नोंदवला.

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या सेलेना दीप्ती सेल्वाकुमारने महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषला ११-७, ११-२, ६-११, ७-११, ८-११, ११-७, ११-९ असे पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

मिश्र दुहेरीत पश्चिम बंगालच्या अनिर्बन घोष आणि अहिका मुखर्जी यांनी महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या आणि रीथ रिश्या टेनिसन यांना १०-१२, ६-११, ११-७, ११-८, ११-२ असे पराभूत करून विजेतेपदावर कब्जा केला.

टिहरी लेक येथे आयोजित कयाकिंग आणि कॅनोइंग स्प्रिंट स्पर्धेच्या अंतिम दिवशी, श्रुती चौगुले, ओइनम बिद्या देवी, ओइनम बिनिता चानू आणि खवैरकपम धनमंजुरी देवी यांचा समावेश असलेल्या ओडिशाच्या संघाने ०१:४६.९५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

उत्तराखंडच्या फेरेनबान सोनिया देवीने महिलांच्या K-1 ५०० मीटर स्पर्धेत ०२:०६.९३५ सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले, तर पुरुषांच्या K-4 ५०० मीटर स्पर्धेत सनी कुमार, वरिंदर सिंग, गोली रमेश आणि अजित सिंग यांच्या सर्व्हिसेस संघाला सुवर्णपदक मिळाले ज्यांनी ०१:२८.३२० सेकंदात शर्यत पूर्ण केली.

स्कीट मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत हरियाणाच्या शान सिंग लिब्रा आणि रयझा धिल्लन यांनी पंजाबच्या गनेमत सेखॉन आणि भावतेघ सिंग गिल यांचा ४१-३९ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget