Latest Post

गौरव डेंगळे २७/१२ उत्तराखंड:-२८ जानेवारीपासून राज्यात ३८ व्या राष्ट्रीय खेळांना सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि क्रीडा मंत्री रेखा आर्य यांनी मशाल रिलेचे उद्घाटन केले जे राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ३८२३ किलोमीटरचे अंतर कापेल.

गौलापार येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, मशाल खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देईल.खेळाडूंना जिंकण्याचा निर्धार बळकट करावा लागेल जेणेकरून ते अव्वल स्थानी पोहोचू शकतील.क्रीडामंत्री रेखा आर्य यांनी खेळाडूंना सांगितले की, तुम्ही या खेळांमध्ये इतिहास बदला, आम्हाला टॉप-५ मध्ये यायचे आहे.यानंतर मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांनी मशाल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

ही रॅली काठगोदाममार्गे वाहनांतून नैनिताल रोडवरील शहीद पार्कवर गेली. येथून मिनी स्टेडियमपर्यंत ऑलिम्पियन राजेंद्र रावत यांच्यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी एकामागून एक मशाल चालवली.

तेजस्विनी राज्याच्या सर्व १३ जिल्ह्यामधील प्रवास करेल,२७ जानेवारी रोजी देरादून मध्ये मशाल रॅली संपन्न होईल. त्यानंतर दिनांक २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय खेळाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात येईल.

बेलापूर - येथील तेलोरे चावडी येथे नाताळ सणानिमित्त बालकांनी बाळ येशू ख्रिस्ताचा जिवंत देखावा सादर केला. या देखाव्यात बालकांनी विविध प्रकारचे संदेशाचे फलक झळकावले.बालकांनी सादर केलेल्या जिवंत देखावा बघताच अनेकांनी बाळ येशू , माता मारिया, योसेफ, देवदूत, राजा, मेंढपाळ यांचं प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव घेतला.देखाव्यात प्रत्यक्ष आकाशात देवदूत, जमिनीवर झोपडीत गव्हाणी आणि बाळ येशू सह माता मारिया, पिता योसेफ, समोरुन राजा व त्याचे सहकारी घोड्यावर स्वार झालेले, मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यासह, खरीखुरी शेकोटी, गाढवं, शेती, रस्ते, डोंगरझाडी आणि प्रशस्त रांगोळी यादी सर्व प्रत्यक्षात साकार करण्यात आले.
देखाव्याच्या भोवताली बालकांनी आपल्या हातात अनेक संदेशाचे फलक झळकावले. उदाहरणार्थ "झाडे लावा, झाडं जगवा, पृथ्वी वाचवा",  पाणी वाचवा, जीवन वाचवा, मुलगी शिकली, प्रगती झाली, "सर्वधर्म समभाव", यादी संदेशासह बायबल मधील देवाची वचने सादर करण्यात आली. यावेळी अनेक भाविक भक्तांनी, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तोबा गर्दी केली होती. अनेकांनी बालकांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
बाळ येशू ख्रिस्त जन्म जिवंत देखाव्यात उदय तेलोरे, तेजस तेलोरे, संदेश तेलोरे, सागर तेलोरे, श्लोक तेलोरे, आयुष तेलोरे, आशिष तेलोरे, प्रतिक तेलोरे, विशाल तेलोरे, सतेज तेलोरे, अंशुमन शेलार, अनुष बनसोडे, विद्या बनसोडे, अनुष्का तेलोरे, पायल तेलोरे, समिक्षा तेलोरे, आरोही खरात, पुनम तेलोरे यादी बालकांनी सहभाग घेतला

सदर देखावा कार्यक्रम सादर करण्यासाठी रजनीकांत तेलोरे, सुधीरकुमार तेलोरे, भाऊसाहेब तेलोरे, सागर खरात, अमोल तेलोरे, आशाबाई तेलोरे, तेरिजा तेलोरे, प्रज्ञा तेलोरे, सोनीताई तेलोरे, ताई खरात, कविता तेलोरे यादींसह अनेकांनी परिश्रम घेतले


सदर बाळ येशू ख्रिस्त जन्माच्या जिवंत देखाव्यास जि.प.सदस्य शरदराव नवले, सरपंच स्वातीताई आमोलिक, उपसरपंच तबसुम बागवान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे, मुश्ताकभाई शेख यादींसह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. श्री.खंडागळे गुरुजी, सिस्टर लुईजा, सिस्टर सिसीली, सिस्टर प्रभा, सिस्टर रिटा, सिस्टर जॅकेलिन, सौ.दुशिंग, श्री. व सौ. पंडित, यादींनी संपूर्ण धर्म प्रांतात प्रत्यक्ष भेटी देऊन स्पर्धेत सहभागी गव्हाणींचं परिक्षण केले. उत्कृष्ट गव्हाणीस बक्षीस देण्यात येणार आहे

श्रीरामपूर  -नेवासा-संगमनेर रोड ची झालेली प्रचंड दुरावस्था व शहरातील इतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने नगरपलिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांनी केले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला सुनावले की, "नेवासा-संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारून नागरिकांसाठी न्याय मिळवेल


यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली."रस्ते दुरुस्त करा" आणि "प्रशासन हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांच्या हालांची दखल घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेला अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल,असा इशारा यावेळी दिला गेला.26 जानेवारी पर्यंत श्रीरामपूर आतील रस्त्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.


या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन,रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. शिवसेना नेहमीच जनतेसाठी लढत राहील असे नेते संजय छल्लारे यांनी ठामपणे सांगितले.


यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,व्यापारी असोसिएशनचे सुनील गुप्ता,गौतम उपाध्ये, बाळासाहेब खाबिया, योगेश ओझा,संदीप आगरकर,नंदूशेठ कोठारी,संजय कासलीवाल,राहुल कोठारी,प्रेमचंदजी कुंकुलोळ,मुकेश कोठारी,माजी नगरसेवक राजू अदिक, पत्रकार सलीमखान पठाण माजी नगरसेवक भरत कुंकूलोळ,शरद कोठारी, नगरसेवक आण्णासाहेब डावखर, नगरसेवक आशिष धनवटे,भरत जगदाळे,अशोक बागुल,संजय रूपटक्के, अशोक शिवरकर, नवनाथ जेजुरकर, संजय लाड,चंद्रकांत कर्नावट,सुभाष जंगले, नवनाथ शेळके निवृत्त अभियंता नामदे साहेब, कैलास शिंदे,राजेंद्र भोंगळे,राजेंद्र भांबरे, सुरेश कांगुणे,संजय आगाशे,बापूसाहेब तुपे, जगन्नाथ हरार,विजय गांधी,चिरायु नगरकर, नजीरभाई शेख,बुऱ्हान जमादार,मुन्ना पठाण, माजी नगरसेवक सुनील बोलके,सुनील गलांडे,निलेश गोराणे, अमरप्रीत सेठी,माजी नगरसेवक श्याम अडांगळे,निलेश धुस्सा,सुरेश कोळेकर, किरण कर्नावट,दीपक कदम,हरीकृष्ण निर्माळ,नितीन हारदे,धीरज तलवार,संतोष मोरगे,अजय भागवत,मयूर पाटनी,विनीत कुंकूलोळ, निलेश बोरावके,विलास बोरवके,शिवसेनेचे ज्येष्ठ अशोक मामा थोरे, तालुकाप्रमुख लखन भगत,सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्ये,शरद गवारे तेजस बोरावके, युवासेना तालुकाप्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहर प्रमुख सिद्धांतभैय्या छल्लारे, रोहित नाईक,विशाल पापडीवाल,विक्रम नाईक,अकिल पठाण, प्रमोद गायकवाड,बापू तुपे,रोहित भोसले,अजय छल्लारे,प्रकाश परदेशी, योगेश ढसाळ,शुभम छल्लारे,राजू डुकरे, मुस्ताक शेख,विशाल दुपाती,महेश जगताप, गोरख गुळवे,निलेश मटाले,मोती व्यवहारे, देवेन पीडियार,ज्ञानेश्वर सारंधर,विकी गंगवाल, लोकेश नागर,सुहस परदेशी,बापू बुधेकर,  दत्ता करडे,प्रवीण शिंदे,व इत्यादी सह शिवसैनिक उपस्थित होते.

कोपरगाव (गौरव डेंगळे): येथील सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या १६ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीसीसी,नाशिक संघाने राहता स्ट्रायकर्स संघाचा २-० ने पराभव करून शारदा व्हॉलिबॉल चषक पटकावला.

श्रीरामपूर,राहता,कोपरगाव, नेवासा,ओझर,नासिक आदी ठिकाणाहून १२ उत्कृष्ट संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये राहता स्ट्रायकर्स संघाने अष्टविनायक ओझर संघावर रंगतदार झालेल्या सामन्यांमध्ये १५-१२,०८-१५ व १५-१३ ने मात करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत बलाढ्य डीसीसी नाशिक संघाने सेंट मेरी नेवासा संघावर १५-११ व १५-१२ ने मात करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यांमध्ये बलाढ्य डीसीसी संघाने राहता स्ट्रायकर्स संघाचा सरळ सेटमध्ये २५-१७ व २५-१८ने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेमध्ये आक्रमक खेळ करणारा नाशिकचा भरत पवारला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

 स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून नितीन बलराज,तर स्पर्धेचे पंच म्हणून धनंजय माळी,भूषण माळी, आर्यन उपाध्ये व आदित्य पटारे यांनी काम पाहिले.विजेत्या संघांना शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, क्रीडा मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे,उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे, सौ नैथिली फर्नांडिस,क्रीडा प्रमुख श्री धनंजय देवकर,श्री शिवप्रसाद घोडके तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 


*स्पर्धेचा अंतिम निकाल*


#विजेता: डीसीसी,नाशिक ₹ ५०००/- चषक व प्रमाणपत्र. 


#उपविजेता: राहता स्ट्रायकर्स ₹ ३०००/- चषक व प्रमाणपत्र.


#तृतीय_क्रमांक : सेंट मेरी स्कूल नेवासा ₹ २०००/- चषक व प्रमाणपत्र.


#चतुर्थ_क्रमांक: अष्टविनायक ओझर ₹ १०००/- चषक व प्रमाणपत्र.

कोपरगाव (गौरव डेंगळे): सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने एक दिवसीय १६ वर्षाखालील मुलांच्या पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धेचा आयोजन शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी कोपरगावात करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी पुणे,नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातून १२ संघ सहभागी होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु ५०००/- व चषक, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रु ३०००/- व चषक,तृतीय क्रमांकासाठी रु २०००/- व चषक तर चतुर्थ क्रमांक संघासाठी रू १०००/- व चषक पारितोषिक विजेत्या संघाला प्रधान करण्यात येईल. स्पर्धेच्या दिवशी ठीक ९:३० वा सामन्यांना सुरुवात होईल,स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा स्पर्धेच्या दिवशी दु ५:०० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे यांनी दिली.

बेलापूर (प्रतिनिधी)--श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे येथील सरपंच पदी सौ कल्पना अण्णासाहेब गेठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळत्या सरपंच सौ सविता शहाजी वडीतके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेले याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद तांबे निखिल वडीतके सौ सुमनबाई जांभुळकर सौ पुष्पाताई चितळकर सविता वडीतके गोकुळ पवार आदी सदस्य उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी मंडलिक यांनी काम पाहिले तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डमाळे यांनी काम पाहिले ग्रामसेवक ताराचंद गाडे यांनी त्यांना सहाय्य केले नूतन सरपंच कल्पना गेठे यांना माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या नूतन सरपंच निवडीनंतर सौ कल्पनाताई गेठे व मावळत्या सरपंच सविता शहाजी वडीतके यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी अण्णासाहेब गेठे मंडळाचे नेते प्राध्यापक भानदास वडीतके तंटामुक्ती अध्यक्ष शंकर पावले चांगदेव वडीतके भाऊसाहेब चितळकर विठ्ठल चितळकर बबनराव वडीतके केशवराव दळवी सुमित तांबे प्रभाकर तांबे बापूसाहेब शेंडे प्राध्यापक बबनराव तांबे जालिंदर तांबे मच्छिंद्र तांबे विठ्ठल दळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो  या उद्देशाने संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ह भ प शितलताई साबळे यांनी व्यक्त केले नागेबाबा परिवाराकडून गळनिंब येथील भोसले परिवाराला नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत दहा लाख रुपये मदत निधी देण्यात आला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून साबळे ताई बोलत होते यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार देविदास देसाई गळनिंब येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेरमाळे कॉम्रेड पांडुरंग शिंदे जानकु वडीतके आरोग्य मित्र सुभाष गायकवाड अण्णासाहेब कडनोर डॉक्टर सुनील शिंदे बबनराव वडीतके अण्णासाहेब जाटे उपस्थित होते. कोल्हार शाखेचे खातेदार व गळनिब येथील रहिवासी कै. प्रदीप इंद्रभान भोसले यांचे चार महिन्यापूर्वी आकस्मीत निधन झाले  प्रदीप भोसले यांनी नागेबाबा पतसंस्थेच्या कोल्हार शाखेकडून 1500/- भरून नागेबाबा सुरक्षा कवच या योजनेअंतर्गत नाव नोंदणी केली होती. सदर योजनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेरमाळे यांना असल्याने त्यांनी संस्थेला माहिती दिली. अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यु झालेल्या प्रदीपच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. श्री संत नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजने अंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश ह भ प शितलताई साबळे व ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या शुभहस्ते भोसले कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी आरोग्यमित्र सुभाष गायकवाड  देविदास देसाई नागेबाबा परिवारातील योगिता पटारे राजू चिधे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नागेबाबा परिवाराचे सदस्य राजू भाऊ चिंधे,यशवंत मिसाळ रिजनल ऑफिसर, योगिता पटारे मॅडम, प्रशांत रासकर, नंदा बाचकर, महेश मोहिते, शुभम साबळे ,विशाल अनाप, कैलास चोखर, अमित बोरावके, योगेश भाग्यवान, आसिफ सर,अण्णासाहेब कडनोर, सरपंच शिवाजी चिंधे,मच्छिंद्र थोरात, डॉक्टर कोंडीराम चिंधे, डॉक्टर सुनील चिंधे, संजय कुदनर, बबनराव वडीतके, रामदास एनोर, अण्णासाहेब जाटे, नामदेव जाटे,संजय शिंदे, अजित देठे, संजय भोसले, चंद्रभान भोसले, इंद्रभान भोसले प्रभाकर भोसले सचिन भोसले, ग्रंथपाल सुभाष भोसले, यादी भोसले कुटुंबिय उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन सूर्यभान वडीतके यांनी तर आभार सुनील शिंदे यांनी मांडले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget