Latest Post

 

*गावातील महिलांनी सावधानता बाळगावी*बेलापुर (प्रतिनिधी )-अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हँक करुन मोबाईल डाटावरुन गावातील महीलांना फोन करुन पैसे लुटण्याचा नविन फंडा सुरु झाला असुन कुणीही अशा अमिषाला बळी पडू नये असे अवाहन बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी केले आहे                                     काही दिवसापूर्वी बेलापुर खूर्द येथील अंगणवाडी सेवीका जया पुजारी यांचा मोबाईल हँक करुन गावातील महीलांची माहीती घेवुन त्यांना फेक काँल करण्यात आले तुमचे अनुदान मंजुर झाले आहे पैसे पाठविण्यासाठी फोन पे ओपन करा माहीती भरा ओटीपी टाका अशा सुचना देण्यात येतात बेलापुर खूर्द येथील पाच सहा महीला या अमिषाला बळी पडल्या त्यांचे पैसे गेले आता गळनिंब येथील सौ शितल सुनील वाघ या महिलेची आठ दिवसापूर्वी प्रसूती होऊन मुलगा झालेला असून त्या महिलेला आज जाटे वस्ती अंगणवाडी येथील सर्व माहिती सांगून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे नाव सांगून तुमच्या बाळाचे सात हजार रुपये मंजूर झाले असून तुम्हाला ते फोन पे ला पाठवायचे आहे. असे सांगून फोन पे सुरू करण्यास सांगितले व नोटिफिकेशन पाठवून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला घेता येईल. असे सांगून पाच हजार रुपये फोन पे ने काढून घेतले. या प्रकारच्या अनेक घटना ग्रामिण भागात घडत आहेत या बाबत कुणीही तक्रार करत नाही हा सर्व प्रकार फेक आसुन शासन कुठल्याही प्रकारे फोन पे द्वारे अनुदान पाठवत नाही शासनाचे जे अनुदान येते ते सरळ आपल्या बँक खात्यावर येते त्यामुळे कुणीही या अमिषाला बळी पडू नये  ग्रामीण भागातील महिलांनी असे फोन कॉल आल्यानंतर संबंधित व्यक्तीना किंवा आम्हाला फोन करावा. व कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असे अवाहन सभापती सुधीर नवले यांनी केले आहे 

गौरव डेंगळे (श्रीरामपूर):पॅरिस १०,००० हून अधिक खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे कारण शहर ऑलिम्पिकच्या ३३ व्या आवृत्तीचे यजमानपदासाठी सज्ज आहे.या वर्षीचे उन्हाळी खेळ २६ जुलैपासून सुरू होणार असून क्रीडा चाहत्यांना ३२ खेळांमधील ३२९ पदक स्पर्धा पाहता येणार आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक ही कॅलेंडरमधील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणार आहे.फ्रान्सची राजधानी ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याने,या वर्षीच्या उन्हाळी ऑलिंपिकबद्दल तुम्हाला या सहा गोष्टी माहित असणे आवश्यक आहे जे उन्हाळी खेळांच्या मागील आवृत्त्यांपेक्षा वेगळे बनवतील.

पॅरिस ऑलिंपिक २०२४

 

#प्रतीक 

पॅरिस ऑलिम्पिकसाठी २०१९ मध्ये पुन्हा चिन्हाचे अनावरण करण्यात आले.हे चिन्ह तीन प्रतिकात्मक चिन्हे एकत्र आणते, प्रत्येकी एक प्रतिनिधित्व करणारी,खेळ,खेळ आणि फ्रान्स. सुवर्णपदक म्हणजे क्रीडा,ज्योत ऑलिम्पिक खेळांचे प्रतिनिधित्व करते आणि मारियान फ्रान्सचे प्रतिनिधित्व करते.मारियान फ्रेंच कला आणि लोकप्रिय संस्कृतीतील एक प्रमुख व्यक्ती आहे. हे चिन्ह स्पष्टपणे स्त्रीलिंगी आहे आणि ते १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिक गेम्सचे स्मरण करते जेव्हा महिलांना पहिल्यांदा ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच प्रथमच पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरालिम्पिकचे प्रतीक एकच असेल! 


#उद्घाटन सोहळा 


पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा इतर कोणत्याही मागील ऑलिम्पिकमध्ये पाहिल्या गेलेल्या उद्घाटन सोहळ्यापेक्षा वेगळा असेल.पॅरिस ऑलिम्पिक ही परंपरा झुगारेल कारण त्याचा उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नसून नदीवर होणार आहे. २६ जुलै रोजी,पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी, हजारो ऍथलीट सीन नदीवर नौका घेऊन आयफेल टॉवरकडे जातील. 


#पदके 

 प्रत्येक ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक आयफेल टॉवरच्या मूळ लोखंडाच्या तुकड्याने सेट केले जाते. पदकांची वैशिष्ट्ये: तीन पदकांचा व्यास आणि जाडी निश्चित केली आहे. व्यास ८५ मिमी आणि जाडी ९.२ मिमी आहे. सुवर्णपदकाचे वजन ५२९ ग्रॅम, रौप्य पदकाचे वजन ५२५ ग्रॅम आणि कांस्यपदकाचे वजन ४५५ ग्रॅम आहे.पदकांची रचना फ्रान्सची भावना दर्शवते.


#मशाल 

 पॅरिस गेम्ससाठी ऑलिम्पिक मशालच्या डिझाईनचे २०२३ मध्ये अनावरण करण्यात आले. मशाल,प्रत्येक ऑलिम्पिक खेळांसाठी मध्यवर्ती वस्तू,फ्रेंच डिझायनर मॅथ्यू लेहॅन्युर यांनी तयार केली आहे.पॅरिस ऑलिम्पिकची मशाल तीन मुख्य संकल्पनांनी प्रेरित होती: समानता, पाणी आणि शांतता. टॉर्च डिझाइनच्या परिपूर्ण सममितीमध्ये समानता दर्शविले जाते, क्षैतिज आणि अनुलंब दोन्ही.तरंग पाण्यासाठी उभे आहेत आणि मशालीवरील सौम्य वक्र आणि गोलाकार रेषा शांततेचे प्रतिनिधित्व करतात. 


#शुभंकर  

"द फ्रायजेस" हे पॅरिस ऑलिम्पिकचे अधिकृत शुभंकर आहे. फ्रायजेस हे फ्रेंच हॅट्सचे प्रकार आहेत. या टोप्या फ्रेंच क्रांतिकारकांनी लोकप्रिय केल्या होत्या आणि त्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत."द फ्रायजेस" खेळाच्या माध्यमातून क्रांतीसाठी उभा आहे.



#चित्रे 

१९६४ मध्ये टोकियोने गेम्सचे आयोजन केले तेव्हा चित्रचित्रांचा प्रथम वापर ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला.१९६० पासून ते १९९२ पर्यंत जेव्हा बार्सिलोनाने उन्हाळी ऑलिंपिकचे आयोजन केले तेव्हा चित्रचित्रांचा प्रारंभिक संच सारखाच होता.त्या गेम्सपासून प्रत्येक ऑलिम्पिकचे चित्रचित्र वेगळे आहेत.पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरालिम्पिक खेळांसाठीचे ६२ चित्रचित्रे केवळ विविध खेळांचेच नव्हे,तर प्रत्येक खेळाचा अभिमान आणि मूल्ये दर्शवणारे मानके म्हणून डिझाइन केलेले आहेत.प्रत्येक चित्रलेखाचा उद्देश "सन्मानाचा बिल्ला" म्हणून परिधान करणाऱ्यांच्या त्यांच्या निवडलेल्या क्रीडा कुटुंबाशी संबंधित असल्याचे प्रतीक आहे, चाहते आणि खेळाडू सारखेच त्यांचा अंगरखा अभिमानाने परिधान करतात.

बेलापुर (प्रतिनिधी  )- सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या अधिपथ्याखाली स्वामी योगीराज श्री गंगागीरीजी महाराजपायी दिंडी सोहळ्याचे बेलापुरात मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले या वेळी श्री साई पावन प्रतिष्ठाण व बेलापुर ग्रामस्थ यांच्या वतीने साईबाबा मंदिर बेलापुर येथे वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला .या वेळी श्री साई पावन प्रतिष्ठाणच्या वतीने कैलास चायल ग्रामस्थांच्या वतीने शरद नवले सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख यांनी महंत रामगीरीजी महाराजांचा सत्कार केला या वेळी प्रकाश कुर्हे राजेंद्र सातभाई रेवणनाथ नवले राजेंद्र टेकाडे जनार्धन ओहोळ सुभाष राशिनकर आदिंनी वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवली या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक पोलीस पाटील अशोक प्रधान माजी सरपंच भरत साळूंके गणेश बंगाळ भास्कर बंगाळ चंद्रकांत नाईक सचिन नगरकर बाळासाहेब नाईक सुभाष नाईक विशाल आंबेकर अशोक गवते पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा रामविलास झंवर दिपक सिकची रांजेद्र लखोटीया संजय लढ्ढा रमेश पवार अशोक अंबीलवादे उंडे पाटील आदिसह ग्रामस्थ उपस्थित होता

कोपरगांव (प्रतिनिधी):सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून प्रखर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक २२ व २३ जुलै रोजी राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या स्पर्धेमध्ये विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.प्रथम पारितोषिक रोख रक्कम ५०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक रोख रक्कम २००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुढील सात संघास प्रत्येकी १०००/रुपयाचे पारितोषिक,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल 

ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता ८ ते १०चे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी श्री तुरकणे, सौ होन,श्री नन्नवरे आदींशी लवकरात लवकर संपर्क साधावा.

टीप -सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.

कोपरगांव (गौरव डेंगळे): दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात.ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद आणण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.त्याचेच औचित्य साधत विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे,रुपाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली १८०० विध्यार्थी व शाळेच्या शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून जगभरात २१ जुन  आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्वत:साठी आणि समाजासाठी योग या थीमसह आंतरराष्ट्रीय योग दिन

 जगभरात साजरा करण्यात आला आहे.यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,प्राथमिक पर्यवेक्षिका सौ पल्लवी ससाणे,प्री प्रायमरी पर्यवेक्षिका सौ नाथलीन फर्नांडिस व शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.

बेलापुर (प्रतिनिधी )- महेश नवमी या निमित्ताने बेलापुर माहेश्वरी समाजाच्या वतीने विवीध कार्यक्र‌माचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम झेंडा चौक येथे भगवान महेश च्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, त्यानंतर ग्रामपंचायत बेलापुर येथेही पुजन करण्यात आले त्यावेळेस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पद्माधिकारी, वा गावातील सर्व पक्षीय नेते, सर्म समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थीत होते. त्यानंतर गोशाळा रोड येथे वृक्षारोपन करण्यात आले. दुपारी 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.शोभायात्रेच्या मार्गावर लिंबू सरबत, थंड पाणी यांचे ग्रामस्थ व समाज बांधवांकडून वाटप करण्यात आले.  शोभायात्रेमध्ये युवा, युवती, महीला व समाज बाधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर महेश्वरी बालाजी मंदीरात भजनाच कार्यक्रम झाला तसेच समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आरती करून समाज बाधवाकरिता महाप्रसादाच्या कार्यक्रम सप्पन्न झाला, तसेच राजस्थानी युवा संघटनेच्या वतीने व जनकल्याण रक्तपेढी आहिल्यानगर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले •या वेळी•६९ बाटली रक्ताचे रक्तदान करण्यात आले. त्यानंतर प्रसाद सेतु कार्यालय याच्या सह‌कार्याने समाज बांधवाच्या विवीध सरकारी कागद पत्राची पुर्तता करून तयार दाखल्याचे  वाटप करण्यात आले: तसेच क्रिकेट सामन्याचेही आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये  महीला  युवक, युवतीनी व समाज बांधवांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला  सर्व कार्यक्र‌म यशस्वीतेसाठी सर्व समाज बाधंव महीला मंडळ, युवा संघटन आदिंनी विशेष परिश्रम  घेतले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी )-श्री महेश नवमी निमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये माहेश्वरी समाजाच्या सर्व व्यक्तींनी पारंपारीक वेशभूषेमध्ये सहभाग घेतला होता . यावेळी जय महेश च्या घोषणांनी वातावरण प्रफुल्लीत झाले. 

श्रीरामपूर शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने महीला क्रिकेट लिग चे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. दर वर्षी प्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यामध्ये ४० युनीट रक्त जमा झाले. याबरोबरच सेतू कार्यालयातर्फे शिबिर आयोजित केले गेले. यामध्ये १०० हून अधिक व्यक्तींनी आपले आधार कार्ड,  आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड ऑनलाईन केले, अद्ययावत केले. महेश नवमी दिवशी शैक्षणिक व  सामाजिक कार्यामध्ये विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करुन गौरविण्यात आले. नगरसेवक श्री. श्रीनिवासजी बिहाणी व सौ. राखीजी बिहाणी यांच्या सौजन्याने १०० रोपांचे वितरण करण्यात आले. संगठन आपल्या दारी या विषयावर समाजातील बहुतेक व्यक्तींनी आपले मत मांडले व त्यावर चर्चा केली गेली.

श्रीरामपूर शहरातील प्रख्यात डॉ. श्री. आदित्य द्वारकादास दमाणी प्लास्टीक सर्जन यांना समाजगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. डॉ. दमाणी यांनी तीन वर्षाच्या गरीब मुलीचे मनगटापासून पूर्णपणे कापला गेलेला हात पूर्णपणे व्यवस्थित करून तिला अपंग होण्यापासून वाचवले. 

महिला क्रिकेटच्या विजेत्यांचा यावेळी मेडल्स व ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला. सर्व बक्षीस हे महेश नागरी पतसंस्था, श्रीरामपूर यांच्या सौजन्याने दिले गेले.

 बक्षिस वितरणानंतर महेश भगवान ची आरती तसेच महाप्रसादाचा सर्व उपस्थितांनी लाभ घेतला . सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीरामपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष संदीप बुब, मंत्री योगेश करवा, जीवन सोमाणी, युवा अध्यक्ष सागर मुंदडा, युवामंत्री कुंदन मुंदडा, रितेश सोनी, कैलास सोमाणी, सौ. पूजा मुंदडा यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महिला मंडळ अध्यक्षा सौ. शितल भुतडा , माहेश्वरी हरियाली मंच अध्यक्षा सौ. गितांजली  बंग, प्रगती मंडळ अध्यक्ष सोमनाथ मुंदडा, नगरसेवक श्रीनिवासजी बिहाणी, प्रदेश प्रतिनिधी महेश बंग, जिल्हाकोश उपाध्यक्ष चेतन भुतडा, जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम झंवर,  राजेश राठी, विशाल पोफळे, राकेश न्याती, उषा मुंदडा, डॉ सपना करवा, डॉ .अतूल करवा, डॉ. सतीश भट्टड, अनिल न्याती, शांतीलाल बुब, रविंद्र सोनी, सूरज सोमाणी, गोपाल चांडक, विनित जाजू, अमोल बूब, मुकेश न्याती, मनोज राठी, पुरुषोतम बूब, डॉ. के.डी. मुंदडा, महेश नागरी पतसंस्थेचे कर्मचारी वृंद व  इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget