Latest Post

श्रीरामपूर नेवासा रोडवर भीषण अपघात अपघातात ट्रक व प्रवासी अँप्पेरिक्षा या समोर समोर धडकल्याने ॲपे रिक्षाचा चक्काचूर एक इसम जागीच ठार वाहतुकीची झाली कोंडी

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई पावन प्रतिष्ठाण व श्री साई सेवा समिती बेलापुर तसेच एस एम बी टी हाँस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री साई पावन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  कैलास चायल यांनी दिली आहे .     या शिबीरात शुगर ,रक्तदाब , ब्लड आँक्सीजन तपासणी ,ई सी जी केला जाईल तसेच तज्ञ डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार केले जातील .या शिबीरात हृदय रोगासंबधीत छातीत दुखणे ,चालताना दम लागणे ,दरदरुन घाम येणे ,छातीवर दबाव असणे, छातीत डाव्या बाजुला वेदना होणे ,हाताला मुंग्या येणे वेदना होणे आदि आजारावर मोफत निदान केले जाणार आहे. तसेच ई सी जी मोफत काढला जाणार आहे ,हर्निया ,हायट्रोसिल , अपेंडिक्स ,आतड्याच्या शस्रक्रिया स्वादुपिंडाच्या शस्रक्रिया ,मुळव्याध ,पित्ताशयातील खडे ,भगंदर आदि आजारावर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.तिरळेपणा,मोतीबिंदु रातआंधळेपणा ,दृष्टी कमी होणे आदि डोळ्याच्या तसेच नाक कान घसा यातील आजाराच्या देखील तपासणी करुन उपचार केले जाणार आहे तरी शिबीरार्थींनी रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री साई मंदिर बेलापुर येथे उपस्थित रहावे असे अवाहन श्री साई पावन प्रतिष्ठाण व साई सेवा समिती बेलापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच श्री साईबाबा मंदिरांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सांयकाळी ६ ते ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहनही सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )- येथील खटकाळी गावठाण येथे आपापसातील वादातुन झालेल्या भांडणातुन दहशत माजविण्याचा प्रकार समोर आलाअसुन यात एका  विधवेचे घर पेट्रोल टाकुन जाळण्यात आले तसेच  जाळपोळ,व वाहनांची मोडतोड असा प्रकार घडला.तथापि या घटनेचा बोभाटा झाला असला तरी त्या व्यक्तीच्या आसलेल्या दहशतीमुळे फिर्याद देण्यास कोणीच पुढे धजावत नसले तरी पोलीसांनी  या प्रकरणी फिर्यादी होवुन गावात दहशत माजविणार्याला धडा शिकवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे                                              याबाबतचा समजलेली हकीकत अशी की ,खटकाळी गावठाण येथे एक विधवा आपल्या तीन मुलासह रहाते तिचे शेजारी आसणाऱ्या सराईत गुन्हेगाराने गोंधळ घालुन तिला शिवीगाळ केली .त्याच्या धाकाने ती श्रीरामपुर येथील नातेवाईकाकडे राहण्यास गेली असता त्या व्यक्तीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला पेट्रोल टाकुन घरातील सर्व संसारपयोगी सामान पेटवुन दिले तसेच त्या परिसरात दहशत निर्माण  केली त्याच्या दहशतीमुळे अनेक जण घाबरले आहेत. काही दिवसापुर्वी अशाच प्रकारे दहशत करुन काही मोटारसायकली तसेच घरातील सामान पेट्रोल टाकुन जाळले होते त्या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल  आहे . येथे कायम गुन्हेगारांचा वावर असल्यामुळे  लहानमोठ्या तक्रारी होत आहेत .तसेच काही तडीपार गुंडही येथे राजरोसपणे आश्रय घेतात.याचाच परिणाम म्हणून  काल सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा परिसरात दहशत बसविण्यासाठी पेट्रोल टाकुन त्या गरीब विधवेचे संसारपयोगी सामान जाळण्यात आले आहे.                         आज दिवसभर या घटनेची चर्चा होत होती. पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली परंतु ती विधवा प्रचंड दहशतीखाली आसल्यामुळे तक्रार देण्यास पुढे आली नाही .असे प्रकार पुन्हा पुन्हा होत राहीले तर भविष्यात एखादी गंभीर घटना घडू शकते तरी पोलीसांनी वेळीच दखल घेवुन संबधीतावर कठोर कारवाई करावी अशी परिसरातील नागरीकांची मागणी आहे.

पृथ्वी तलावर आलेल्या प्रत्येकाला या पृथ्वीतलावरून अखेरचा निरोप घ्यायचा असतो. असे असले तरीही या पृथ्वीतलावरील प्रत्येक जण जसा प्रकृतीने भिन्न असतो तसाच तो स्वभावाने देखील भिन्न असतो.प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा असू शकत नाही. हा एक निसर्ग नियम आहे.

आयुष्यात आलेला प्रत्येक जन आपल्या संपूर्ण जीवनात वैविध्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करत असतो.काही व्यक्ती आपल्याला मिळालेल्या सुंदर जीवनाचा सदुपयोग करत जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोग होईल असा प्रयत्न करतात आणि त्यातूनच सत्कार्य अशा काही मिळालेल्या संधीतून जनसेवा करतात. हीच जनसेवा लोकांच्या हृदयात जागा निर्माण करून जाते. लोकांच्या हृदयात जागा निर्माण केल्यानंतर तीच व्यक्ती जेव्हा निसर्गचक्रानुसार पृथ्वीतलावरून निघून जाते, त्यावेळी हृदय तुटलेल्या व्यक्तींची काय अवस्था असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रमजानखान चांदखान पठाण होय.

सर्वसाधारणपणे अधिकारी म्हटलं कि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो.अगदी अधिकाऱ्यांना हृदय नसते यापासून तर अधिकारी फार करारी असतात इथपर्यंतचे विचार समाजामधून आपल्याला ऐकायला मिळतात. रमजानखान पठाण हे या वाक्यास अपवाद ठरले.त्यांनी त्यांच्या संपूर्ण अधिकारी पदाच्या काळामध्ये किती लोकांना जोडले हे त्यांच्या जाण्याने लोकांनी केलेल्या भावनांतून व्यक्त होते.

रमजान पठाण यांनी कधीही केलेल्या कार्याचे आईने दिलेल्या शिकवणी प्रमाणे एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू दिले नाही. कळू द्यायचे नाही याप्रमाणेच अनेकांना त्यांच्या सेवेमध्ये अडचणींना साथ देत त्यावर आपल्या ज्ञानाने माफ करत अनेकांना अडचणीतून सोडवलेच तर अनेकांना मदतीचा सहकार्याचा हातही दिला.

फक्त एखाद्याची अडचण त्यांच्या कानावर पडण्याचा उशीर कि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करत संबंधितास कशाप्रकारे मदत करता येईल याचाच ते सदैव प्रयत्न करत असत.प्रसंगी या जनसेवेच्या काळामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. मात्र तरीही लोकांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण ती केलीच पाहिजे याच हेतूने ते सतत कार्यरत असायचे. त्यातूनच त्यांनी आपल्या मूळ श्रीरामपूर गावापुरतेच काम न करता,फक्त जिल्हया पुरते काम न करता राज्यभरामध्ये काम केले.ते कार्यरत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी हे पद,या पदास एक उंची गाठून देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.एकेकाळी शिक्षण विस्तार अधिकारी हे पद फक्त बाहुले म्हणूनच होते अशी सर्वांचे भावना होती. मात्र रमजान पठाण यांनी राज्यात शिक्षण विस्तार अधिकारी संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरती लढा उभारून एक वेगळ्या प्रकारचे स्थान शिक्षण विस्तार अधिकारी पदाला मिळवून दिले. त्याचमुळे राज्यभर असलेले त्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी सहकारी मित्र आपल्या मित्राला नेतृत्वाला अलविदा करताना भावना विवश झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी व्यक्त केलेल्या भावना या हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या आणि रमजान पठाण नेमके कसे होते हे या व्यक्त झालेल्या भावनांतून दिसून आले.

नव्याने हजर झालेल्या शिक्षकास आधार देत भविष्यात चांगले काम करण्याची संधी निर्माण असल्याचे सांगत उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्या कामी सतत प्रेरणादायी काम पठाण साहेबांनी केले.

संपूर्ण राज्यात प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता हा कळीचा मुद्दा ठरत असतो.या मुद्द्याला स्पर्श करण्यास बरेचसे अधिकारी टाळाटाळ करतात.मात्र रमजान पठाण यांनी अत्यंत बारकाईने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचे काम करून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. रमजानभाई यांनी केलेल्या संच मान्यतेस राज्यातील कोणत्याही व्यक्तीने दिलेले आव्हान कोलमडून पडल्याशिवाय राहायचे नाही. म्हणूनच अत्यंत जवळच्या मित्राने याबाबत त्यांचा उल्लेख संच मान्यतेचा बादशहा असा केला.

आपण नगर जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना मराठी माध्यमासोबतच उर्दू भाषिक शाळांचा देखील नावलौकिक कसा वाढेल याचा सातत्याने मागील काही वर्षे त्यांनी उत्तम असा प्रयत्न केला.

रमजान पठाण यांनी शैक्षणिक सेवा देत असतानाच समाजासाठीही ते वेळोवेळी पुढे आल्याचे त्यांच्या सामाजिक कार्यातून देखील दिसून येते. त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर शहरात उभारली गेलेली मिल्लत नगर या भागातील मिल्लत मस्जिद या प्रार्थनास्थळाचा समावेश होतो.

 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षेची आवड निर्माण व्हावी याकरिता पठाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्कॉलरशिप योजना राबवता आली याचा आनंद काही औरच होता.पठाण साहेब आपल्यात नाहीत या गोष्टीवर कुणाचाही विश्वास बसत नाही आणि प्रत्येकाला ते आपल्या अवतीभोवतीच आहेत असा सातत्याने भास होतो आहे. मात्र तरी देखील ते आपल्यातून निघून गेलेले आहेत हे वास्तव आहे.तरीही ते विचार रूपात आपल्या सोबत कायम आहेत असे समजून त्यांनी दिलेला विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे मित्र म्हणून आमचे कर्तव्य असेल आणि हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्याबद्दल खूप काही देण्यासारखे आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते कि -

 *बिछडा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गयी*

*एक शख्स सारे शहर को विरान कर गया*


*शकील बागवान*

केंद्रप्रमुख,खडकी केंद्र,

तालुका - अकोले

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुरात ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या ऊसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला असुन मयताचे नाव चंदु वायदंडे आहे बेलापुरातील आयोध्या काँलनीच्या पाठीमागे असणाऱ्या ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या गट नंबर ४६ मधील ऊसाच्या शेतातुन दुर्गंधी येत असल्याचे ओहोळ लक्षात आले .सडलेला उग्र वास कशाचा येतो म्हणून सेवानिवृत्त मंडलाधिकारी जनार्धन ओहोळ हे पहाण्यासाठी गेले असता तेथे सडलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे यांना कळवीले हापसे आपले सहकारी भारत तमनर तसेच पोलीस पाटील अशोक प्रधान यांना घेवुन घटनास्थळी पोहोचले  ही वार्ता बेलापुरात पसरताच घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी रवाना केले पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हे करत आहेत या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा सुरु असुन चंदु वायदंडे हा आचारी काम करत होता ,त्यामुळे त्याने आत्महत्या केली की या मागे काही वेगळे कारण आहे ? अशी चर्चा सुरु आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन श्रीरामपुर बेलापुर  रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले तरी ठेकेदाराच्या चुकीमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत तसेच रस्त्याची स्ट्रीट लाईट बंद पडली असल्याने या बाबत चिंता व्यक्त होत आहे.              विकास काय असतो हे आमदार लाहु कानडे यांच्या रुपाने श्रीरामपुर तालुक्याला समजले आमदार कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन  श्रीरामपुर बेलापुर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले रस्त्यावर लाईट देखील लावण्यात आले परंतु सध्या रसवंती ते गायकवाड वस्तीपर्यतचे लाईट तर कायमच बंद असतात.विजेच्या पोलवर बसविलेल्या निम्म्यापेक्षा जास्त लाईट माळा  बंद अवस्थेत आहेत तसेच रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे त्यावर रिफ्लेक्टर बसविणे गरजेचे होते रिफ्लेक्टर न बसविल्यामुळे रात्रीच्या वेळेस लवकर गती रोधक लक्षात येत नाही त्यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे.स्ट्रीट लाईट चे काम निकृष्ट झाले असून स्ट्रीट लाईट बंद आहेत.ज्या ज्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे. तेथे तात्काळ रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत श्रीरामपुर ते मोसंबी बागेपर्यत रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे परंतु मोसंबी बाग ते बेलापुर पर्यंतचे डांबरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे ते काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे तसेच नादुरुस्त विज जोड दुरुस्त करुन रस्त्यावरील सर्व बंद लाईट पूर्ववत सुरु करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )- संपुर्ण विश्वाला त्याग संयम शिल सदाचार सत्य अहींसा प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर वर्धमान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली .          या वेळी भगवान वर्धमान महावीर यांच्या प्रतिमेची  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती पत्रकार देविदास देसाई उपसरपंच मुस्ताक शेख एकनाथ उर्फ लहानु नागले आदिंनी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला बेलापुर ग्रामपंचायत कार्यलयातही भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर तेथे भगवान महावीरांच्या जिवनावर नाटीका सादर करण्यात आली या वेळी धार्मिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रश्मी लुंक्कड ,द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंता बाठीया ,व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सौ कविता सुनिल मुथा यांना सन्मानित करण्यात आले सायंकाळी प्रश्न मंजुषा व भक्ती संध्या कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी किराणा मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, सुवालाल लुंक्कड, संजय बाठीया ,विजय कटारीया,सचिन कोठारी, संदीप देसर्डा, सचिन कोठारी ,अमीत लुंक्कड ,आनंद लुंक्कड ,पारस लुंक्कड ,अजय डाकले, शितल गंगवाल विकी मुथा, रत्नेष बोरा ,योगेश कोठारी ,स्वप्नेश बोरा, शांतीलाल संचेती ,कांतीलाल मुथा तसेच सौ अर्चना कोठारी ,संगीता मुथा मंगलताई चेंगेडीया पदमा ताथेड ज्योती लुंक्कड ,चंद्रकला लुंक्कड ,मंगल लुंक्कड ,कविता मुथा ,पुजा गांधी ,सरला देसर्डा ,हर्षीता कोठारी, मोनाली लुंक्कड ,सोनाली लुंक्कड ,दिपाली कोठारी ,निलम देसर्डा ,राखी संचेती ,निकीता लुंक्कड ,सुवर्णा लुंक्कड ,राखी लुंक्कड आदिसह महीला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget