बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड
बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रणित शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली.यानिमित्ताने गावकरी मंडळाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले. बेलापूरच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली निवडणुक झाली. या बैठकीस माजी सरपंच महेन्द्र साळवी, माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,तबसुम बागवान,चंद्रकांत नवले,मिना साळवी,प्रियंका कुऱ्हे,सुशीलाबाई पवार, वैभव कुऱ्हे,उज्वला कुताळ,रविंद्र खटोड,भरत साळुंके,रमेश अमोलिक,ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख तसेच रविंद्र खटोड,सुधीर नवले,भरत साळुंके ,अरुण पा.नाईक यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीचे रमेश आमोलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.निवडणूक होणार अशी चर्चा असताना रमेश आमोलिक यांनी संख्याबळ जमत नसल्याचे लक्षात आल्याने ऐनवेळी माघार घेतली .त्यामुळे मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गावकरी मंडळाची विजयी व आभार सभा संपन्न झाली.यावेळी शरद नवले, अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे,स्वाती अमोलिक, मोहसीन सय्यद, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, गोपी दाणी,रफिक शेख,आदिंची भाषणे झाली.यावेळी जालिंदर कुऱ्हे, सुधाकर खंडागळे,एकनाथ नागले,पुरुषोत्तम भराटे,हाजी इस्माईल शेख,प्रभाकर बाळासाहेब दाणी,अन्नू सय्यद,रमेश काळे, ज्ञानेश्वर वाबळे,भाऊसाहेब तेलोरे,रावसाहेब अमोलिक,विशाल आंबेकर,बाबुराव पवार, रविंद्र कुताळ,श्रीहरी बारहाते,महेश कुऱ्हे, भैय्या शेख, रियाज सय्यद,दिलीप अमोलिक,विनायक जगताप, सचिन वाघ,गफूर शेख,सुधीर तेलोरे, बाळासाहेब शेलार, बाबुलाल पठाण, जीना शेख यांचे सह गावकरी मंडळाचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.