Latest Post

श्रीरामपुर (गौरव डेंगळे):श्रीरामपूर नगरपरिषद व संस्कार स्पोर्ट्स क्लब श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पींच्याक सिल्याट स्पर्धा दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तालुका व परिसरातील ४० हून आदीक शाळेंच्या व क्लबच्या जवळजवळ  २०० च्या वर खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.संस्कार स्पोर्ट्स क्लब श्रीरामपूर हे या स्पर्धेमध्ये  चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन क्रमांकाची ट्रॉफी चे मानकरी  ठरले. तसेच पहिल्या क्रमांकाचे ट्रॉफी चे मानकरी सुजाता इंटरनॅशनल स्कूल सोनई, दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी चे मानकरी अशोक इंग्लिश मीडियम स्कूल श्रीरामपूर, तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी चे मानकरी संघर्ष स्पोर्ट्स क्लब ठरले. या स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुका व परिसरातील पालक व क्रीडाप्रेमींनी आपली  उपस्थिती दर्शवली. 

         पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून १) स्टॅंडिंग २) तुंगल ( सिंगल काता) ३) रेगु ( ग्रुप काता ) ४) गंडा ( डेमो फाईट ) ५) सोलो ( क्रिएटिव्हिटी ) या पाच प्रकारात खेळला जातो.हा खेळ भारतीय क्रीडा मंत्रालय, 5% नोकरी आरक्षण , युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड , ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया , एशियन गेम , एशियन मार्शल आर्ट गेम , एशियन युथ गेम व एशियन बीच गेम , राष्ट्रकुल स्पर्धा अशा ऑफिसियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  खेळला जातो . या स्पर्धेचे मुख्य अतिथी व आयोजक नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे  यांनी खेळाडूंना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन खेळातून खेळाडूंचे नक्कीच उज्वल भविष्य निर्माण होऊ शकते , व खेळाडूंचे मानसिक व शारीरिक आरोग्य राखण्यास मदत मिळू शकते असे मोलाचे मार्गदर्शन केले. स्प

र्धा संपन्न करण्यासाठी संस्कार स्पोर्ट्स क्लबचे मुख्य प्रशिक्षक तसेच अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीण कुदळे, राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक नरेंद्र कुदळे, राष्ट्रीय खेळाडू  राधिका खरात, कल्याणी भोसले, नारायण झांबरे, प्रशिक्षक श्री चेतन खावडिया संस्कार स्पोर्ट्स क्लबचे सर्वच खेळाडू,  नगरपालिकेच्या ग्रंथपाल कुमारी स्वाती पुरे , स्वप्नील चव्हाण, इत्यादींनी यांनी परिश्रम घेतले. 

सर्व यशस्वी खेळाडूंना राजकीय सामाजिक क्रीडा व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव( गौरव डेंगळे) : कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे दि २ ते ४ जानेवारी रोजी ५१ वे कोपरगाव तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन संपन्न झाले. श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थीनी कुमारी मृणाल नीरज डंबिर हिने इयत्ता ९ ते १२ या गटांमध्ये गणित प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहे.मृणालला विज्ञान चे शिक्षक नारायण गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मृणालचे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नैथिलिन फर्नांडिस, रणजीत खळेअर्चना गायकवाड, रूपाली भोरकडे,स्वरूपा वडांगळे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

बेलापूर (वार्ताहर) येथील श्री. साई पावन प्रतिष्ठान निर्मित श्री. साईबाबा मंदिरांच्या प्रांगणात आकर्षक अशा गाय- वासरु पुतळ्याची पंडीत महेश व्यास,आ. लहू कानडे व अशोक कानडे बंधूंच्या हस्ते विधिवत पूजन करुन स्थापना तसेच मध्यान्ह महाआरती करण्यात आली.


सुमारे सव्वा लाख रुपये खर्चाच्या या गोमाता स्थापनेच्या उपक्रमासाठी सर्वश्री सोमनाथ पलोड , प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र लखोटिया आणि विश्वस्त दिपक सिकची यांनी प्रत्येकी एक्केचाळीस हजारांची देणगी दिली.


या कार्यक्रमास सर्वश्री आ. लहू कानडे, अशोक कानडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक, उद्योजक सुवालाल लूंकड, सचिन गुजर, शरद नवले,विराज भोसले, विलास थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक भोसले, राजेंद्र ओहोळ, भरत साळुंके, प्रमोद कर्डीले, आनंदराम उपाध्ये, प्रा .माधव पगारे,नारायण शेडगे, सुभाष पा.नाईक,झांजरी,श्रीमती सरस्वती चायल, विश्वस्त सौ. सुरेखा चायल, सुजाता मालपाठक, सौ. पलोड,  सौ.संगीता लखोटिया, आरती बिहाणी, संजना चायल, आरती सिकची,आरती झंवर,आदी उपस्थित होते. यावेळी अशोक कानडे यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी सन्मानित केले.


प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन शेवटी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समितीच्या सर्वश्री कैलास चायल, राजेंद्र लखोटीया, संजय लड्डा, रामबिलास झवर, दत्तात्रय दाभाडे, प्रशांत बिहाणी, प्रमोद कर्डीले, दिपक सिकची, रमेश पवार, शशिकांत कापसे, गोपाल चायल, आदींनी परिश्रम घेतले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-अवकाळी पावसामुळे  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या  शेत पिकांच्या  नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन वंचित राहिलेल्या सर्व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने श्रीरामपूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की  राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा असे आदेश असताना देखील श्रीरामपूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आपले महसुलचे सर्कल अधिकारी, तलाठी हे व्यवस्थित रित्या पंचनामा करुन आपल्याकडे व शासनाकडे शेतकर्‍यांचे नाव,गाव, पत्ता बँकेचे अकौंट नंबर, पासबुक झेरॉक्स व्यवस्थित न दिल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तसेच अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतजमीनीचे सर्कल व तलाठ्याने पंचनामे न करता शेतकर्‍यांकडूनच फोटो व माहिती मागून घेऊन अर्धवट माहिती  आपल्या महसुल अधिकार्‍यांनी शासनाकडे पाठविली. आपल्या महसुल अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्‍यांनी आमच्याकडे  तक्रार केले आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन सर्व शेतकर्‍यांशी संवाद साधून खरच महसुल अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधवर जाऊन पंचनामा केला की नाही याची खातरजमा करुन दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कर्तव्यात कसुरु केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जेणे करुन यापुढे कामात कामचुकारपना होणार नाही व आपला अन्नदाता शेतकर्‍यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी काळजी यापुढे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घ्यावी असेही मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे   . आमच्या निवेदनाची दखल घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना त्वरीत अनुदान (मदत) देण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला आहे , याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष,विलास पाटणी,मनसे उपजिल्हाध्यक्ष,

  गणेश दिवसे मनसे तालुकाध्यक्ष,

सतिश कुदळे मनसे शहराध्यक्ष, संतोष धुमाळ प्रसिद्धीप्रमुख डॉक्टर संजय नवथर, भास्कर सरोदे,नितीन जाधव, ऋषभ बर्वे प्रसाद परे, अमोल साबणे, संदीप विशमबर सुरेश शिंदे, दीपक सोनवणे,राजू जगताप, सुरेश शिंदे, विकी परदेसी, नितीन खरे, मारुती शिंदे, आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-माजी जि.प.सदस्या श्रीमती कमलाबाई भागवतराव खंडागळे(वय ९७)यांचे रविवारी वृध्दपकाळाने निधन झाले.                                                                              श्रीमती खंडागळे यांना सामाजिक धार्मिक  तसेच राजकीय कार्याची आवड होती.सन १९९२ ते १९९७ या कालावधीत त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या.                             बेलापूरात त्यांनी महिलांचे भजनी मंडळ,महिला मंडळ स्थापन केले होते.श्रीमती कमलाबाई खंडागळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष  अॕड.बाळासाहेब खंडागळे,एम.पी.सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे,बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांच्या मातोश्री तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या त्या आजी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,जावई,सुना,नातवंडे,नातसुना असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी बेलापुर येथील अमरधाम येथे झाला यावेळी विविध क्षेञातील मान्यवर  उपस्थित होते.

खंडाळा (गौरव डेंगळे):अयोध्या धाम येथून श्रीराम मंदिराच्या अक्षदा अनगोळमध्ये कलशातून आल्या आहेत. खंडाळा येथील मारुती मंदिर येथे पूजा,अर्चा व प्रभू रामचंद्राच्या आरती करून रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला.श्रीराम अनिश डेंगळे,लक्ष्मण शौर्य नगरकर, सितामाता श्रावणी नगरकर तर हनुमान साईराज नगरकर यांनी भूमिका साकारल्या. त्यानंतर सवाद्य अनगोळ मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणपती रोड, म्हसोबा मंदिर, भगवती माता मंदीर, ढोकचौळे गल्ली, मारुती मंदिर येथे या मिरवणुकीची सांगता झाली. मारुती मंदिरामध्ये अक्षदा कलश ठेवण्यात आला. मारुती मंदिरमधून उपकलश तयार करून अक्षता गावातली प्रत्येक घरी पाठविण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या घरी अक्षता पोहोचवून अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिले जाणार आहे. २२ जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या तारखेला दाखल व्हावे. प्रत्येक गावोगावी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करावी. आज खंडाळा गावात प्रभू रामचंद्रमय वातावरण तयार झालेलं सर्वांना बघायला मिळाले. या भव्य दिव्य अशा अक्षदा कलश यात्रेसाठी हजारोचे संख्येने माता-बहिणी व पुरुष वर्ग उपस्थित होता.

कोपरगाव प्रतिनिधी): आज दि.  30/12/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना  गुप्त बातमी धारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे  . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय  येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत तसेच 1) मनोज चंद्रकांत गिरमे वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव 2) अल्ताफ बाबू शेख - वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.  

*सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रदीप देशमुख, psi भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे, इरफान शेख, अशोक शिंदे, श्याम जाधव, गणेश काकडे , तावरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे  यांनी केली आहे.*

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget