माजी जि.प.सदस्य श्रीमती कमलाबाई खंडागळे यांचे निधन
बेलापूरः(प्रतिनिधी )-माजी जि.प.सदस्या श्रीमती कमलाबाई भागवतराव खंडागळे(वय ९७)यांचे रविवारी वृध्दपकाळाने निधन झाले. श्रीमती खंडागळे यांना सामाजिक धार्मिक तसेच राजकीय कार्याची आवड होती.सन १९९२ ते १९९७ या कालावधीत त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. बेलापूरात त्यांनी महिलांचे भजनी मंडळ,महिला मंडळ स्थापन केले होते.श्रीमती कमलाबाई खंडागळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अॕड.बाळासाहेब खंडागळे,एम.पी.सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे,बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांच्या मातोश्री तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या त्या आजी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,जावई,सुना,नातवंडे,नातसुना असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी बेलापुर येथील अमरधाम येथे झाला यावेळी विविध क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.