Latest Post



श्रीरामपुर (प्रतिनिधी): दिनांक १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सेंट तेरेझा गर्ल्स हायस्कूल हरेगाव,श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची महाराष्ट्र राज्य योगासन संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मागील १० ते १२ वर्षा पासून श्रीरामपुर क्रीडा क्षेत्रात बलराज यांची भरीव कामगिरी आहे तसेच विविध खेळाचा त्यांना दाडगा अनुभव असुन या अनुभवाचा महाराष्ट्राच्या संघाला निश्चित फायदा होईल व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ पदक प्राप्त करेल अशी खात्री आहे.निवड झाल्याबद्दल बलराज यांचे क्रीडा व युवा संचालनालय,महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री अनिल चोरमुले,उपसंचालक श्री उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री दिलीप दिघे,पार्थ दोशी,मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,राजेंद्र कोहकडे,

गौरव डेंगळे,प्रशांत होन आदीनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव ( गौरव डेंगळे):क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर आयोजित शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा हर्षल लंगोटे जिल्हास्तरीय ताइक्वांडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर वाडिया पार्क येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्याभरातून १०० पेक्षा अधिक शालेय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.हर्षलला कराटे प्रशिक्षिका वर्षा देठे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल हर्षलचे शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केलं व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


कोपरगाव (गौरव डेंगळे) : भारतरत्न पद्मविभूषण,राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावचे चित्रकार मंगेश गायकवाड यांनी अवघ्या ५ तासांमध्ये शाळेच्या भिंतीवर स्प्रे पेटिंगच्या साह्याने पूर्ण केले.हे खटलेलं चित्र बघण्यासाठी कोपरगावातून शालेय विद्यार्थी शारदा शाळेमध्ये गर्दी करीत असून क्रिकेटच्या देवाचा भिंतीवरच्या फोटो बरोबर सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या पालकांना घेऊन शाळेत येत आहे.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): हार यशाची पहिली पायरी असून पराभूत खेळाडूंनी,विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्यांनी सिंहकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. सिंहाला देखील शिकार करत असताना दररोज ७ ते ८ वेळा अपयशाला सामोरे जावे लागते. तरी कोणती गोष्ट सिंहाला राजा बनवते.त्याची हार न मानण्याची क्षमता सिंहाला राजा बनवते.तर सर्व पराभूत खेळाडूंनी हार न मानण्याची क्षमता आत्मसात केली पाहिजे व जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाले पाहिजे असे प्रतिपादन श्री राजेंद्र लांडे पाटील यांनी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान बोलताना केले.

आज श्रीरामपूर सुपर सिक्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल संघाने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा रंगतदार सामन्यांमध्ये ५ धावांनी पराभव करून सहाव्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.अंतिम सामन्याची नाणेफेक श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यू इंग्लिश स्कूल संघाने निर्धारित ६ षटकांमध्ये ५ बाद ४९ धावा केल्या. यामध्ये यश पवार १५ धावा तर राजवीर पवार याने १८ धावांचे योगदान दिले. बेलापूर संघाकडून शार्दुल पुजारीने २ गडी बाद केले.६ षटकात ५० धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेल्या बेलापूर संघाची सुरुवात धडाकेबाज झाली व पहिल्या २ षटकांमध्ये १ गडी बाद २० धावा फटकावल्या. पवारने तिसऱ्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत २ गडी बाद केले.शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडू मध्ये ९ धावांची आवश्यकता असताना प्रेम शिंदेने अप्रतिम गोलंदाजी करत बेलापूरच्या संघाला तीनच धावा दिल्या व श्रीरामपूर संघाने अंतीम सामना ५ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यानंतर लगेचच स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रॅज्युएट चहा व लस्सीचे संचालक श्री राजेंद्र लांडे पाटील,अभिजीत कुलकर्णी,निरज त्रिपाठी, ऋषिकेश लांडे,दिगंबर पिनाटे, सतीश आजगे,दौलतराव पवार, अमोल शिरोळे,अतुल जाधव, प्रशांत पवार, स्पर्धा आयोजक श्री गौरव डेंगळे व नितीन गायधने आदीच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विजेत्या संघाला रुपये ३५००/- व चषक तर उपविजेत्या संघाला रुपये १५००/- व चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्रेम शिंदे तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून यश पवार तर मालिकावीर म्हणून सादुल पुजारी यांची निवड करण्यात आली.

नागपुर (विशेष प्रतिनिधी  )-शासनाच्या वतीने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अश्वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले                      आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे

प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे कार्याध्यक्ष संजय पाटील सचिव बाबुराव ममाणे संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यासाठी विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .महागाईच्या निर्देशांकानुसार राज्यातील धान्य दुकानदारांना मार्जिन मध्ये वाढ करावी धान्य वाटपासाठी 5 जी पाँज मशिन देण्यात याव्यात वेळोवेळी सर्व्हरला येणारे अडथळे दुर व्हावेत .दुकानदारांनी विक्री केलेल्या धान्याचे मार्जिन दर महा वेळेवर मिळावे ,सर्व योजनेचे धान्य उपलब्ध करुन द्यावे ,केरोसीन परवाना धारकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यासाठी फेडरेशनच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या मोर्चात राज्यभरातील जवळपास १५ हजार दुकानदारांनी सहभाग नोंदवीला .चाचा नेहरु बालोद्यान आग्याराम देवी चौक येथुन मोर्चास सुरुवात झाली वेगवेगळ्या घोषणा देत हे मोर्चेकरी विधान भवनावर धडकले त्या ठिकाणी राज्यातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले फेडरेशनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे कार्याध्यक्ष संजय पाटील सचिव बाबुराव ममाणे अशोक ऐडके सुभाषमुसळे बाबा राठोड आदिंच्या शिष्टमंडळाने राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवुन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले .या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई व सचिव रज्जाक पठाणयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष संजय पाटील नागपुरचे शहराध्यक्ष सुभाष मुसळे रितेश अग्रवाल संजय देशमुख प्रफुल्ल भुरा राजेश कांबळे मिलींद सोनवणे दौलत कुंगवाणी आदिंनी विशेष परिश्रम घेतले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- समता स्पोर्ट्स क्लब, बेलापूर बु|| च्या अध्यक्षपदी संजय शेलार तर उपाध्यक्ष पदी  (बंटी ) प्रदीप शेलार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे                            नाताळ व नववर्ष (हिवाळी महोत्सव २०२३) कार्यक्रम आयोजना बाबत समता स्पोर्ट्स क्लबची  बैठक खेळी- मेळीच्या वातावरणात संपन्न झाली  

यावेळी डिसेंबर 2023-24 या कालावधीसाठी समता स्पोर्ट्स क्लबच्या नुतन कार्यकारणीची निवड उत्तम शेलार सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यानुसार अध्यक्ष संजय शेलार, उपाध्यकपदी  उपाध्यक्षपदी प्रदीप (बंटी) शेलार, खजिनदार निलेश शेलार, संपर्क प्रमुख निष्कांत शेलार, सचिव श्याम शेलार, सह.सचिव विपुल शेलार, प्रसिद्ध प्रमुख सुयश शेलार, कार्याध्यक्ष अजय शेलार, सरचिटणीस बाळू शेलार यांची सर्वानुमते निवड झाली.

यावेळी विजय शेलार, रोहित शेलार, संतोष शेलार, गंगा शेलार, रोहन शेलार, संकेत शेलार, प्रणव शेलार,प्रतीक शेलार, राहुल शेलार, अक्षय शेलार, प्रसाद शेलार, तुषार शेलार, चेतन जोगदंड, ललित शेलार, प्रविन अभंग, रामा उमाप, सोहेल बागवान, आदित्य शेलार, अतीश शेलार, सुमित शेलार, अथर्व शेलार, सार्थक शेलार, गणपत शेलार, सूरज शेलार, संदेश शेलार, निशांत शेलार, सुनील शेलार, आनंद शेलार, प्रथमेश शेलार, आकाश शेलार, यश शेलार आदिं उपस्थित होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी): मी शाळेत असताना मी माझ्या आईला म्हणायचो की माझा होमवर्क झालाय.आता जाऊ का खेळायला? आणि आता? ते टॅब ठेव आता बाजूला आणि ट्युशनला जा', असे संवाद ऐकू येतात.आता अशी मुले सुदृढ कशी बनतील.प्रत्येकच गोष्टीसाठी 'मॅजिक' औषध नसते.मूल अभ्यासात चांगले असेल,तर पालकांनी त्याच्या आवडीनिवडी शोधून काढल्या पाहिजेत.मूल खेळामध्ये चांगले असेल,तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.व जास्त जास्त मुला-मुलीनी मैदानी खेळ खेळली पाहिजे असे प्रतिपादन श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री स्वामीराज कुलथे यांनी केले. 

येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे १४ संघांच्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्री स्वामीराज कुलथे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी स्पर्धेचे आयोजक गौरव डेंगळे,नितीन गायधने,दत्ता घोरपडे,प्रसाद लबडे,अमोल शिरोळे,हरप्रित सेठी,अमंदीप गुरुवडा आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल, बेलापूर,विद्यानिकेतन अकॅडमी, श्रीरामपूर,न्यू इंग्लिश स्कूल,श्रीरामपूर,केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, श्रीरामपूर,अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल,प्रगतीनगर,जे टी येस बेलापूर आदी शाळेतील १४ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक १२ डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget