Latest Post

विद्यालयात चमकणार अखंडित सौर ऊर्जा श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय तथा जनता हायस्कूल श्रीरामपूर या ठिकाणी विद्यालयाच्या स्थापनेपासून ते 2015 सालापर्यंत म्हणजेच 70 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा  सकाळी दहा ते पाच या वेळेत अतिशय मंगलमय व भावनिक वातावरणात जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माजी विद्यार्थी हरीश जाधव अतिरिक्त कमिशनर मुंबई महानगरपालिका हे होते तर कार्यक्रमाच्या उद्घाटक मीनाताई जगधने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेंद्र वाघ उद्योजक, सुरेश जाधव अभियंता मुंबई, सुनील हिवाळे शास्त्रज्ञ भारत सरकार, किसन कानडे अभियंता, केशव बुळे सरपंच सातेवाडी, माजी मुख्याध्यापक रघुवीर बैरागी, त्रिदल संघटनेचे अध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किशोर गदिया,योगेश वाघचौरे उपाध्यक्ष, पोपटराव शेळके सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यासाठी आजी-माजी शिक्षक व मुख्याध्यापक, माजी विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी व विद्यार्थी असे सुमारे 1100 लोक उपस्थित होते.

शालेय परिपाठानंतर मान्यवरांचे स्वागत सुरेल अशा स्वागत गीताने करण्यात आले. अध्यक्षीय भाषणामध्ये हरीश जाधव म्हणाले की मी आज भारत देशातील क्रमांक एक च्या महानगरपालिकेमध्ये उच्च पदावर काम करण्याची संधी मला केवळ याच विद्यायामुळे मिळाली. याच विद्यालयाने मला मोठे ध्येय गाठण्यासाठी बळ दिले.

याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र वाघ यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा विकासकामांसाठी दोन लाख रुपये रोख मदत केली व विद्यालयास वीज समस्या कायमस्वरूपी दूर करून सौर ऊर्जा प्रकल्प विद्यालयासाठी मंजूर केला.

कार्यक्रमाचे उद्घाटक मीनाताई जगधने याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे ऋणानुबंधांचे गुरु शिष्य चे नाते हे अतूट असते. कितीही  वर्षानंतर विद्यार्थी शिक्षकाला भेटला तरी तोच आदर विद्यार्थी शिक्षकाला देतो व आपल्या शिक्षकाच्या प्रती ऋणनिर्देश व्यक्त करतो. तसेच शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील दुसरी आईच असते. शालेय प्रांगणात आल्यानंतर विद्यार्थ्याला आपल्या आईच्या सहवासात आल्याचा आनंद मिळत असतो.

यानंतर नाट्य कलाकार अजय घोगरे , आदित्य नगरकर कासिम सय्यद यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गुरु शिष्य वरील नाटिका शाळा व विद्यार्थी यांच्यामधील भावनिक नाते नाटकेद्वारे सर्वांसमोर सादर केले.

मधल्या सुट्टीनंतर वर्ग अध्ययन व अध्यापनाचा आनंद माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मनसोक्त लुटला याबरोबरच विद्यार्थी परिचय करून देण्यात आला

 माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होण्याच्या उद्देशाने माजी विद्यार्थी हरीश जाधव, सुरेश जाधव, सुशीलाताई नवले, दिगंबर गिरी, अक्षय भराड, सुभाष बोर्डे, किसन कानडे, संदीप बागुल, पोपटराव शेळके, शशिकांत येलम, योगेश जगदाळे, संग्राम कापरे, राजेंद्र वाघ, केशव बुळे, शकील शेख, चंद्रकांत गावंडे, पोपटराव शेळके, अंशुमन वाकचौरे, राजेंद्र अडसूळ, प्रदीप सुपारे, सुनील हिवाळे, त्रिवेदी विश्रमसागर, बजरंग वाकळे, अमर चाऊस यांनी सढळ हाताने मदत केली.

या स्नेह मिळाव्यासाठी जेवणाची सर्व अतिशय चांगली सोय संयोजकांनी केली होती. दिवसभर दोन वेळा नाष्टा, चार वेळा चहा, स्वादिष्ट व रुचकर भोजन याची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच सर्वांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना, शालेय जीवनातील आठवणी यांना उजाळा मिळाला.

कार्यक्रमादरम्यान ज्या शिक्षकांनी व माजी विद्यार्थिनी जगाचा निरोप घेतला अशा सर्वांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली उपस्थित शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला मिळाल्याबद्दल उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन संयोजन समितीचे कार्यध्यक्ष एडवोकेट जमीन बागवान यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी मानले.

हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गधिया कार्याध्यक्ष जमीन बागवान सचिव पोपटराव शेळके उपाध्यक्ष योगेश वाकचौरे, सल्लागार गणेश थोरात, मार्गदर्शक मेजर कृष्ण सरदार, सुनील बोलके, भाऊसाहेब मुळे,  संजय छल्लारे, प्रकाश कुलथे, बाबासाहेब मोरगे, निलेश भालेराव, राजेंद्र करंनकाय अल्पेश झुरंगे अविनाश पठारे शेखर सौदागर सोमनाथ वाडेकर, कासिम सय्यद, अजय घोगरे आदित्य नगरकर बाबासाहेब खोसरे, बाळासाहेब हारदास, आसिफ सय्यद गणेश थोरात,समीन बागवान, मच्छिंद्र मच्छिंद्र पवार, अस्लम सय्यद तसेच डी डी काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे व सर्व स्टाफ, श्रीरामपूर नगर परिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग आदींनी विशेष परिश्रम घेतले


बेलापुर (प्रतिनिधी  )-आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेले जवान व पोलीस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त बेलापुर-ऐनतपूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील विजय स्तंभ चौक येथे एक पणती जवानांसाठी-दीपोत्सव २०२३ हा उपक्रम राबविण्यात आला.            फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त  ग्रामस्थ यांच्या वतीने सन २०१४ पासून दिपावली पाडव्याच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो. हे या उपक्रमाचे १० वे वर्ष होते.सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर दिनेश वाघ, मेजर निलेश अमोलिक, मेजर मुकुंद कुटे, माजी सैनिक देविदास देसाई, शरद देशपांडे,सुजित शेलार तसेच बेलापूर पोलीस औट पोस्ट चे रामेश्वर ढोकणे, बडे,हरीश पानसंबळ आदीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपक्रमासास सुरुवात करण्यात आली. या नंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या.भारत भारत माता की जय,वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी शहीद जवान व पोलीस बांधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप चे अभिषेक खंडागळे,अँड. मयुर साळुंके, विष्णुकांत लखोटीया, जयेंद्र खटोड, राजेश सूर्यवंशी,सुभाष शेलार,ऋतुराज नाईक,विजय कोठारी,वेणूगोपाल सोमाणी,निशिकांत लखोटिया,प्रभात कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ,सुमित सोमाणी,राम कुऱ्हे,सुभाष शेलार,महंत काळे,महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, सोमनाथ साळुंके, राहुल माळवदे आदींनी परिश्रम घेतले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्था ही श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी  संस्था असुन संचालक मंडळाने पारदर्शी व काटकसरीने कारभार केल्यामुळे या ही वर्षी सभासदांना १५ % लांभाश व दहा किलो साखर तसेच मिठाई भेट देणे शक्य झाले असल्याची माहीती श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी दिली .         दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी बेलापुर  विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने  ९०० सभासदांना १५% लाभांश तसेच दिवाळी भेट म्हणून १० किलो साखर व मिठाई भेट  देण्याचा कार्यक्रम नुकताच संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला त्या वेळी नवले यांनी वरील माहीती दिली . या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन शेषराव पवार म्हणाले की तालुक्यात चांगला ,स्वच्छ कारभार असणारी ही संस्था असुन विरोधकांनी सत्तेचा दुरुपयोग करुन संचालक मंडळावर अनेक आरोप केले परंतु संचालक मंडळावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने करण्यात आलेले होते संस्थेचा कारभार चोख असल्यामुळे सभासदांना लाभांश देता आला असेही पवार म्हणाले या वेळी माजी सरपंच भरत साळूंके पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले .या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड ,शिवाजी वाबळे, विलास मेहेत्रे ,राजेंद्र सातभाई,  व्हा चेअरमन विश्वनाथ गवते, पत्रकार अशोक गाडेकर,  प्रकाश कुर्हे ,नंदकिशोर नवले, चंद्रकांत नाईक , ज्ञानदेव वाबळे, त्रिंबक कुर्हे अयाजअली सय्यद भगवान सोनवणे ,संजय रासकर, विजय कुर्हे, अशोक कुर्हे,  किशोर नवले, पंडीतराव बोंबले ,अशोक राशिनकर, सुहास शेलार ,दिलीप दायमा ,प्रसाद खरात,  संजय नवले, अंतोन अमोलीक, आदिसह सभासद उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या बेलापुर गावाला ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी बेलापुर ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी केली आहे                   बेलापुर गावची लोकसंख्या जवळपास तीस हजाराच्या घरात गेली असुन गावाला पाणी पुरवठा करणारी तीनही साठवण तळी रिकामी झालेली आहेत लवकर पिण्याच्या पाण्याचे रोटेशन आले नाही तर ऐन दिवाळीच्या तोंडावर गावाला भिषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे .बेलापुरला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे लक्षात घेवुन गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाली .पाणी टंचाईचा सामना कसा करावा? या विषयावर चर्चा करण्यात आली. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे ,बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, ग्रामपंचायत सदस्य व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, सदस्य भरत साळूंके, रमेश अमोलीक ,मुस्ताक शेख,शफिक बागवान,गोपी दाणी,वैभव कुर्हे  शफीक बागवान, पत्रकार देविदास देसाई, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड आदिंनी सहभाग घेतला या वेळी एका तळ्यात काही प्रमाणात पाणी शिल्लक असुन ते उचलुन मुख्य फौंटनला जोडल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईची समस्या टाळता येईल असा निष्कर्ष चर्चेअंती निघाला .त्या वेळी सदस्य रविंद्र खटोड यांनी आपल्या कडील साडेसात एच पी ची मोटार तसेच जनरेटर देण्याचे मान्य केले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनीही आपल्या कडील दहा एच पी ची मोटार देण्याचे कबुल केले. गावाला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सत्ताधारी विरोधक एकत्र आले व पाणी टंचाईवर उपाय शोधला. या बद्दल पत्रकार देविदास देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.बैठकीत ठरलेल्या उपाय योजने नुसार उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक, मुस्ताक शेख यांनी ग्रामपंचायतीच्या आरोग्य व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यवाहीला सुरुवात केली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा .नाईक यांनी आमदार लहु कानडे यांच्याशी संपर्क करुन रोटेशन सोडण्याकरीता प्रयत्न करावेत अशी विनंती केली.                                   [ या वेळी बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी उपसरपंचाची खुर्ची रिकामी असल्याचे सांगितले त्यावर उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की येथील खुर्ची रिकामी आहे तसेच बाजार समीतीच्या उपसभापतीचीही खुर्ची मोकळीच आहे यावर एकच हशा पिकला ]

राहुरी प्रतिनिधी,मिनाष पटेकर-गेल्या तीन दिवसांपासून राहुरी येथील तहसील कार्यालया समोर मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून आज आरपीआय आठवले गट, तालूका वकिल संघटना तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे मित्र मंडळ आदिवासी संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन निवेदन दिले. 

          आरपीआय च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी निजामकालीन पुरावे सापडले आहेत. राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे केवळ आश्वासन देत आहे. त्यामुळे सध्या आरक्षणासाठी तीव्र आंदोलने सुरु आहेत. मराठा आरक्षणचा मुद्दा न्यायालयात सक्षमपणे मांडणे गरजेचे आहे. खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्या केंद्र शासनामध्ये प्रभावीपणे मांडुन आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आरपीआय मराठा समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालूकाध्यक्ष विलास साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपोषणाला पाठिंबा दिला. 

         तसेच राहुरी येथील वकिल संघटनेच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देऊन मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यास विनामुल्य खटला चालवीण्याचे आश्वासन वकिल संघटेच्या वतीने देण्यात आले. तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे मित्र मंडळ व आदिवासी संघटनेच्या वतीने मराठा आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, डाॅ. नारायण माळी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मडगाव,गोवा(गौरव डेंगळे): येथील के एस सी आर क्रिकेट मैदानावर टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने १८ राज्यांचे निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

आज झालेल्या पहिल्या सामन्यात वरद कुंभकर्णच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २२ धावांनी विजय मिळवला.नाणेफेक जिंकून मध्यप्रदेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्र संघाने निर्धारित १५ षटकांमध्ये ५ गडी बाद १०८ धावा फटकावल्या. महाराष्ट्र संघाकडून वरदने नाबाद २५,आरमने १७ धावा तर सर्वेशने १२ धावांचे योगदान दिले.मध्यप्रदेश संघाकडून राहुल व रोहितने १-१ गडी बाद केला.१०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशचा संघ वरद व आराम यांच्या भेदक माऱ्यापुढे टिकाऊ धरू शकला नाही व संघ १२ षटकात ८६ धावांवर गारद झाला.वरद व आराम प्रत्येकी ३-३ गडी बाद केले तर मितांश व या दोन्ही प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

मध्यप्रदेश संघाकडून रोहितने सर्वाधिक १२ धावांची योगदान दिले.२५ धावा व ३ गडी बाद करणारा वरद सामन्याचा सामनामानकरी ठरला. साखळीतील दुसऱ्या सामनात महाराष्ट्राची गाठ पडेल ती बलाढ्य छत्तीसगड संघाबरोबर.

श्रीरामपूर प्रतिनिधी:ये

थील गोंधवणी रोड अत्यंत वर्दळीचा रस्ता असुन शहराच्या इतर रस्त्याच्या तुलनेत हा रस्ता तसा खुपच चिवळ देखील आहे.

या रस्त्यावर नेहमी प्रचंड प्रमाणात वाहतूक त्यात पाटाच्या पुलावर अनेक वाहन धारकांनी अनाधिकृत पार्किंग निर्माण केली असल्याने दररोजच अपघातांच्या घटना हे तसे नित्याचेच,म्हणाव्या लागेल.मात्र आज सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यानं गोंधवणी रोड पाटाच्या पुलाजवळील कलगीधर हॉल शेजारी ,श्री.गुरुवाडा यांच्या घरासमोर एक सिमेंटचा ट्रक पलटी होता होता वाचला,सुदैवाने यात कोणतीच जीवीत हानी नाही

सदरील सिमेंट ट्रक मागे घेत असताना चक्क तो नगर पालिका जनरल गटार चेंबरमध्ये एक चाक गेल्याने ट्रक पलटी होता होता वाचला यात सुदैवाने कोणतीच जीवीत हानी झाली नाही हे एक चांगलच म्हणावे लागेल.

शहरात उघडे गटारीचे चेंबर्स आणी बेशिस्त वाहतूकीवर न राहिलेले शहर पोलिसांचे नियंत्रण अशी स्थिती असल्याने कारण 

याकडे संबंधित पोलिस यंत्रणा आणी नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून नाराजगीचा सुर निघत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget