Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या महाराष्ट्रात एकुण ७३१८६ शाखा असुन समाजातील प्रश्नांचा अभ्यास करुन जनजागृती करणाऱ्या २७ उपसंस्था आहेत त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीत मग किल्लारीचा भुकंप असो ,आसाम पुरग्रस्तांचा प्रश्न असो किंवा अलीकडील कोरोना असो सर्वात आगोदर मदत कार्य पोहोच करणाऱ्यामध्ये संघ प्रथम स्थानी असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा ,डाँ. गोरख बारहाते यांनी व्यक्त केले .                        विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बेलापुर शाखेच्या वतीने पथसंचलन तसेच बेलापुर जे टी एस हायस्कूलच्या प्रांगणात शस्र पुजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाँ.बारहाते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र देशपांडे तसेच उत्तर नगर जिल्हा कार्यवाह लहु शिंदे उपस्थित होते           

प्रा. डाँ. गोरख बारहाते पुढे म्हणाले की आजचा विजयादशमीचा दिवस म्हणजे संघ स्थापनेचा दिवस आज संघ स्थापनेला ९८ वर्ष पुर्ण होत आहे .समाजासाठी सतत काम करणारी एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ. लोक संघाविषयी उलट सुलट चर्चा करतात पण संघाचे कार्य शिस्तबध्द तसेच संघातील प्रत्येक स्वंयसेवक हा शिस्तप्रिय आहे संघ जात भेद मानत नाही संघाच्या परमपवित्र ध्वजाखाली सर्व समान असतात म्हणून तर संघाचे संघटन दिवसेंदिवस मजबुत होत चालले आहे आसेही प्रा, बारहाते म्हणाले  या वेळी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र  देशपांडे म्हणाले की बाल तसेच तरुण मनावर संस्कार करणारा संघ हाच एकमेव परिवार आहे. आरएसएस एक संवाद आहे आज आपल्यातील समाजातील संवाद हरपत चालला आहे .संवादामधील स नाहीसा झाल्यामुळे केवळ वाद निर्माण होत आहे आपली भाषा शुद्ध हवी  आपली भुषा पेहेराव चांगला पाहीजे ,आपले भोजन सात्वीक पाहीजे तसेच भ्रमण केले पाहीजे ते करताना निरीक्षण केले जावे या सर्व बाबी संघात शिकविल्या जात असल्याचेही देशपांडे म्हणाले  प्रारंभी संघाचे घोषासह गावातुन संचलन काढण्यात आले होते .

दिनांक 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 रोजी गोवा येथे 37 वे नॅशनल गेम्स होत आहेत. हि 37 वे नॅशनल गेम्स गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहेत. या गेमचे उद्घाटन समारंभ 26 ऑक्टोबर रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये पिंच्याक सिलॅट हा खेळ प्रथमच समाविष्ट झालेला आहे आणि 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2023 रोजी कॅम्पल ग्राउंड विलेज पणजी येथे पींच्याक सिल्याट खेळाची स्पर्धा संपन्न होणार आहे. या खेळामध्ये एकूण 28 राज्यातील ३०४ खेळाडूंची निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 20 खेळाडूंची निवड झालेली असून ते एकूण २३ पदकांसाठी खेळणार आहेत. 

खालील खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व ३७ व्या नॅशनल गेम्स २०२३ मध्ये करत आहेत.
 
धनंजय सांडूगडे (टॅडींग इव्हेंट-४५ किलो), रामचंद्र बदक(टॅडींग इव्हेंट ४५ ते ५० किलो), कार्तिक पालवे(टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ आणि गंडा इव्हेंट),सोमनाथ सोनवणे(टॅडींग इव्हेंट ५५ ते ६० किलो),वैभव काळे(टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, रेगू इव्हेंट आणि सोलो इव्हेंट ), मुकेश चौधरी(टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), ओंकार अभंग(टॅडींग इव्हेंट ७० ते ७५ किलो आणि रेगु इव्हेंट), अंशुल कांबळे(टॅडींग इव्हेंट ८० ते ८५ किलो आणि रेगु इव्हेंट), अनुज सरनाईक(टॅडींग इव्हेंट ८५ ते ९० किलो), पियुष शुक्ला( टॅडींग इव्हेंट ९० ते ९५), धनंजय जगताप( टॅडींग इव्हेंट ९५ ते ११० किलो), कृष्णा पांचाळ (तुंगल इव्हेंट), सचिन गर्जे(गंडा इव्हेंट), जयश्री शेट्टी(टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ किलो आणि रेगू इव्हेंट), किर्णाक्षी येवले (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, तूंगल इव्हेंट आणि रेगु इव्हेंट), पौर्णिमा तेली( टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), दीक्षा शिंदे  (टॅडींग इव्हेंट ७५ ते ८० किलो), भक्ती किल्लेदार (८५ ते १०० किलो),रिया चव्हाण (रेगु इव्हेंट), पूर्वी गांजवे (सोलो इव्हेंट) तसेच महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून श्री. साहेबराव ओहोळ आणि प्रशिक्षक म्हणून कु. सुहास पाटील आणि कुु. अभिषेक आव्हाड यांची निवड करण्यात आली.

या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर हे २ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक श्री. किशोर येवले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान विकास स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पार पडले.
मागील १३ वर्ष महाराष्ट्र संघ हा पिंच्याक सिल्याट खेळामध्ये अव्वल स्थानी आहे आणि आता सुद्धा तीच कामगिरी ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाची कायम राहील अशी माहिती इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन चे अध्यक्ष मा.श्री. किशोर येवले यांनी दिली. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजित दादा पवार साहेब आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव मा. श्री नामदेव शिरगावकर यांनी महाराष्ट्र संघाला 37 व्या नॅशनल गेम्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपुर-राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये नऊ खाजगी कंपन्यांमार्फत कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्य घरातील मुले जे आपल्या गरीब परिस्थितीशी झुंज देत हालाखीच्या परिस्थितीत दिवस-रात्र अभ्यास करून स्वतःच्या कर्तुत्वावर सरकारी नोकरी करून आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होते.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय अत्यंत घातक असून तो वेळीच रोखला नाही तर प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांचे स्वप्न भंग होईल आणि म्हणूनच त्यांचे स्वप्न पुन्हा जिवंत करण्यासाठी रस्त्यावरच उतरून याचा निषेध करावा लागणार.हे ओळखून क्षणाचाही विलंब न करता भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विद्यार्थ्यांनी श्रीरामपूर येथे सरकारी शाळा बंदीच्या व खाजगीकरणाच्या विरोधात "विद्यार्थी पँथर डरकाळी" आंदोलन केले.याचबरोबर भीम आर्मी भारत एकता मिशन व आजाद समाज पार्टीच्या वतीने देखील या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलने झाली.


                     दरम्यान श्रीरामपुरात भीम आर्मीचे विद्यार्थी नेते पॅंथर ऋषी पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व गौरव भालेराव आणि साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वात "विद्यार्थी पँथर डरकाळी"आंदोलन झाले.यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्हा दौरावर आले असता,भीम आर्मीचे नेते अजय मैंदर्गीकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करत काळे झेंडे दाखवून आक्रमक पद्धतीने निषेध नोंदवला. त्याचबरोबर भीम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोक भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजप प्रवक्ते आमदार राम कदम यांच्या कार्यालयावर आक्रमकपणे आंदोलन झाले.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आणि भीम आर्मीच्या आक्रमक व जहाल आंदोलनाची धास्ती घेत सरकारने खाजगीकरण व कंत्राटी भरती चा जीआर अखेर मागे घेतला. यापुढे भविष्यात राज्य सरकारने असे चुकीचे धोरण आखत तरुण, बेरोजगार व विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे चुकीचे निर्णय घेतले तर भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आणि भीम आर्मी भारत एकता मिशन अशाच प्रकारे आक्रमकपणे आंदोलन करत सरकारला धारेवर धरेल.असे वक्तव्य यावेळी भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  विद्यार्थीनायक पँथर ऋषी पोळ यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक श्री गौरव अरविंद डेंगळे यांची ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा राज्य नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्तीचे पत्र गोवा नेटबॉल संघटनेचे सचिव प्रतिष नाईक यांनी दिले.

गोव्या राज्यात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत असून देशातील २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशातून सुमारे १०,००० खेळाडू सहभागी होणार आहेत.खंडाळा या ग्रामीण भागातील क्रीडा शिक्षक श्री गौरव डेंगळे यांना गोवा राज्याच्या नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती ही आपल्या श्रीरामपूर तालुक्याकरीता अभिमानाची बाब आहे.दिनांक १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान डेंगळे हे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा भाग असतील.डेंगळे यांनी खेलो इंडिया युथ गेम्स साठी व्हॉलीबॉल खेळाचे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फतोडा,मडगाव नेहरु स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन संपन्न आहे.गोवा नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डेंगळे यांचे गोवा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष शुभम नार्वेकर,साईनाथ सोपटे,सचिव प्रतिष नाईक,गोवा टेनिसबॉल सचिव निलेश नाईक,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,श्री पार्थ दोशी,श्री राजेंद्र कोहकडे,श्री नितीन बलराज आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

श्रीरामपूर प्रतिनिधी/  शिर्डी शहर व शहराच्या लगत मोठ्या प्रमाणावर हाॅटेल लाॅजिग परमीट रुम बीअर बार आहेत वाढत्या महावितरणच्या विज बीलामुळे अनेक व्यावसायिक बील भरताना मोठी दमछाक होताना दिसते मात्र काहीजण  नको झंझट म्हणून वेळेवर कधी दंडात्मक दंड भरून वीजबील भरत असताना  काहीनी वापरलेला वीज चोरीचा शाॅटकट.  नगर जिल्ह्यात जवाबदार शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या राहता तालुक्यातील युवा नेत्यांच्या भावाच्या  परमीट रुम बीअर बारवर  अशा पध्दतीने. मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणच्या नाशिक येथील पथकाने  हाॅटेल गारवा परमीट रुम बीअर बार या ठिकाणी जाऊन  मयत मालकाच्या हाॅटेल वर मीटर तपासणी केली असता  त्या  विज मीटरच्या आतील पट्टीवर पिसीबीला जाणा-या केशरी रंगाच्या वायरची जागा बदलुन कपर पट्टीवर व इतर ठिकाणी रिशाॅलडीग केलेले आढळतले तसेच  तीन वर्षांपूर्वी देखील वीज चोरीची केस झाली होती त्या नंतर सुध्दा परत तपासणी  केली. त्यात देखील तांत्रिक. छेडछाड. केल्याने त्यामुळेच मीटर पळत नसल्याने बारा महिन्यांत २१८०३युनिट रुपये ४लाख ७५६५०रुपयाची वीजचोरी केली असून बील भरण्यासाठी मुदत दिली असताना बील न भरल्याने ज्या नावावर मीटर आहे त्या मयताचे वारस उल्हास पुंजाजी काळे व काही दिवसांपूर्वी ज्या इसमाला हाॅटेल चालवण्यासाठी दिले तो प्रकाश एन शेट्टी यांच्या विरोधात शिर्डी विभागातील कनिष्ठ अभियंता रोशन संजय बागुल वय २२ रा सावळीविहीर ता राहता यांनी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून विद्युत कायदा कलम १३५ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन अशा प्रकारे राहता तालुक्यातील किती व्यावसायिक विज चोरी करतात यासाठी नाशिक व नगर येथील महावितरणच्या पथकाकडून बारीकसारीक माहिती घेतली जात आहे  किरकोळ दोन चार हजारांच्या बीलासाठी महावितरणचे वायरमन वीजखंडीत करत असताना धनदांडगे व मोठे मंडळी कोणाच्या आशिर्वादाने वीज चोरी करत आहे याकडे काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष वेधले असल्याचे एका श्रीरामपूर येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-  कर्तव्य बजावत असताना आपल्यासारखे समाजसेवक पाठीशी उभे असल्यावर काम करण्याचा उत्साह निश्चितच वाढतो द्विगुणीत होते त्यामुळे चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असा विश्वास लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी व्यक्त केला   गळनिंब तालुका श्रीरामपुर येथील स्पंदन फौंउंडेशन व सिद्धेश्वर चहा समितीच्या वतीने उत्कृष्ट सेवेबद्दल लोणी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक योगेशजी शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापिठ सिनेटचे माजी सदस्य प्रा. डाँक्टर एकनाथ ढोणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार देविदास देसाई  हे होते

यावेळी शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त मुंजाबा तरुण मिञ मंडळ यांच्या वतीने व संदिप शेरमाळे यांच्या संकलपनेतून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मास्टर धनंजय जादूगार यांचे जादूचे प्रयोग शो आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार देविदास देसाई, पुणे विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य प्रा.डॉ. एकनाथ ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मार्केट कमिटीचे मा. उपसभापती आण्णासाहेब शिंदे, सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुनिल शिंदे, पत्रकार बाळासाहेब वडीतके, सोन्याबापू जाटे,डॉ. सुनिल चिंधे, केरूनाना शिंदे, आण्णासाहेब शेरमाळे, चंद्रकांत वडीतके, सहाय्यक फौजदार लबडे, सिध्देश्वर चहा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र खेमनर, वृक्षमित्र अजित देठे, कैलास एनोर, संजय वडीतके, गणेश डोमाळे, सचिन चींधे, महेश चिंधे,संजय वडीतके,गंगाधर भोसले मुंजबा तरुण मिञ मंडळाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

प्रास्ताविक दत्तात्रय कडनोर यांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब शेरमाळे यांनी केले.स्पंदन फौउंडेशनचे संदीप शेरमाळे यांनी आभार प्रदर्शन केले

राहुरी (प्रतिनिधी): सात्रळ,राहुरी येथील नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी सार्थक गोविंद कडू यांची मडगाव गोवा येथे २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित राष्ट्रीय टी-ट्वेंटी गोवा गोल्ड कप साठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे.दिनांक २५ ते २७ दरम्यान श्रीरामपूर येथे संघाच्या सराव शिबिरामध्ये तो सहभागी होईल.कबीर चौदांते जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी सार्थकला या स्पर्धेमध्ये घेण्याची संधी मिळाली आहे. देशभरातून या स्पर्धेसाठी १८ संघ सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून यातून त्यांना क्रिकेट खेळाचे चांगले कौशल्य अवगत करता येईल. निवड झाल्याबद्दल सार्थकचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget