३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गौरव डेंगळे यांची गोवा राज्य नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक श्री गौरव अरविंद डेंगळे यांची ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा राज्य नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्तीचे पत्र गोवा नेटबॉल संघटनेचे सचिव प्रतिष नाईक यांनी दिले.

गोव्या राज्यात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत असून देशातील २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशातून सुमारे १०,००० खेळाडू सहभागी होणार आहेत.खंडाळा या ग्रामीण भागातील क्रीडा शिक्षक श्री गौरव डेंगळे यांना गोवा राज्याच्या नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती ही आपल्या श्रीरामपूर तालुक्याकरीता अभिमानाची बाब आहे.दिनांक १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान डेंगळे हे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा भाग असतील.डेंगळे यांनी खेलो इंडिया युथ गेम्स साठी व्हॉलीबॉल खेळाचे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फतोडा,मडगाव नेहरु स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन संपन्न आहे.गोवा नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डेंगळे यांचे गोवा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष शुभम नार्वेकर,साईनाथ सोपटे,सचिव प्रतिष नाईक,गोवा टेनिसबॉल सचिव निलेश नाईक,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,श्री पार्थ दोशी,श्री राजेंद्र कोहकडे,श्री नितीन बलराज आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget