दरम्यान श्रीरामपुरात भीम आर्मीचे विद्यार्थी नेते पॅंथर ऋषी पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व गौरव भालेराव आणि साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वात "विद्यार्थी पँथर डरकाळी"आंदोलन झाले.यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्हा दौरावर आले असता,भीम आर्मीचे नेते अजय मैंदर्गीकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करत काळे झेंडे दाखवून आक्रमक पद्धतीने निषेध नोंदवला. त्याचबरोबर भीम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोक भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजप प्रवक्ते आमदार राम कदम यांच्या कार्यालयावर आक्रमकपणे आंदोलन झाले.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आणि भीम आर्मीच्या आक्रमक व जहाल आंदोलनाची धास्ती घेत सरकारने खाजगीकरण व कंत्राटी भरती चा जीआर अखेर मागे घेतला. यापुढे भविष्यात राज्य सरकारने असे चुकीचे धोरण आखत तरुण, बेरोजगार व विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे चुकीचे निर्णय घेतले तर भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आणि भीम आर्मी भारत एकता मिशन अशाच प्रकारे आक्रमकपणे आंदोलन करत सरकारला धारेवर धरेल.असे वक्तव्य यावेळी भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्यार्थीनायक पँथर ऋषी पोळ यांनी केले.
भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेशच्या विद्यार्थी पॅंथर डरकाळी आंदोलनाचा इम्पॅक्ट..राज्य सरकारने घेतलेला खाजगीकरणाचा निर्णय अखेर रद्द......
श्रीरामपुर-राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये नऊ खाजगी कंपन्यांमार्फत कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्य घरातील मुले जे आपल्या गरीब परिस्थितीशी झुंज देत हालाखीच्या परिस्थितीत दिवस-रात्र अभ्यास करून स्वतःच्या कर्तुत्वावर सरकारी नोकरी करून आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होते.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय अत्यंत घातक असून तो वेळीच रोखला नाही तर प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांचे स्वप्न भंग होईल आणि म्हणूनच त्यांचे स्वप्न पुन्हा जिवंत करण्यासाठी रस्त्यावरच उतरून याचा निषेध करावा लागणार.हे ओळखून क्षणाचाही विलंब न करता भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विद्यार्थ्यांनी श्रीरामपूर येथे सरकारी शाळा बंदीच्या व खाजगीकरणाच्या विरोधात "विद्यार्थी पँथर डरकाळी" आंदोलन केले.याचबरोबर भीम आर्मी भारत एकता मिशन व आजाद समाज पार्टीच्या वतीने देखील या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलने झाली.
Post a Comment