गोवा येथे 37 वे नॅशनल गेम्स याची सुरुवात

दिनांक 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 रोजी गोवा येथे 37 वे नॅशनल गेम्स होत आहेत. हि 37 वे नॅशनल गेम्स गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहेत. या गेमचे उद्घाटन समारंभ 26 ऑक्टोबर रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये पिंच्याक सिलॅट हा खेळ प्रथमच समाविष्ट झालेला आहे आणि 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2023 रोजी कॅम्पल ग्राउंड विलेज पणजी येथे पींच्याक सिल्याट खेळाची स्पर्धा संपन्न होणार आहे. या खेळामध्ये एकूण 28 राज्यातील ३०४ खेळाडूंची निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 20 खेळाडूंची निवड झालेली असून ते एकूण २३ पदकांसाठी खेळणार आहेत. 

खालील खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व ३७ व्या नॅशनल गेम्स २०२३ मध्ये करत आहेत.
 
धनंजय सांडूगडे (टॅडींग इव्हेंट-४५ किलो), रामचंद्र बदक(टॅडींग इव्हेंट ४५ ते ५० किलो), कार्तिक पालवे(टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ आणि गंडा इव्हेंट),सोमनाथ सोनवणे(टॅडींग इव्हेंट ५५ ते ६० किलो),वैभव काळे(टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, रेगू इव्हेंट आणि सोलो इव्हेंट ), मुकेश चौधरी(टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), ओंकार अभंग(टॅडींग इव्हेंट ७० ते ७५ किलो आणि रेगु इव्हेंट), अंशुल कांबळे(टॅडींग इव्हेंट ८० ते ८५ किलो आणि रेगु इव्हेंट), अनुज सरनाईक(टॅडींग इव्हेंट ८५ ते ९० किलो), पियुष शुक्ला( टॅडींग इव्हेंट ९० ते ९५), धनंजय जगताप( टॅडींग इव्हेंट ९५ ते ११० किलो), कृष्णा पांचाळ (तुंगल इव्हेंट), सचिन गर्जे(गंडा इव्हेंट), जयश्री शेट्टी(टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ किलो आणि रेगू इव्हेंट), किर्णाक्षी येवले (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, तूंगल इव्हेंट आणि रेगु इव्हेंट), पौर्णिमा तेली( टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), दीक्षा शिंदे  (टॅडींग इव्हेंट ७५ ते ८० किलो), भक्ती किल्लेदार (८५ ते १०० किलो),रिया चव्हाण (रेगु इव्हेंट), पूर्वी गांजवे (सोलो इव्हेंट) तसेच महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून श्री. साहेबराव ओहोळ आणि प्रशिक्षक म्हणून कु. सुहास पाटील आणि कुु. अभिषेक आव्हाड यांची निवड करण्यात आली.

या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर हे २ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक श्री. किशोर येवले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान विकास स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पार पडले.
मागील १३ वर्ष महाराष्ट्र संघ हा पिंच्याक सिल्याट खेळामध्ये अव्वल स्थानी आहे आणि आता सुद्धा तीच कामगिरी ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाची कायम राहील अशी माहिती इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन चे अध्यक्ष मा.श्री. किशोर येवले यांनी दिली. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजित दादा पवार साहेब आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव मा. श्री नामदेव शिरगावकर यांनी महाराष्ट्र संघाला 37 व्या नॅशनल गेम्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget