सार्थक कडूची गोवा गोल्ड कप निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड.
राहुरी (प्रतिनिधी): सात्रळ,राहुरी येथील नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी सार्थक गोविंद कडू यांची मडगाव गोवा येथे २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित राष्ट्रीय टी-ट्वेंटी गोवा गोल्ड कप साठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे.दिनांक २५ ते २७ दरम्यान श्रीरामपूर येथे संघाच्या सराव शिबिरामध्ये तो सहभागी होईल.कबीर चौदांते जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी सार्थकला या स्पर्धेमध्ये घेण्याची संधी मिळाली आहे. देशभरातून या स्पर्धेसाठी १८ संघ सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून यातून त्यांना क्रिकेट खेळाचे चांगले कौशल्य अवगत करता येईल. निवड झाल्याबद्दल सार्थकचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Post a Comment