Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक श्री गौरव अरविंद डेंगळे यांची ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा राज्य नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्तीचे पत्र गोवा नेटबॉल संघटनेचे सचिव प्रतिष नाईक यांनी दिले.

गोव्या राज्यात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत असून देशातील २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशातून सुमारे १०,००० खेळाडू सहभागी होणार आहेत.खंडाळा या ग्रामीण भागातील क्रीडा शिक्षक श्री गौरव डेंगळे यांना गोवा राज्याच्या नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती ही आपल्या श्रीरामपूर तालुक्याकरीता अभिमानाची बाब आहे.दिनांक १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान डेंगळे हे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा भाग असतील.डेंगळे यांनी खेलो इंडिया युथ गेम्स साठी व्हॉलीबॉल खेळाचे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फतोडा,मडगाव नेहरु स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन संपन्न आहे.गोवा नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डेंगळे यांचे गोवा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष शुभम नार्वेकर,साईनाथ सोपटे,सचिव प्रतिष नाईक,गोवा टेनिसबॉल सचिव निलेश नाईक,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,श्री पार्थ दोशी,श्री राजेंद्र कोहकडे,श्री नितीन बलराज आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

श्रीरामपूर प्रतिनिधी/  शिर्डी शहर व शहराच्या लगत मोठ्या प्रमाणावर हाॅटेल लाॅजिग परमीट रुम बीअर बार आहेत वाढत्या महावितरणच्या विज बीलामुळे अनेक व्यावसायिक बील भरताना मोठी दमछाक होताना दिसते मात्र काहीजण  नको झंझट म्हणून वेळेवर कधी दंडात्मक दंड भरून वीजबील भरत असताना  काहीनी वापरलेला वीज चोरीचा शाॅटकट.  नगर जिल्ह्यात जवाबदार शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या राहता तालुक्यातील युवा नेत्यांच्या भावाच्या  परमीट रुम बीअर बारवर  अशा पध्दतीने. मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणच्या नाशिक येथील पथकाने  हाॅटेल गारवा परमीट रुम बीअर बार या ठिकाणी जाऊन  मयत मालकाच्या हाॅटेल वर मीटर तपासणी केली असता  त्या  विज मीटरच्या आतील पट्टीवर पिसीबीला जाणा-या केशरी रंगाच्या वायरची जागा बदलुन कपर पट्टीवर व इतर ठिकाणी रिशाॅलडीग केलेले आढळतले तसेच  तीन वर्षांपूर्वी देखील वीज चोरीची केस झाली होती त्या नंतर सुध्दा परत तपासणी  केली. त्यात देखील तांत्रिक. छेडछाड. केल्याने त्यामुळेच मीटर पळत नसल्याने बारा महिन्यांत २१८०३युनिट रुपये ४लाख ७५६५०रुपयाची वीजचोरी केली असून बील भरण्यासाठी मुदत दिली असताना बील न भरल्याने ज्या नावावर मीटर आहे त्या मयताचे वारस उल्हास पुंजाजी काळे व काही दिवसांपूर्वी ज्या इसमाला हाॅटेल चालवण्यासाठी दिले तो प्रकाश एन शेट्टी यांच्या विरोधात शिर्डी विभागातील कनिष्ठ अभियंता रोशन संजय बागुल वय २२ रा सावळीविहीर ता राहता यांनी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून विद्युत कायदा कलम १३५ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन अशा प्रकारे राहता तालुक्यातील किती व्यावसायिक विज चोरी करतात यासाठी नाशिक व नगर येथील महावितरणच्या पथकाकडून बारीकसारीक माहिती घेतली जात आहे  किरकोळ दोन चार हजारांच्या बीलासाठी महावितरणचे वायरमन वीजखंडीत करत असताना धनदांडगे व मोठे मंडळी कोणाच्या आशिर्वादाने वीज चोरी करत आहे याकडे काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष वेधले असल्याचे एका श्रीरामपूर येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-  कर्तव्य बजावत असताना आपल्यासारखे समाजसेवक पाठीशी उभे असल्यावर काम करण्याचा उत्साह निश्चितच वाढतो द्विगुणीत होते त्यामुळे चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असा विश्वास लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी व्यक्त केला   गळनिंब तालुका श्रीरामपुर येथील स्पंदन फौंउंडेशन व सिद्धेश्वर चहा समितीच्या वतीने उत्कृष्ट सेवेबद्दल लोणी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक योगेशजी शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापिठ सिनेटचे माजी सदस्य प्रा. डाँक्टर एकनाथ ढोणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार देविदास देसाई  हे होते

यावेळी शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त मुंजाबा तरुण मिञ मंडळ यांच्या वतीने व संदिप शेरमाळे यांच्या संकलपनेतून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मास्टर धनंजय जादूगार यांचे जादूचे प्रयोग शो आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार देविदास देसाई, पुणे विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य प्रा.डॉ. एकनाथ ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मार्केट कमिटीचे मा. उपसभापती आण्णासाहेब शिंदे, सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुनिल शिंदे, पत्रकार बाळासाहेब वडीतके, सोन्याबापू जाटे,डॉ. सुनिल चिंधे, केरूनाना शिंदे, आण्णासाहेब शेरमाळे, चंद्रकांत वडीतके, सहाय्यक फौजदार लबडे, सिध्देश्वर चहा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र खेमनर, वृक्षमित्र अजित देठे, कैलास एनोर, संजय वडीतके, गणेश डोमाळे, सचिन चींधे, महेश चिंधे,संजय वडीतके,गंगाधर भोसले मुंजबा तरुण मिञ मंडळाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

प्रास्ताविक दत्तात्रय कडनोर यांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब शेरमाळे यांनी केले.स्पंदन फौउंडेशनचे संदीप शेरमाळे यांनी आभार प्रदर्शन केले

राहुरी (प्रतिनिधी): सात्रळ,राहुरी येथील नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी सार्थक गोविंद कडू यांची मडगाव गोवा येथे २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित राष्ट्रीय टी-ट्वेंटी गोवा गोल्ड कप साठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे.दिनांक २५ ते २७ दरम्यान श्रीरामपूर येथे संघाच्या सराव शिबिरामध्ये तो सहभागी होईल.कबीर चौदांते जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी सार्थकला या स्पर्धेमध्ये घेण्याची संधी मिळाली आहे. देशभरातून या स्पर्धेसाठी १८ संघ सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून यातून त्यांना क्रिकेट खेळाचे चांगले कौशल्य अवगत करता येईल. निवड झाल्याबद्दल सार्थकचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : ३९ वी ऑल इंडिया रोलर रिले चॅम्पियनशिप दिनांक १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान पणजी, गोवा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रोलर रिले महाराष्ट्रचे सचिव श्री भिकान अंबे यांनी दिली.ऑल इंडिया रोलर रिले चॅम्पियनशिप साठी अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी शुक्रवार दि २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.या निवड चाचणीसाठी वय वर्ष १०,१२,१४,१६,१८,२० व खुल्या गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. या स्पीड स्केटिंग स्पर्धेसाठी १०० मीटर,२०० मीटर,३०० मीटर व रिले स्पर्धेमध्ये खेळाडू सहभागी होऊ शकतात. निवड झालेल्या खेळाडूना स्केटिंग स्किन सूट दिला जाईल.निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी श्री नितीन गायधने,नितीन बलराज,दिपक रणपिसे,श्री प्रसाद लबडे आदींशी संपर्क साधावा.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): टाकळीभान,श्रीरामपूर येथील यश पवन काथेड मडगाव गोवा येथे २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित राष्ट्रीय टी-ट्वेंटी गोवा गोल्ड कप साठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यश श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण  घेत आहे.इयत्ता ६ वी पासून यशने लेदर क्रिकेट खेळायला सुरुवात केली.ऑफ स्प्रिंग गोलंदाजी व मधल्या फळीतील संयमी फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे.निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल यशचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला प्रशिक्षक नितीन बलराज, नितीन गायधने आदींचे मार्गदर्शन लाभले.

बेलापूर ( वार्ताहर ) श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असुन वाकण वस्ती वरील ग्रामस्थांनी परिसरात विकासाकामे न झाल्याच्या निषेधार्थ निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असुन या बाबतचे निवेदन तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे    ग्रा.प च्या व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येणाऱ्या सर्वच निवडणूकीवर उक्कलगाव (ता.श्रीरामपूर )येथील वाकण वस्ती वरील समस्त गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे .कोणतेही विकास काम न झाल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी श्रीरामपूरचे प्रांतधिकारी किरण सांवत यांना ग्रामस्थांनी दिले आहे.त्या निवेदनात ग्रामस्थांनी  म्हटले आहे की,इजिमा २१ ते वाकण वस्ती रोडचे रस्त्याचे साधारणता २० वर्षापूर्वी खडीकरणाचे काम झाले.त्यानंतर अनेक वर्ष उलटले तरी अद्यापही ग्रा.प व जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या माध्यमातून रस्त्याचा विकास झाला नाही.त्यामुळे रस्त्याचे काम न झाल्यामुळे  ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.या रस्त्यावरून शाळकरी मुलांबरोबर शेतकऱ्यांना ये जा करावी लागते पावसाळ्यात तर चालाणेही अवघड होवुन जाते या रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडलेले आहेत परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे  वैद्यकीय सेवाही वेळेवर मिळत नाही. ग्रामपंचायत,आमदार, खासदारांना निवेदन देवून देखील कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.विकास कामांपासून वंचित राहिल्याने वाकणवस्ती रोडवरील ग्रामस्थांनी ग्रा.प निवडणूकीवर बहिष्कार टाकला.यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांच्या सह्या केल्या आहे. 

  कोणतीही विकासाची गंगा वाकणवस्ती येथे आणली.फक्त एकच उदाहरण द्या,यापुढे येणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार असल्याचे या निर्णयावर ठाम राहणार आहे.असे ग्रामस्थांनी  सांगितले.   

 वाकण वस्ती ते दिपक किसन थोरात यांच्या वस्तीपर्यंत तसेच गोरख बाबुराव थोरात यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची पाईप लाईन झाल्या आहे.मात्र एकदाही पाणी मिळेल नाही.आम्हीही गांवकरी आहे बरं का? असा प्रश्न ग्रामस्थांनी या वेळी उपस्थित केला.या निवेदनावर संजय थोरात गोरख थोरात दिपक थोरात आदिंच्या सह्या आहेत

.

.......

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget