यश काथेडचा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार
श्रीरामपूर (प्रतिनिधी): टाकळीभान,श्रीरामपूर येथील यश पवन काथेड मडगाव गोवा येथे २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या निमंत्रित राष्ट्रीय टी-ट्वेंटी गोवा गोल्ड कप साठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यश श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे.इयत्ता ६ वी पासून यशने लेदर क्रिकेट खेळायला सुरुवात केली.ऑफ स्प्रिंग गोलंदाजी व मधल्या फळीतील संयमी फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे.निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल यशचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला प्रशिक्षक नितीन बलराज, नितीन गायधने आदींचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment