
बेलापूर ( वार्ताहर ) श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असुन वाकण वस्ती वरील ग्रामस्थांनी परिसरात विकासाकामे न झाल्याच्या निषेधार्थ निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असुन या बाबतचे निवेदन तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे ग्रा.प च्या व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येणाऱ्या सर्वच निवडणूकीवर उक्कलगाव (ता.श्रीरामपूर )येथील वाकण वस्ती वरील समस्त गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे .कोणतेही विकास काम न झाल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी श्रीरामपूरचे प्रांतधिकारी किरण सांवत यांना ग्रामस्थांनी दिले आहे.त्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की,इजिमा २१ ते वाकण वस्ती रोडचे रस्त्याचे साधारणता २० वर्षापूर्वी खडीकरणाचे काम झाले.त्यानंतर अनेक वर्ष उलटले तरी अद्यापही ग्रा.प व जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या माध्यमातून रस्त्याचा विकास झाला नाही.त्यामुळे रस्त्याचे काम न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.या रस्त्यावरून शाळकरी मुलांबरोबर शेतकऱ्यांना ये जा करावी लागते पावसाळ्यात तर चालाणेही अवघड होवुन जाते या रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडलेले आहेत परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वैद्यकीय सेवाही वेळेवर मिळत नाही. ग्रामपंचायत,आमदार, खासदारांना निवेदन देवून देखील कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.विकास कामांपासून वंचित राहिल्याने वाकणवस्ती रोडवरील ग्रामस्थांनी ग्रा.प निवडणूकीवर बहिष्कार टाकला.यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांच्या सह्या केल्या आहे.
कोणतीही विकासाची गंगा वाकणवस्ती येथे आणली.फक्त एकच उदाहरण द्या,यापुढे येणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार असल्याचे या निर्णयावर ठाम राहणार आहे.असे ग्रामस्थांनी सांगितले.
वाकण वस्ती ते दिपक किसन थोरात यांच्या वस्तीपर्यंत तसेच गोरख बाबुराव थोरात यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची पाईप लाईन झाल्या आहे.मात्र एकदाही पाणी मिळेल नाही.आम्हीही गांवकरी आहे बरं का? असा प्रश्न ग्रामस्थांनी या वेळी उपस्थित केला.या निवेदनावर संजय थोरात गोरख थोरात दिपक थोरात आदिंच्या सह्या आहेत
.
.......
Post a Comment