Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे गावच्या सरपंच पदी सौ सविता शहाजी वडीतके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .                                               श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीचे सरपंच  निखील वडीतके यांनी आपल्या पदाचा राजीनामा रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे यांच्याकडे दिला होता .त्यांनी तो तहसीलदार मिलींद वाघ यांच्याकडे सुपुर्त केला त्यांच्या सुचनेनुसार मांडवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीकरीता बैठक बोलविण्यात आली होती या वेळी सरपंच पदाकरीता सौ सविता शहाजी वडीतके यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधीकारी तथा मंडलाधिकारी बी के मंडलीक यांनी जाहीर केले या वेळी उक्कलगावचे कामगार तलाठी इलीयास ईनामदार मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे ग्रामसेवक ताराचंद गाढे तसेच रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य पुष्पाताई चितळकर कल्पना गेठे सुमन जांभुळकर गोविंद तांबे गोकुळ पवार अशोक विटनोर चेतन वडीतके जालींदर तांबे संपतराव चितळकर शहाजी वडीतके दगडू पावले बापुसाहेब काबुडके बाळासाहेब जांभुळकर अतुल तांबे पत्रकार देविदास देसाई भरत थोरात संदीप शेरमाळे मच्छिंद्र पारखे डाँक्टर उद्धव जोशी कृष्णा दळे बबनराव वाडीतके केशव दळवी भाऊसाहेब चितळकर संतोष चितळकर आशोक झाडगे आदिसह मांडवे तांबेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून बी के मडंलीक यांनी काम पाहीले त्यांना ग्रामविकास अधीकारी ताराचंद गाढे यांनी सहकार्य केले निवडीनंतर फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली  शेवटी शहाजी वडीतके यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापूरः(प्रतिनिधी  )-मागील वीस वर्षाच्या कार्यकाळात ,सगळेच अलबेल होते तर जनतेने तुम्हाला का नाकारले.या कारभाराच्या विरोधात आवाज उठवून जे निवडून आले तेच आता सरपंच पद न मिळाल्याच्या पोटदुखीतून आरोप,व्हिडीओ क्लिप्स टाकून राजकीय स्टंटबाजी करीत असल्याची टिका सामाजिक कार्यकर्ते विजय पोपटराव अमोलिक यांनी केली आहे.                                                                                            प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात.विजय अमोलीक यांनी पुढे म्हटले आहे  की,या महाशयाच्या विजयात आमच्या समाजाचा मोलाचा वाटा आहे.असे असताना हे सदस्य ज्यांचेविरुध्द आरोप करुन गावाकरी मंडळाच्या शिदोरीवर निवडून आले.यांच्या थकीत घरपट्ट्या देखील गावकरी मंडळाने भरल्या अन तुमच्यात  नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून या ज्या विरोधकांविरुध्द निवडून आले  स्वार्थापोटी त्याच विरोधी गटात सामिल झाले आहे.स्वतः वाळू तस्करीत सहभाग असणारे हे महाशय सावपणाचा आव आणून ग्रामपंचायत प्रशासनावर खोटेनाटे आरोप करुन प्रसिध्दीचा खटाटोप करीत आहेत. स्वतः अवैध धंदे करायचे आणि वर नाकाने कांदे सोलून फुशारक्या मारायच्या पण जनता एवढी खूळी नाही.ही हरिहराची नगरी आहे.इथे अनैतिकतेला थारा नसल्याचेही अमोलिक यांनी म्हटले आहे.                  गेल्या वीस वर्षे यांची सत्ता होती. त्यां काळातही पाईप लाईन चोकअपची समस्या अनेकदा आली होती.ही तांत्रिक अडचण असल्याने सर्वांनी समजून घेवून सहकार्य केले होते.आताही पाईपलाईन कोणाच्यातरी खोडसाळपणामुळे चोकअप झालेली आहे.मागेही गोधड्या टाकून पाईपलाईन चोकअपचा खोडसाळपणा विघ्नसंतोषिंनी केला होता.चोकअप सापडले पण आठ चारीला पाणी असल्याने चोकअप काढण्यात अडचण येत आहे.ही अडचण तात्पुरती असून दोन तीन दिवसात चारी बंद होताच चोकअप निघेल असा खुलासा ग्रामपंचायत पदाधिका-यांनी केलेला आहे.अशावेळी सामंजस्य व सहकार्य करणे गरजेचे असताना अडचणीचे भांडवल करुन टिकाटिपणी केली जात आहे.खरे तर बेलापुर गावाला १२६ कोटीची पाणीपुरवठा योजना,साठवण तलावासाठी आठ एकर जमिन मोफत मिळवून गावकरी मंडळाने ऐतिहासिक काम केले आहे,त्याबद्दल अभिनंदन करायचे सोडून केवळ विरोधासाठी विरोध केला जात असल्याचा आरोपही विजय अमोलिक यांनी केला आहे.

बेलापूर:(प्रतिनिधी  )--श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात येणार असलेल्या विकास कामांना आपला विरोध नसून चुकीच्या व हुकूमशाही पद्धतीने होणाऱ्या कारभाराला विरोध आहे व यापुढेही राहील.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विखे गटाच्या सर्व संचालकांच्या साथीने बाजार समितीत शेतकरी, सभासद,व्यापारी,हमाल,मापाडी यांच्या हिताकरीता हे काम यापुढेही सुरूच राहील अशी प्रतिक्रिया श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.

बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी नुकत्याच केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक  खंडागळे म्हणाले की,बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार येथे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था होण्यासाठी कॅन्टीन पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. व्यापारी शेड हॉलची दुरुस्ती देखील आवश्यक आहे.बायपास व नगर रोड येथील गाळ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे तसेच उपबाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालयाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून संस्थेची आर्थिक परिस्थिती नसताना स्वतःच्या फायद्यासाठी मलाईदार कामे हाती घेतली जात आहेत.एकाच मिटिंग मध्ये १६-१७ मलाईदार विषय बहुमताच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता मंजूर करून घेतले जातात याची घाई कशासाठी? असा प्रश्न पडतो. सध्या ही सर्व विकास कामे करण्याची संस्थेची आर्थिक परिस्थिती नाही.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने येणाऱ्या काळात संस्थेचे उत्पन्न कमी होणार आहे.याआधी संस्थेने विकास कामांसाठी शासनाकडून कर्ज घेतलेले आहे ते कर्ज अद्याप फिटलेले नसताना पुन्हा कर्ज काढून विकास कामे केली जाणार आहेत याचा बोजा शेतकरी,सभासद,व्यापारी यांच्यावरच पडणार आहे.मग रीन काढून सन करण्याची ही पद्धत आहे  अशा परिस्थिती हुकूमशाही पद्धतीने होत असलेल्या चुकीच्या कामकाजाला आपला विरोध आहे. बेलापूर येथील व्यापारी संकुलास स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती तसेच काही मंडळींनी माजी सरपंच कै.मुरलीशेठ खटोड यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी संकुलास नाव देण्याचा ठराव याआधीच झाला आहे असे सभापती यांनी गावकऱ्यांना खोटे सांगितले तेव्हा गावची बांधिलकी कुठे गेली होती.सभापती-उपसभापती बेलापूर गावचे आहेत याची उपरती आजच कशी झाली? उपसभापतीला तीन महिने तुटक्या खुर्चीवर बसवले तेव्हा उपसभापती गावातीलच आहे याचे भान राहिले नव्हते का?उपसभापती गावातीलच आहेत तर मग संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जाहिराती मध्ये उपसभापती चे नाव का टाकण्यात येत नाही? केवळ उपसभापती नामदार विखे पाटील गटाचे आहे यामुळेच राजकीय सूडबुद्धीने उपसभापतीला वेगळी वागणूक दिली जात आहे ना? असा सवाल खंडागळे यांनी केला.आहे बेलापूर सोसायटीच्या मागील काळातील कामकाजाची सहकार खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी रिक्षा भरून कागदपत्रे सील करून नेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ग्रामस्थांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची केविलवाणी धडपड सभापती सुधीर नवले यांच्याकडून सुरू आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील,खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्यामुळे बेलापूर-ऐनतपूर गावाला १२६ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली.चार कोटी किमतीची शेती महामंडळाची जागा  साठवण तलावासाठी विनामुल्य मिळाली.असे ऐतिहासिक काम सुरू असताना त्याचे शब्दाने ही कौतुक केले नाही. गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी गावच्या पाणीपुरवठा योजनेला कुठे व कसा विरोध केला, झेंडा चौक सुशोभीकरनाला,हरिहर नगर(रामगड)येथील हनुमान मंदिर कामाला तसेच ऐनतपूर येथील बिरोबा मंदिर कामाला कसा विरोध केला हे योग्यवेळी जनतेपुढे आणू असे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी शेवटी म्हटले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावाला प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती पद उपसभापती पद तसेच सचिव पदही मिळालेले असुन गावात विकास कामे होणे अपेक्षित असताना काही मंडळी विकासकामात खोडा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी केला आहे.            प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सभापती सुधीर नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावातील व्यापारी व शेतकरी बांधवांच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार बाजार समीतीच्या पहील्याच बैठकीत बेलापुर उपबाजार समीतीच्या आवारातील काँक्रीटीकरणाची मंजुरी घेतली तसेच मुख्य बाजार समीती श्रीरामपुर व उपबाजार समीती टाकळीभान येथील कामाचेही प्रस्ताव पणन संचालक यांच्याकडे मंजुरीसाठी तयार केलेले आहेत मात्र बाजार समीतीचे उपसभापती व गावाचे उपसरपंच अभिषेक खंडागळे हे केवळ राजकीय ताकदीचा वापर करुन दबाव तंत्राचा अवलंब करुन विकास कामात खिळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत .त्यांनी अन्य दोन संचालक नानासाहेब पवार व सुनिल शिंदे यांच्या स्वाक्षरी घेवुन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली असुन त्यात या विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देवु नये असे म्हटले आहे . खरे तर गावाच्या विकासात राजकीय जोडे बाजुला ठेवुन एकदिलाने काम करणे अपेक्षित होते .परंतु केवळ मोठमोठी भाषणबाजी करायची लोकांची दिशाभूल करायची ही यांच्या कामाची पद्धत आहे हे साऱ्या गावाला जाँगींग ट्रँकच्या कामातुन माहीत झाले आहे जाँगींग ट्रँकचा फार मोठा गवगवा झाला मोठ्या प्रमाणात निधीही खर्ग झाला अन त्या जाँगींग ट्रँकचा जोकींग ट्रँक झाला आपण बोगस व चुकीची कामे करायची अन दुसऱ्याच्या कामात तंगडी अडवायची ही यांची पद्धत आहे यांच्या ओठात एक अन पोटात एक आहे .केवळ राजकीय कावीळ झाल्याने त्यांच्या असणाऱ्या महाभागाच्या सांगण्यावरुनच विकास कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही नवले यांनी शेवटी म्हटले आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )- श्रीरामपूर तालुक्यात चालविल्या जाणाऱ्या हाँटेल खानावळ या ठिकाणी खुलेआम अनाधिकृत दारु विक्री सुरु असुन अशा अनाधिकृत दारु विक्री ठिकाणावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपुर तालुका लिकर आसोसिएशनचे सल्लागार सुनिल मुथा यांनी केली आहे .या बाबत सुनिल मुथा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की श्रीरामपुर तालुक्यात सुरु असणारे हाँटेल खानावळ या ठिकाणी  संबंधित यंञणांशी हातमिळवणी करुन बेकायदेशीर दारु विक्री होत असून यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे.तसेच अधिकृत परवाना धारकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे  संबंधित प्रकरणी परवानाधारक हाॕटेल चालकांचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून   सदर प्रकार त्यांच्या निदर्शानास आणून देवून  याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे  तालुका लिकर असोसिएशनचे सल्लागार सुनिल मुथा यांनी सांगीतले.                                                            श्री.मुथा म्हणाले की,तालुक्यात सुमारे दिडशे हाॕटेल्स खाणावळीच्या नावाखाली सुरु आहेत.या पैकी बहुतांश हॉटेल व खानावळी मधून संबंधित शासन यंञणेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन व आर्थिक तडजोड करुन राजरोसपणे अनधिकृत दारु विक्री  केली जात आहे.असे असताना संबंधित शासकीय यंञणा या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे.                                                  ,सदर दारु हि दमन येथून अथवा वाईन शॉप मधून आणून बेकायदेशीररित्या  विकली जाते.यातील बहुतांश दारु ही बनावट असते.हा ग्राहकांच्या जीविताशी खेळ आहे.यामुळे पांगरमल प्रकरणाची पुनरावृत्ती  होवू शकते.तसेच अशा दारु विक्रीमुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. यामुळे अधिकृत परवानाधारक परमीट हाॕटेल व्यवसायिकांचे व्यवसाय देखील  अडचणीत आले  आहेत.परवानाधारक कोट्यावधीचा महसूल शासनाला देतात.असे असताना आर्थिक हितसंबंधांमुळे  या महसुलावर पाणी फिरत आहे.हा प्रकार गंभीर असून शासनाचया संबंधित यंञणांनी व  अधिका-यांनी याची दखल घेवून तात्काळ कडक कारवाई करावी.यासंदर्भात  लिकर असोसिएशनचे प्रतिनिधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटुन सविस्तर माहीती देणार आहेत.या तक्रारीची दखल घेवून कारवाई करावी व अनाधीकृत विनापरवाना चाललेली दारु विक्री तातडीने बंद करावी अशा प्रकारे विना परवाना दारु विक्री करणारी ठिकाणे देखील संबधीत अधीकाऱ्यांना माहीती आहेत तरी या प्रकाराला आळा घालावा. अन्यथा  वरिष्ठांना नावानिशी माहिती देवून कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असा इशारा मुथा यांनी दिला आहे.

जिल्ह्यात बेस्ट डिटेक्शन केल्या बद्दल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व शहर पोलीस स्टेशन च्या सर्व अधिकारी .DB स्टाफ व अंमलदार ह्यांचे अभिनंदन ,सर्वांच्या वतीने मा विशेष पोलीस महानिरीक्षक सो श्री बी.जी.शेखर पाटील ह्यांचे वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget