Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील सामाजिक कार्यकर्ते, बिनधास न्यूजचे कार्यकारी संपादक देविदास देसाई यांचा सपत्नीक सन्मान राज्याचे महसुल , पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला        त्या सत्काराचे निमित्तही तसेच होते सामाजिक कार्य करताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते परंतु बेलापुरात सतत सामाजिक कार्यात तसेच पत्रकारीता क्षेत्रात आघाडीवर राहुनही देविदास देसाई यांनी आपल्या कुटुंबाकडेही तितकेच लक्ष दिले त्यामुळेच त्यांची दोन्ही मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे त्यांचा मोठा मुलगा अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहे तर दुसरा मुलगा अभिषेक देसाई हा जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कार्यरत आहे तिनही मुलांना उच्चशिक्षित करुन दोन मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय सेवेत आहेत त्यामुळेच दोन शासकीय अधिकाऱ्याचे माता- पिता होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या या अवलीयांचा सन्मान राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालेला आहे देविदास देसाई यांनी जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही बऱ्याच वर्ष केलेले होते जिल्ह्यात अंनिसची चळवळ सुरु करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता त्यांनी अनेक बुवाबाजी करणाऱ्या बुवांचा भांडाफोड केलेला होता. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पहात आहे सीमा सुरक्षा दल BSF बाँर्डर सिक्युरीटी फोर्स मध्येही त्यांनी पाच वर्ष देशसेवा केलेली आहे . तसेच बेलापुर व परिसरातील घडणाऱ्या  सर्व घटनां वृत्तपत्र तसेच घडामोडी गृपवर तातडीने पाठविण्याचे  काम ते जागृक पत्रकार म्हणून ते सतत करत असतात.बेलापुर गावातही ते सामाजिक कार्यात नेहमी अघाडीवर असतात. गावात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे म्हणून त्यांची ओळख आहे .बेलापुर गावाला १२६ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली त्या योजनेच्या उद़्घाटन कार्यक्रमात संयोजकांनी देसाई दांम्पत्यांचा सन्मान घडवून आणला .चांगल्या उपक्रमात चांगल्या व्यक्तीचा सन्मान चांगल्या व्यक्ती  नामदार विखे पाटील यांच्या शुभहस्ते केल्याबद्दल संयोजकांनाही बिनधास न्युजच्या वतीने धन्यवाद.

श्रीरामपूर : वैयक्तिक वादांना धार्मिक स्वरूप देऊन सामाजिक सलोखा नष्ट करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध घालण्या यावेत अशी मागणी समाजहित जोपासणाऱ्या जागरुक नागरिकांनी मा. तहसिलदार साहेब यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे कळविले आहे की, महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्षे अत्यंत सलोख्याने राहणारे विविध जाती धर्माचे लोक आपआपसातील ऋणानुबंध टिकवून आहेत, गुण्यागोविंदाने एकमेकांचा आदर करुन रहात आहेत. परंतू अलीकडच्या कालावधीत काही राजाश्रय प्राप्त संघटनांकडून हिंदु-मुस्लिम एकोपा बिघडवून त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

प्रेम ही प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी बाब आहे. १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या व्यक्तीने कुणावर करावे हा त्याचा / तिचा वैयक्तिक अधिकार आहे. यात कधी मुलगी हिंदु व मुलगा मुस्लिम राहु शकतो. तर कधी मुलगी मुस्लिम व मुलगा हिंदु असू शकतो. अशा प्रकरणांना धामिक रंग देऊन एकाच धर्माच्या लोकांवर दोष मढण्याचे षडयंत्र सुरु आहे. विशेषतः प्रेमप्रकरणात मुलगा मुस्लिम असेल तर अस्तित्वात नसलेल्या 'लव जिहाद' वगैरे काल्पनिक नाव देऊन संपूर्ण मुस्लिम समाजाला उघड उघड शिव्याशाप, दुषणे देण्याचे काम सुरु आहे. समाजातील तरुणांची माथी भडकावून त्यांना संपूर्ण मुस्लिम समाजा विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिमां विरुध्द हिंसाचार करणे, त्यांच्या धार्मिकस्थळांचे नुकसान करणे, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे अशी कृत्ये केली जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना भुषणावह नक्कीच नाहीत. सामाजिक सलोखा, सामाजिक सौहार्द टिकणे आणि त्यात वाढ होणे हाच त्यावरील उपाय आहे. वैयक्तिक प्रेमप्रकरणाचे राजकारण करुन विष पेरणाऱ्या लोकांना प्रतिबंध करावा हे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

घटना घडलेल्या ठिकाणी दोन्हीकडील लोकांना विश्वासात घेऊन, गुन्हेगारांवर योग्य कार्यवाही करुन सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याकामी प्रयत्न व्हावेत. दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई होत असतानाच ज्यांचा काही संबंध नाही अशा संपूर्ण अल्पसंख्य समाजाला वेठीस धरण्याचे हेतुपुरस्सर होणारे प्रयत्न हाणून पाडण्यात यावेत या संदर्भात शासनाकडून प्रयत्न व्हावेत असे मा. तहसिलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

निवेदनावर सर्वश्री नजीरभाई शेख, हाजी रफिक पोपटिया, जैनुद्दीन जहागिरदार, तन्वीर गुलाम हुसेन, अन्वरभाई फिटर, वासुदेव सैंदाणे, चाँदखान पठाण, बुऱ्हान जमादार, खलीलभाई मोमीन, समीर शेख, फहिमखान, डॉ. जब्बार पटेल, डॉ. इशान शेख, अश्पाकभाई आदिंच्या सह्या आहेत.


बेलापूर प्रतिनिधी-पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरली आहे‌‍ असे ठणकावून सांगणारे, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बेलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समता स्पोर्ट क्लब, आर एस ग्रुप, ग्रामपंचायत व बेलापुर सेवा संस्था यांच्या वतीने येथील विजयस्तंभ चौकामध्ये ‌‌‍सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी जयंती कृती समिती व आर एस ग्रुपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी सर्व समाज बांधवांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जि प सदस्य शरद नवले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील मुथा, बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, जनता विकास आघाडीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, पत्रकार ज्ञानेश गवले, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार, पो कॉ संपत बडे, पो कॉ भारत तमनर, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुस्तक शेख, मेजर सुजीत शेलार, प्रकाश कुऱ्हे, भास्कर बंगाळ, संजय शेलार, बंटी शेलार, रमेश शेलार, विजय शेलार, तानाजी शेलार, बाबासाहेब शेलार, अक्षय शेलार, रोहित शेलार, डॅनियल शेलार, बाळासाहेब शेलार, निलेश शेलार, राहूल शेलार, अशोक अंबिलवादे, भाऊसाहेब राक्षे, बाबुलाल पठाण,अल्ताफ शेख, संकेत शेलार यांचे सह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता स्पोर्ट क्लब व आर एस ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सर्व वेगवेगळ्या पक्षाची नेतेमंडळी तसेच सर्व कार्यकर्ते गट तट सोडून एकाच व्यासपिठावर आले होते अशाच प्रकारे सर्व जण एकत्र येवुन सण उत्सव साजरे करुन गावाचा सन्मान वाढवावा अशी अपेक्षा अनेक जेष्ठांनी व्यक्त केली आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-समींद्रा फौंडेशनच्या वतीने अनेक गरजु वंचित लाभार्थ्यांना जिवनावश्यक वस्तू तसेच साहित्याचे वाटप करण्यात आले असुन जवळपास १२ शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट देण्यात आले असल्याची माहीती फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव पा .थोरात यांनी दिली                                श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शालेय किटच्या साहित्याचे वाटप प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार देविदास देसाई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेजर ज्ञानदेव निबे संस्थेच्या सचिव सविता थोरात राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक बबनराव तागड ,मनिषा कोल्हे, उमेश थोरात उपस्थित होते. या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात म्हणाले की या फौंडेशनच्या माध्यमातून ऊस तोड कामगार ,घिसाडी समाज तसेच समाजातील वंचित घटकांना विविध वस्तू, कपडे आदि साहित्य वाटप करण्यात आले तर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम येथेही मदत देण्यात आलेली आहे कुठलाही विद्यार्थी शैक्षणिक सोयी सुविधेमुळे शिक्षंणापासून वंचित राहु नये ही आपली भुमीका असल्याचे मत थोरात यांनी मांडले या वेळी प्राथमिक शाळा उक्कलगाव ,प्राथमिक शाळा पटेलवाडी ,प्राथमिक शाळा आटवाडी ,प्राथमिक शाळा वाकणवस्ती येथील  विद्यार्थ्यांना बँग ,कंपास ड्राईंग बुक वह्या कलर पेटी टुथ ब्रश व ईतर साहित्य भेट देण्यात आले या वेळी सुधीर आहेर, पत्रकार देविदास देसाई ,मनिषा कोल्हे, मेजर ज्ञानदेव निबे, बबनराव तागड तसेच शालेय विद्यार्थीनी सायली मोरे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी उक्कलगाव शाळेच्या मुख्याध्यापिका कविता गायकवाड, मनिषा साठे ,ज्योती तोरणे ,ज्ञानेश्वर चौधरी पटेलवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा भागवत, रविंद्र वाघ मारुती वाघ रामनाथ पिलगर मुराद सय्यद मनिषा टाके विनीत चांदेकर प्रितम मेहेरखांब प्रिया माहुरे नंदा चेमटे शंकर बर्डे रमेश रजपुत संजय मोरे ज्योतिबा श्रीराम विजया थोरात पाटील दिपक गोसावी आशिष निकम आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक उक्कलगाव शाळेच्या कविता  गायकवाड यांनी केले तर रविंद्र वाघ यांनी आभार मानले मारुती वाघ यांनी सूत्रसंचलन केले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जीवन सुखी व समाधानी जगायचे असेल तर भक्ती मार्गाचा अवलंब करा. मुलांना सुसंस्कारीत करा आचरण शुद्ध ठेवा कुणाशी कपटनिती ठेवुन वागु नका.खोटे बोलु नका असा उपदेश सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला .             आदिक मास निमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांना उपदेश करताना महंत रामगीरी महाराज पुढे म्हणाले की  मुलावर चांगले संस्कार करा तीच आपली संपत्ती आहे पैशाच्या मोहापायी जिवनातील आनंद गमावुन बसु नका मनुष्य जन्म हा एकदाच आहे याची जाणीव ठेवा प्राणीमात्रावर दया करा हिंसा करु नका भक्ती हे जीवनाचे सार आहे.ज्याच्याकडे समाधान आहे तो सर्वात सुखी माणूस आहे त्यामुळे समाधानी रहा सुख आपोआप प्राप्त होईल .कोरोना काळ सर्वांनी अनुभवला आहे आपल्या गरजा किती  आहे ते कोरोनाने आपल्याला शिकविले आहे घरात बसुन देखील आपण आनंदात जीवन जगत होतो त्यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावताना दुःख पदरात घेवु नका जीवानाचा खरा आनंद कशात आहे हे जाणून घ्या सर्व संपत्ती येथेच सोडून आपल्याला जायचे आहे आपल्या बरोबर केवळ आपले कर्मच येणार आहे त्यामुळे सत्कर्म करा आसा उपदेशही महंत रामगीरी महाराज यांनी दिला या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा ,राजेश खटोड , रामविलास झंवर ,संजय राठी ,दिपक सिकची ,रामप्रसाद झंवर किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण ,भरत सोमाणी ,गोविंदराम दायमा ,विशाल वर्मा ,पत्रकार देविदास देसाई ,वकील संघटनेचे अध्यक्ष अँड विजयराव सांळूके ,सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज , विशाल आंबेकर ,प्रशांत खटोड ,गोपाल राठी ,अक्षय लढ्ढा ,मुकुंद चिंतामणी ,प्रमोद पोपळघट ,करण गोसावी ,आदिसह महीला भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-राज्यातील सर्व दुकानदारांच्या मागण्या एकच असुन अधिवेशन संपल्यानंतर राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवुन दुकानदारांच्या उचित मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे अश्वासन राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळास दिले          राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छागन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की दुकानदारांना दिली जाणारे कमिशन हे तुटपुंजे असुन कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी दुकानदारांनी मोफत वितरीत केलेल्या धान्याचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे प्रति क्विंटल एक किलो प्रमाणे घट मंजुर करण्यात यावी धान्याप्रमाणेच साखरेलाही १५० रुपये मार्जिन देण्यात यावी तसेच मागील साखरेच्या मार्जिनचा फरकही देण्यात यावा कोरोना काळात वितरीत केलेल्या कँरी फाँरवर्ड धान्याचे मार्जिन त्वरीत मिळावे माहे नोव्हेंबर डिसेंबर २०२२ महीन्यात धान्याचे पैसे भरले परंतु ते धान्य जानेवारी महीन्यात प्राप्त झाले असुन त्याचे वितरण मोफत करण्यात आले त्यामुळे चलनाने भरलेलै पैसे त्वरीत मिळावे पाँज मशिन जुन्या झाल्यामुळे बिल करताना वारवार अडथळे येतात त्यामुळे हाय स्पिडचे नविन पाँज मशिन देण्यात यावे दुकानदारांना धान्य मोजुनच दिले जावे सहकारी संस्थांच्या सेल्समन यांनाही वाटप केलेल्या कमिशनचा लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे अनिल मानधने दिलीप गायके संगमने तालुध्यक्ष काशिनाथ आरगडे नानासाहेब चौधरी नितीन गोरे सुखदेव खताळ सुर्यभान दिघे अशोक कानवडे आदिचा शिष्टमंडळात समावेश होता

श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे

वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे

साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च एक ते दीड लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे  शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करावे याकरिता पत्रकार संघाच्या इलेक्टॉनिक मीडिया सेलचे जिल्हाअध्यक्ष अस्लम बिनसाद यांनी सर्व पत्रकार व सर्व श्रीरामपूर शहर हितचिंतकांना या कर्तव्य दक्ष अभियंत्यांना त्यांच्या हक्काच्या लढ्यात सोबत राहून श्रीरामपुरातील विकास कामे उत्कुष्ट व दर्जेदार करून घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आपण पत्रकार संघाच्या वतीने वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार केला आसून लवकरच रास्ता रोको देखील करणार असल्याचे अस्लम बिनसाद यांनी सांगितले या आंदोलनात शहरातील सामाजिक संघटना व सूदान नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget